१९९३ संपलं आणि नवीन वर्ष १९९४ सुरू झालं, मला अनेक शुभेच्छा कार्ड आली आणि वाटलं की आता या शुभेच्छांचं फळ मिळणार! पण पुन्हा तिसरा झटका बसला ! २३ मार्च १९९४ला रीडर्स डायजेस्टचं पुन्हा पत्र आलं : "There are a few points on which we need a clearer perspective. I am putting down these questions with some querries..." आता पुन्हा आणखी १४ प्रश्नांची उत्तरं त्यांना पाहिजे होती! पुन्हा माझ्या फेया सुरू झाल्या. तुपे आता चांगलेच वैतागलेले दिसले, कारण त्यांच्या घरी ती माझी आठवी किंवा नववी खेप होती! मी त्यांना पुन्हा धीर देत म्हणालो, "आपण हार मानता कामा नये. " मला वाटतं तुपेंना माझी दया आली असावी! आमच्या पुन्हा दोन तीन बैठका झाल्या. या वेळच्या प्रश्नावलीत एक महत्त्वाचा प्रश्न मला जाणवला तो असा की, "तुपेंच्या लेखनाला समाजाने किती आणि कसा प्रतिसाद दिला ? आणि लेखनाशिवाय तुपेंनी समाजाकरिता काही कार्य केले का?" याचं उत्तर होकारार्थी होतं. तुपेंच्या भस्म या कादंबरीवर आधारित पुरुषोत्तम बेर्डे यांनी "भस्म" याच नावाने एक चित्रपट काढला आणि या चित्रपयची १९९५च्या मुंबईत सुरू होणाऱ्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात होणाऱ्या इंडियन पॅनोरमासाठी प्राथमिक फेरीत निवड झाली होती. The Times of India च्या बातमीनुसार, “The theme deals with a socially oppressed community called 'Masanjogi'. The film strongly projects the anti-superstition message." मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. बाळासाहेब सरपोतदार, सेक्रेटरी श्रीमती स्मिता तळवलकर, निर्माते श्री. किरण शांताराम, श्री. विजय नेवाळकर, श्री. सतीश कुलकर्णी, दिग्दर्शक श्री. रामदास फुटाणे, श्री. संजय सूरकर, श्री. अमोल पालेकर, श्री. जयंत धर्माधिकारी आणि लेखक वसंत सबनीस या सगळ्यांनी भस्म चित्रपटाबद्दल बराच पुढाकार घेतला होता. तुपे म्हणाले, "माझ्या लिखाणामध्ये समाजातून अंधश्रद्धा जावी हेच तुम्हाला आढळेल. जे मी पाहतो तेच मी लिहितो, काल्पनिक मी कधी लिहित नाही. 'हंडा' हा विषय एका भयाण राक्षसासारखा दिसतो. आज समाज विघटन करणारा हा प्रश्न होऊन बसला आहे. 'हुंडा' या प्रश्नाला कुठेतरी खीळ बसली पाहिजे असं मला मनापासून वाटतं, म्हणूनच मी 'हुंडा' नावाची कथा लिहिली. "कोळ्यांबद्दल मी जावळं लिहिलं आहे माझं झुलवा हे लेखन देवदासी प्रथेच्या विरुद्ध आहे. झुलवा लिहिण्यासाठी मी स्वतः वेषांतर करून या देवदासींबरोबर त्यांच्यातलाच एक म्हणून राहिलो होतो. जिच्यावर झुलवाची कथा घेतलेली आहे त्या जगनचं मीच एका चांगल्या तरुणाबरोबर लग्नही लावून दिलं व तिची या २६४ निवडक अंतर्नाद नरकातून सुटका केली. भस्म हे स्मशानजोगींवर आहे. माझी चिपाड नावाची कादंबरी आहे, ती सुशिक्षित बेकारांवर. एकूणच मी समाजाचा विचार करतो आणि मग लिहितो. सौ. जिजाबाई तुपेंच्या बोलण्यावरून कळलं की तुपेंनी दोन- तीन मुलींचं लग्न हुंडा न देता लावून दिले आहे. आता मिळालेली ही सगळी माहिती पुन्हा व्यवस्थित टाईप करून ११ एप्रिल १९९४ला रीडर्स डायजेस्टला पाठवली. मात्र या माहितीबरोबर एक सांकेतिक ओळ अशीही लिहिली की आता आम्ही दोघं - तुपे आणि मी केव्हा एकदाचा हा लेख छापून येणार याची आतुरतेनी वाट पाहात आहोत ! ५ ऑगस्ट १९९४ला त्यांचं एक आशादायक पत्र आलं : “The article on Bhasma will be useful for our article on Tupe. The item on Devdasi is very interesting. However, we may have to refer to other sources." मी पुरविलेल्या तुपेंसंबंधीच्या सर्व माहितीवर रीडर्स Counter Checking चाललंच होतं! अर्थात मला ते कधीच कळू नये याची दक्षता ते घेतच होते. पुढे त्यांचं पत्र येणं जवळ जवळ थांबलं. पण मधूनमधून फोन यायचे आणि मागितलेल्या प्रश्नांची उत्तरं मी द्यायचो. अचानक १० नोव्हेंबरला १९९४ला रीडर्स डायजेस्टच्या असिस्टंट एडिटर शानू बिजलानींचा फोन आला. “I am in Pune tomorrow morning. We will go and meet Tupe." मला एकदम प्रश्न पडला विचार करू लागलो, माझ्या माहितीत कुठे काही चुकलं की काय? दुसऱ्या दिवशी मी श्रीमती बिजलानींना भेटलो आणि आम्ही दोघे तुपेंना भेटण्यासाठी त्यांच्या घराकडे निघालो! वाटेत मला जाणवलं की तुपेंच्या घराकडे कसं जायचं, कुठल्या रस्त्यावर कुठे वळायचं हे त्यांना ठाऊक आहे. मला नवल वाटलं. मी त्याबद्दल आश्चर्य व्यक्त करताच श्रीमती बिजलानींनी मला दुसरा धक्का दिला. "मी काल पुण्यात आल्याबरोबर तुपेंच्या घरी जाऊन त्यांना भेटून आले! आज आपल्या भेटण्याची ही वेळही त्यांनीच दिली आहे.” हळूहळू रीडर्स डायजेस्टच्या Counter Checking ची जाणीव होत गेली! दारातच राणाने भुंकून आमचं स्वागत केलं. त्याचं भुंकणं ऐकून तुपे बाहेर आले. नमस्कार चमत्कार झाला. सौ. जिजाबाई तर बिजलानींशी असं बोलू लागल्या की जणू दोघींची जुनी ओळखच होती! काल काही वेळाच्या भेटीत त्यांचं बरंच बोलणं झालं असावं असा भास मला झाला, तुपेंची दोन्ही मुलं, विनोद आणि मिलिंद, आम्हाला नमस्कार करून बाहेर पडली. यानंतर बिजलानी तुपे संवाद सुरू झाला. मध्ये दोनदा सौ. जिजाबाईंनी चहा आणि बिस्किटं आणून तुपेंना मिळालेली पारितोषिकं आणि तुपेंबद्दलच्या कात्रणांची फाईलही आमच्यापुढे ठेवली. आमच्या गप्पा सतत चार तास चालल्या शेवटी बिजलानी जायला निघाल्या. “असं कसं चाललात? जेवायची वेळ झाली आहे जेवण करून जायचं, जेवण तयार आहे. तुम्ही हात धुवा, तितक्यात मी
पान:निवडक अंतर्नाद.pdf/२६५
Appearance