पान:निवडक अंतर्नाद.pdf/२८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

पुस्तकाचा चेहरा रविमुकुल 'मुळात प्रकाशनक्षेत्रात तुम्हांला चित्रकार म्हणून काम करायचं असेल, तर तुम्ही उत्तम वाचक असणं ही पहिली अट आहे, असं माझं मत आहे. सर्व वाङ्मयप्रकार - कथा, कविता ते थेट समीक्षा - तुम्ही समजून घेतले पाहिजेत. त्याशिवाय तुम्हांला लेखनाच्या आशयाशी सुसंवादी निर्मिती करताच येणार नाही." "माझ्या पुस्तकाचं कव्हर चांगलं रंगीत करा. ते इतर दलित पुस्तकांसारखं नुसतं ब्लॅक अँड व्हाइट मला नको. मीही जरी दलित लेखकच असलो तरीही इतरांच्या लेखनात आणि माझ्या लेखनात प्रचंड फरक आहे. शिवाय मी स्वतःला नुसता दलित लेखक मानत नाही.” "ते चित्राचं काय ते तू बघ. पण लेटरींग मात्र दणदणीत पाहिजे. त्या ह्यांच्यासारखं किरटं बारीक नको, लांबूनही ठळक दिसायला पाहिजे, आणि मुख्य म्हणजे टायटल वरच्याच बाजूला पाहिजे, जरा इंग्रजी पुस्तकं बघत चला.” "आर्टिस्ट, माझी एक बारीक सूचना आहे. म्हणजे बघा हं, आम्ही काय चित्रकार नाही, पण एक वाटलं... चित्राच्या मागच्या बाजूला बॅकग्राऊंडवर एक सोनचाफ्याचं झाड दाखवायचं. माझ्या मिसेसला ते फार फार आवडतं. एवढं नाही म्हणू नका. बाकी मात्र तुम्हांला पाहिजे ते करा. पण तेवा सोनचाफा घ्याच!” "हे प्रकाशक लोक आपल्या लेखकाला प्रमोट करतच नाहीत. वर मोठ्ठे लेखकाचं नाव आणि खाली कादंबरीचं नाव द्यायला काय हरकत आहे? इंग्रजीत कसं लेखकाचं कौतुक करतात! आमचे मराठी प्रकाशक म्हणजे हे असलेच! आणि मग बोंबलतात आमच्या नावानं, की तुमची आवृत्ती संपायला पाच- पाच, दहा-दहा वर्षं लागतात, एका तरी प्रकाशकानं आजवर त्याच्या कव्हरवर छापलंय का - बाय द ऑथर ऑफ अमुक अमुक बेस्ट सेलर' असं! कारण यांच्या पोटात दुखतं! दुसऱ्या प्रकाशकानं काढलेल्या पुस्तकाची फुकट जाहिरात आपण का करा म्हणून!" - "चित्रकार, लेखकाचं नाव एवढं मोठं काढत नका जाऊ बुवा, अहो, ते लगेच डोक्यावर बसतात! शेवटी आम्ही पैसे घालतो म्हणून तर यांचं नाव होतं. पुस्तक खपलं तर ह्यांच्या लेखणीमुळं आणि आपटलं तर आम्हांला विक्री करता येत नाही, अशी यांची बोंब!” "चित्र चांगलं डबलस्प्रेड करा. आपण पैशाला मागंपुढं पाहत नाही, पण चित्रात एक तरी फिगर टाकाच. मग अॅब्स्ट्रॅक्ट का असेना!” "रविमुकुल तुमचं कव्हरेज मात्र ग्रेट च्यायला!” इतक्या वर्षांत ही काही लक्षात राहिलेली मुक्ताफळं. परवा एक पुस्तकविक्रेते सांगत होते. "राजस्थानच्या आमच्या स्टॉलवर इतरही भाषक वाचक येत होते. आपल्या पुस्तकांची कव्हरं बघून ते हरखून जायचे. पुनःपुन्हा बघायचे आणि शेवटी ही भाषा आपल्याला येत नाही म्हणून चुकचुकत पुस्तक खाली ठेवायचे. आपली कव्हरं इतरांच्या तुलनेत नक्कीच ग्रेट असतात ह्याचा हा पुरावाच, " कुठल्याही मराठी ग्रंथप्रेमीला अभिमान वाटावा अशीच ही घटना आहे. पण थोडा विचार केला तर एक लक्षात येईल, आपली मुखपृष्ठं आकर्षक असतात एवढंच यातून सिद्ध होतं. कारण परभाषकांना पुस्तकाच्या शीर्षकाचाही अर्थ लागणं शक्य नाही. मग संपूर्ण साहित्य वाचन करून चित्राबद्दल मतप्रदर्शन करणं, हे तर दूरच. हे तर आपणही करत नाही. चित्राबद्दल चटकन मतप्रदर्शन करून आपण मोकळे होतो. कारण चित्र एका दृष्टिक्षेपात पाहता येतं. वाचन करायला काही तास, दिवस घालवावे लागतात आणि मग आपण त्या लेखनाबद्दल विचारपूर्वक विधान करतो. मुखपृष्ठाबद्दल असा विचार करण्याइतके आपण अजून साक्षर झालेलो नाही. 'कोणत्याही पुस्तकाचं मुखपृष्ठ म्हणजे त्या विशिष्ट पुस्तकाकरिताच निर्मिलेली आशयपूर्ण, संवादी कलाकृती' अशी माझी व्याख्या आहे. अर्थात येथे आणि यापुढेही लिहिताना मला सकस लेखन अपेक्षित आहे मग कथा, कादंबरी, कविता, समीक्षा असा कोणताही प्रकार असो, - कॅलेंडर, पोस्टर अशी चित्रं बघताना ज्या वेगात आपण 'वा! ग्रेट!' किंवा 'होपलेस! काही दम नाही' असं बोलून जातो तसं मुखपृष्ठावद्दल बोलणं हे योग्य नाही. तसं बोलून या विषयातला निरक्षरपणा आपण काहीर करत असतो. अर्थात या परिस्थितीला जबाबदार आपल्या प्रकाशनक्षेत्राचा इतिहासच आहे वाचक, प्रेक्षकाला सर्वांत प्रथम दिसणाऱ्या मुखपृष्ठ या घटकाला सुरुवातीला पुस्तकाच्या निर्मितिप्रक्रियेत निवडक अंतर्नाद २८५