पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

रविमुकुल : गेल्या २७ वर्षांत सुमारे २,५०० पुस्तकांची मुखपृष्ठे राजपुत्रांच्याविषयी आहे; 'Princess' म्हणजे राजकन्येविषयी नव्हे. माझ्या हातात असलेली ही आवृत्ती दुसरी तिसरी होती. म्हणजे आजवर कुठल्याही वाचकाला सोडाच पण प्रकाशक / लेखक यांनाही हे मुखपृष्ठ चुकीचं वाटलं नव्हतं, खटकलं नव्हतं, मी नंतर जुन्या खानदानी हार्डबाऊंड इंग्रजी पुस्तकासारखं मुखपृष्ठ केलं- लंबवर्तुळात एका देशी प्रिन्सचं पोर्ट्रेट वाटावं असा चेहरा, डार्फ मरून रंगाची बॅकग्राऊंड, सोनेरी रंगात 'दि प्रिन्सेस ही इंग्लिश डौल दाखवणारी अक्षरं असं. एक चांगलं 'कार्य' केल्याचं समाधान बरेच दिवस वाटत होतं. मध्ये बरीच वर्ष गेली. त्या माझ्या मित्रानं प्रकाशनव्यवसाय बंद करून हमखास यश देणारा 'वधू-वर सूचक मंडळाचा कॉम्प्युटराईज्ड व्यवसाय सुरू केला. परवा 'प्रिन्सेस ची नंतरची नवी आवृत्ती पाहिली. एका मातब्बर प्रकाशन संस्थेनं काढलेली आणि हादरलो. पूर्वीचीच राजकन्या पुन्हा कव्हरवर मिरवते आहे. प्रकाशकाची चित्राची ही 'जाण' पाहून थक्क होण्यापलीकडे आपल्या हाती काय आहे? गुळगुळीत, आकर्षक, आशयहीन मुखपृष्ठाची ही कोंडी प्रथम फोडली ती प्रभाकर गोरे या प्रतिभावान चित्रकाराने थेट रंगांचे तुकडे वापरून केलेली गुणाकार (गंगाधर गाडगीळ), पिंगळावेळ, हिरवे रावे (जी.ए.) अशी काही त्यांची मुखपृष्ठं अजूनही स्मरणात, डोळ्यांसमोर आहेत. एकप्रकारे त्यांनी पुढच्या चित्रकारांना निर्भय बनवलं. तरल, संवेदनशील रंगसंगती दाखवणाऱ्या पद्मा सहस्रबुद्धे यांनी कवितासंग्रहांना एक स्वतःचा असा खास संवादी चेहरा दिला. खूणगाठी (ना. घ. देशपांडे), अनीह (पु. शि. रेगे) असे काही कवितासंग्रह किंवा मृद्गंध ( इंदिरा संत), पैस (दुर्गा भागवत), सावित्री (पु. शि. रेगे) यांसारख्या ललित पुस्तकांवरची त्यांची मुखपृष्ठं अप्रतिम आहेत, मनात रेंगाळणारी आहेत. जोरकस लयदार रेषा, उत्तम क्रॉस शेडिंग आणि सॉलीड ब्लॅकबरोबर लवलवत्या रेघांचा सुयोग्य मेळ साधावा तो बाळ ठाकूर यांनीच सुजाण रसिकांना त्यांची कित्येक चित्रं आठवतील. 'गोतावळा' (आनंद यादव) वरचा त्यांचा मस्तवाल कोंबडा, 'लज्जा' (तस्लीमा नासरीन) वरची सपासप जाड रेघांत साकारलेली मुस्लीम तरुणी अशी त्यांची अनेक चित्रं विसरू म्हणता, विसरता येणार नाहीत. हाडकलेली हाताची बोटं प्रत्यक्षात पाहताना ओंगळ दिसतात, पण तीच ठाकुरांच्या चित्रात हुकमी सुरूप दिसतात. 'प्रतिभावान रेषालेखक असं ज्यांचं सार्थ वर्णन विजय तेंडुलकरांनी केलंय, त्या वसंत सरवटे यांना आपण केवळ व्यंगचित्रकार समजतो हा खरं तर त्यांच्यावर अन्यायच आहे. त्यांची कितीतरी चित्रं रूढार्थाने आपण ज्यांना व्यंगचित्र म्हणतो, त्यांच्यापलीकडे गेलेली आहेत. त्यांची रेषा विचार करायला भाग पाडते. केवळ चित्र / व्यंगचित्र म्हणून आपण त्यांच्या चित्राकडे पाहूच शकत नाही. वाचकाला / प्रेक्षकाला अंतर्मुख करण्याची जबरदस्त ताकद त्यांच्या अनेक चित्रांतून प्रत्ययाला येते. 'बटाट्याची चाळ' (पु.लं.) च्या त्यांच्या मुखपृष्ठाला केवळ व्यंगचित्र कसं म्हणता येईल? ('बयट्याची चाळ च्या नाट्यरूपांतरात नेपथ्य म्हणून ढोबळ रंगीत चाळ दाखवण्याऐवजी हेच चित्र प्रचंड आकारात एन्लार्ज करून ठेवायला हवं होतं.) 'काही अप्, काही डाऊन' (पु. ल.) या लेखासाठी सरवट्यांनी काढलेला मोजक्या, नाजूक, रेषांतला गावापासून लांब असलेला निवांत फलाट कडूलिंबाचा निर्मळ, आल्हादक वास घेऊन येतो. 'पु. ल. एक साठवण' हे जेवढं पु.लं. चं, जेवढं संपादक जयवंत दळवींचं, तेवढंच वसंत सरवटे यांचंही आहे. पुस्तकाच्या मलपृष्ठावर लेखक, संपादकाबरोबर चित्रकाराचाही फोटो छापल्याचं हे एकमेव उदाहरण आहे. वसंत सरवटे आणि शि. द. फडणीस हे दोघेही मूळचे कोल्हापूरचे. परंतु तथाकथित 'कोल्हापूर स्कूल' पासून पूर्णपणे अलिप्त, स्वतंत्र प्रतिभेचे देणे घेऊन जन्माला आलेले. सरवटे यक, पेन वापरणारे, तर फडणीस ब्रशच्या नेमक्या स्ट्रोक्समधून अचूक परिणाम साधणारे, रूक्ष शालेय पाठ्यपुस्तकेही विशेषतः गणितातली आकडेमोडही आनंददायी प्रसन्न करता येते, हे फडणीसांनी प्रथम दाखवून दिलं. जाडी आणि सौंदर्य याची आपण कल्पनाच करू शकत नाही. परंतु शि. द. फडणीसांची ब्रशची जाड • रेषा हा संगम लीलया घडवून आणते. चित्र पाहताक्षणी हसू फुटलं पाहिजे, ही किमया फडणीस सहजपणे करतात, पु.लं. च्या अनेक पुस्तकांना अर्थपूर्ण, प्रसन्न दृश्यात्मकता निवडक अंतर्नाद २८७ -