पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

'नव्या जगाची सुरुवात स्वतः पासून होते या वाचकांचा उदंड प्रतिसाद लाभलेल्या व अडीच वर्षे चाललेल्या जाहिरातमालिकेची एक झलक. व्हॉट्सॲपची ज्ञानगंगा दुथडी भरून वाहू लागण्यापूर्वीचे ते दिवस होते हे नमूद करायला हवे. धागा तोडू नका, फुली मारू नका नव्या जगाची सुरुवात स्वत:पासून होते २५६ निवडक अंतर्नाद एकही डाग नसलेली सफरचंदं सापडणं कठीण आहे तशी ती नसतातच पण थोडेफार डाग असलेली, टाकून द्यायची नसतात जरा साल काढून घेतली तर आतून ती चांगलीच असतात. ● माणसांचंही तसंच असतं थोडंफार वगळलं तर, बरचसं चालण्यातलं असतं, एवढ्यातेवढ्यावरून फुली नसते मारायची इतरांवर, वा स्वत:वरही तोडून नसतं टाकायचं इतरांपासून आपल्याला वा आपल्यापासून आपल्याला. तोडणं सोपं असतं पण पुन्हा जोडणं कठीण असतं आणि मग कितीही जोडलं जखम भरली, खपली धरली तरी व्रण कायमच राहतो तुटलेला धागा जोडला तरी गाठ कायमच राहते, रोज-रोजच्या जगरहाटीत तुमच्या आमच्या दिवसरातीत जास्तीत जास्त ताण-ताप चलनवाढ आणि तेलटंचाई जिहाद आणि जंगलकटाई यातून नाही येत. तो येतो, तू-तू, मी-मीतून नात्यागोत्यांतल्याच गाठींतून त्यावरच ठरतो आपला खरा मूड तो चांगला असेल तर भोवतालचं जगही अधिक चांगलं दिसायला लागतं, दृष्टी बदलली की सृष्टीही बदलते. आधी आपण बदलतो मग जग बदलतं. (दिवाळी २००६)