पान:निवडक अंतर्नाद.pdf/२४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सर्जनाचे झरे आटून जातात का? शेवटी शेवटी विजय तेंडुलकर जाहीरपणे सांगायचे - मला आधीसारखं नाटक आता दिसत नाही म्हणून मला वाटतं या काळात सर्जनशील लेखक आपल्या आतल्या झऱ्याच्या शोधात एखाद्या कस्तुरीमृगासारखा वणवण भटकत असतो. त्याला त्याच्या आतलं सत्व हवं असतं. पण ते गवसत नाही म्हणून की काय तो आपल्या लेखनाशी तडजोडी करू लागतो की काय? त्याची ही पठारावस्था असते की काय ? यादवांच्या बाबतीतही काही प्रमाणात हे असं घडलं असावं आणि म्हणून ते संत ज्ञानेश्वर आणि संत तुकारामांवर कादंबऱ्या लिहायला उद्युक्त झाले की काय, अशीही शंका माझ्या मनात येते. मध्यंतरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांना साहित्याचं व्यासपीठ प्राप्त व्हावं यासाठी 'समरसता साहित्य मंचा ची स्थापना झाली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक विजय कापरे हे या मंचाचं काम पाहत होते. समरसता साहित्य मंचातर्फे समरसता साहित्य संमेलनांचं आयोजन करण्याचा विचार त्यांनी केला आणि १९९८ मध्ये जळगाव येथे आयोजित पहिल्या समरसता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान आनंद यादवांना दिला. या साहित्य संमेलनाचं सूत्र होतं 'साहित्य आणि सामाजिक समरसता.' यामुळे समरसतेची संकल्पना मांडण्याची जबाबदारी यादवांवर येऊन पडली. आणि ही संकल्पना मांडताना त्यांनी उजवी विचारधारा कशी उपयुक्त आहे ते मांडण्याचा प्रयत्न केला. यापूर्वी यादव फुले-शाहू- आंबेडकर साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झालेले होते. त्या पार्श्वभूमीवर समरसता साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद त्यांनी भूषवावं हे त्यांच्या ग्रामीण साहित्य चळवळीच्या सहकाऱ्यांना फारसं रुचलं नाही. त्यामुळे ते दुरावले. यादव काहीसे एकटे पडले. ग्रामीण साहित्य चळवळ थंडावली. २००८ मध्ये साधना प्रतिष्ठानने पहिले साधना साहित्य संमेलन पुण्याला कादंबरी या वाङ्मयप्रकारावर आयोजित केलं होतं. स्थळ होतं एस. एम. जोशी सभागृह, त्या संमेलनात माझाही सहभाग होता. तिथे आनंद यादव काही वेळासाठी डोकावून गेले होते. त्यांची माझी भेट झाली, औपचारिक गप्पा झाल्या. त्यानंतर तिथे दोनेक तासांनी मला ह ल निपुणग्यांचा फोन आला. ते म्हणाले - 'मोकळे झाला असाल, तर माझ्या ऑफिसात या. यादवांना तुमच्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे.' मी ताबडतोबरा करून पुणग्यांच्या ऑफिसात गेलो. यादव तिथे बसलेलेच होते. तिथे निपुणग्यांनी सांगितलं 'यावर्षी महाबळेश्वरला अ. भा. मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. आणि यादव या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी उभे राहू इच्छितात. ' - मी त्या सूचनेचं मनापासून स्वागत केलं, माझ्या मनातला लेखक या वर्षी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष होतो आहे हा आनंद मलाही अधिक झाला होता. यादवांच्या विरोधात शंकर सारडा उभे होते. त्यावर्षी महामंडळ औरंगाबादला होतं आणि कौतिकराव ठाले पाटील महामंडळाचे अध्यक्ष