पान:निवडक अंतर्नाद.pdf/२५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

खुंटलिया धावा तृष्णेचिया अनिल यशवंत जोशी समाजाचा गाडा सुरळीत चालतो यामागे रूढार्थान प्रकाशझोतात नसणाऱ्या पण आपले नियत कार्य निष्ठापूर्वक करणाऱ्या अनेकांचा हातभार असतो. अशांपैकी एक म्हणजे पंढरपूरचे वकील भाऊसाहेब. त्यांचे हे हृद्य व्यक्तिचित्र, त्यांच्या चिरंजीवांनी रेखाटलेले. कां झांकलिये घटींचा दिवा । नेणिजे काय जाहला केव्हां । या रीती जो पांडवा | देह ठेवी ॥ (ज्ञानेश्वरी ११.९८ ) ( प्राणत्याग कसा व्हावा याविषयी गोनिदांच्या 'कुणा एकाची भ्रमणगाथा’मधील हे चिंतन! जसा एखाद्या तेवत्या दिवलीवर घट पालथा घालावा, मग ती केव्हा विझते ते कळतही नाही, तसा... ) अशीच एक दिवली शांतपणे निमाली त्या दुपारी! नेहमीप्रमाणे दुपारची वामकुक्षी उरकून कामाला निघायची वेळ झाली. कपडे करून जाताना आईने हटकलं, "अरे! चहाची वेळ झाली तरी अजून 'हे' का उठत नाहीत ते बघ... बहुतेक त्यांचा डोळा लागलेला दिसतो." भाऊसाहेब ! अहो भाऊसाहेब !! म्हणून हाक मारूनही प्रतिसाद येईना म्हणून त्यांना थोडंसं हलवायला गेलो अन् लगेचच 'तो' मृत्यूचा थंड स्पर्श माझ्या सराईत डॉक्टर हाताला जाणवला. सारं काही संपल्याचं जाणवलं. चेहऱ्यावर तेच शांत, समाधानी भाव एखाद्या नितांत रमणीय ठिकाणी जाताना आपल्याला जे वाटतं, तसं काहीसं रीतीप्रमाणे आप्तेष्ट जमले. दहनसंस्कार झाले. येणारा प्रत्येक जण ह्य भाऊसाहेबांच्या मृत्यूचा प्रकार वाखाणत होता. बोलीभाषेत 'उठाउठी जाणं' असा एक चपखल शब्दप्रयोग या मृत्यूचं वर्णन करण्यासाठी सातत्याने वापरला जात होता. एका ठिकाणाहून उठून चटकन आपण दुसऱ्या ठिकाणी बसतो, तसं काहीसं इहलोकातून उठून परलोकात जाणं, याचं हे वर्णन भेटायला येणाऱ्या सर्वांशी बोलताना एक गोष्ट जाणवत होती, की आपलं शेवटी काय होणार? आपला मृत्यू कसा होणार ? याचा भुंगा प्रत्येकाच्या मनात कोठेतरी असतोच. या अंतिम सत्याची क्षणिक जाण सतत राहावी म्हणून जे काही आपण करतो, त्यालाच अध्यात्म म्हणत असावेत. मी तसा अज्ञेयवादी आहे. देव-धर्म, पुनर्जन्म, पूर्वसंचित, कलियुग असे अनेक विचारकलह सांभाळत तळ्यात मळ्यात चाललेलं असतं. कलियुगात तुम्ही जे काही बरंवाईट करता त्याची झाडाझडती येथेच द्यावी लागते आणि त्यानुसार तुम्हाला क्लेश- २५२ निवडक अंतर्नाद यातना भोगाव्या लागतात असं सांगितलं जातं. लोकांना सत्प्रवृत्त करण्याचा एक मार्ग म्हणून मी याकडे पाहतो, पण भाऊसाहेबांचा हा मृत्यू पाहिल्यानंतर मला त्यात काहीतरी तथ्य असावं असं वाटू लागलं आहे. भाऊसाहेब ८४ वर्षांचे होऊन गेले. जाताना त्यांना कोठलाही मोठा आजार नव्हता, कोणत्याही गोळ्या - औषधं चालू नव्हती. माझ्या जाणिवेत मी त्यांना कधीही कोणावरही रागावलेलं पाहिलं नाही, कुणाबद्दल अपशब्द वापरलेला पाहिलं नाही. लहानपणी केलेली तालीम, व्यायाम यामुळे शरीरप्रकृती धडधाकट नाही म्हणायला साठीच्या आसपास श्रवणशक्ती मात्र थोडीशी क्षीण झाली होती, पण त्यांनी कधीही माझ्यापाशी किंवा घरातल्या कोणापाशी तब्येतीची कोणती तक्रार केलेली ऐकिवात नाही. मी डॉक्टर असूनही त्यांनी स्वतःहून माझ्याकडून कधी कोणती गोळी मागून घेतली असं मला स्मरत नाही. त्यांच्या किरकोळ तब्येतीच्या तक्रारी आईमार्फत मला कळायच्या आणि मग आम्ही दिलेली एखादी गोळी ते नाखुशीने आणि आमचं दोघांचं मन मोडू नये म्हणून घ्यायचे. त्यामुळे त्यांच्यापेक्षा आम्हालाच जास्त बरं वाटायचं! माझे आजोबा गणेश वामन उपाख्य बाबुराव जोशी हे त्या काळातलं पंढरपुरातलं एक प्रस्थ होतं. त्यांना आम्ही घरातील सर्व जण 'बाबा' म्हणून हाक मारायचो. हे 'वलय' त्यांनी स्वकर्तृत्वाने मिळवलं होते. मराठी, संस्कृत व इंग्रजीवरती असाधारण प्रभुत्व, अमोघ वाणी आणि जाणीवपूर्वक चाललेलं अखंड वाचन ही त्यांची काही वैशिष्ट्यं गांधीविचारांचे पाइक असलेले बाबुराव स्वातंत्र्यलढ्यातही अग्रेसर होते व त्यामुळे त्यांच्या सततच्या तुरुंगवाऱ्या चालू होत्या, बाबा आचरणातही पक्के गांधीवादी होते.