होते. यादव या निवडणुकीत रीतसर जिंकून आले. यापूर्वीचं त्यांचं दोन वेळेचं अपयश आता धुवून निघालं होतं. माझ्यासारख्या त्यांच्या २४४ निवडक अंतर्नाद चाहत्यांना निश्चितच आनंद झाला होता. त्यांच्यावर मी नागपूरच्या तरुण भारत मध्ये एक लेख लिहून त्यांच्या वाङ्मयीन कर्तृत्वाला उजाळा दिला होता. तरुण भारतच्या रविवार पुरवणीत त्यांच्यावरील माझा लेख छापून आला त्याच दिवशी रात्री सुमारास माझा मोबाइल वाजला. पलीकडून कुणी अमरावतीहून बोलत होतं त्यांचं म्हणणं होतं, 'यादवांनी संतसूर्य तुकाराम या कादंबरीत तुकारामाची बदनामी केली आहे. त्यामुळे यादवांवर लोक चिडलेले आहेत, त्यांना या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बसण्याचा अधिकार नाही.' त्या फोनचं मला आश्चर्य वाटलं आणि मी त्याकडे दुर्लक्षही केलं. कारण संतसूर्य तुकाराम ही कादंबरी प्रकाशित होऊनही तीन चार वर्षं उलटली होती. या मधल्या काळात कुणीही हा मुद्दा उपस्थित केला नव्हता. त्यानंतर सतत वर्तमानपत्रांतून याविषयी लिहून येऊ लागलं. आणि शेवटी वारकऱ्यांनी जाहीर केलं की - 'आनंद यादव यांनी या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा. अन्यथा काहीही झालं तरी आम्ही हे संमेलन होऊ देणार नाही. ' आयोजकांची आणि महामंडळाचीही मोठी पंचाईत झाली. मध्यंतरी आनंद यादवांनी देहूला जाऊन तुकारामांच्या चरणांवर डोकं टेकवून आपली ही कादंबरी परत घेतली. तुकारामांची माफी मागितली. पण वारकरी काही ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यावर्षीचा लाभसेटवार साहित्यसन्मान मला मिळाला होता आणि त्या पुरस्कार वितरण सोहळ्याला आनंद यादव प्रमुख पाहुणे म्हणून येणार होते. यादव नागपुरात आल्यानंतर कार्यक्रमस्थळी कुठला अपप्रकार घडू नये म्हणून आम्ही पोलीस बंदोबस्त ठेवला होता. पण एवढं करूनही या कार्यक्रमाला यादवांचं येणं जोखमीचं होतं. म्हणून त्यांनी येऊ नये असं आम्हांला वाटत होतं. तसा आम्ही त्यांना निरोपही दिला आणि तेही आले नाहीत. तेव्हा मोठ्या संकटातून सुटल्याचा आम्ही निःश्वास यकला. कारण कुठलं अघटित कसं आणि कधी घडेल हे सांगता येत नव्हतं. यादवांनी अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा म्हणून वारकरी सर्वत्र मागणी करीत होते. त्यांच्या घरावर चालून जाण्यापर्यंत त्यांची मजल गेली. इतकंच नव्हे तर त्यांच्या घरी अश्लील फोन जाऊ लागले. त्यांच्या घरच्या मंडळींना त्याचा प्रचंड त्रास होऊ लागला. शेवटी यादवांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, तेव्हाच सगळं वातावरण निवळलं. महाबळेश्वरचं साहित्यसंमेलन अध्यक्षाविनाच पार पडलं. या काळात अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे अनेक महापुरुष आपापल्या कुटींमध्ये दडून बसले होते. एकट्या प्राचार्य राम शेवाळकरांनी फक्त काय ती सामंजस्याची भूमिका घेतली होती. तसं आवाहन त्यांनी एक पत्रक काढून केलं होतं. मधल्या काळात यादवांच्या नटरंगवर चित्रपट आला. राष्ट्रीय पातळीवर तो गाजला. त्यातली गाणी रसिकांच्या ओठांवर खेळू लागली. व्यावसायिक यशही या चित्रपटाला भरपूर मिळालं. महाबळेश्वरच्या साहित्य संमेलनाच्या