पान:निवडक अंतर्नाद.pdf/२३१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भारतातील सत्तेची सर्व सूत्रं इंग्लंडमधूनच हलवली जातात, हे त्यांना ठाऊक असल्याने त्यांनी इंग्लंडमध्ये परतायचा व तिथे राहून वकिली करता करताच स्वातंत्र्यासाठी लढा उभारायचा निर्णय घेतला. फेब्रुवारी १९०५ मध्ये श्यामजींनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी लंडनमध्ये इंडियन होमरूल सोसायटी स्थापन केली. भिकाजी कामा, एस. आर. राणा, लाला लजपतराय आदींचा त्यांना जोरदार पाठिंबा होता. त्याच वर्षी श्यामजींनी लंडनमध्ये इंडिया हाउस स्थापन केलं. इंडिया हाउसचा अधिकृत उद्देश लंडनमध्ये शिकायला येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल म्हणून वापर करण्याचा होता; पण लौकरच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जहाल क्रांतिकारकांचा तो प्रमुख अड्डा बनला. वि. दा. सावरकरांना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती द्यावी अशी विनंती लोकमान्य टिळकांनी श्यामजींना केली होती व त्यानुसार श्यामजींनी सावरकरांना तशी शिष्यवृत्ती दिली. स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा आदी क्रांतिकारकांची तिथे नेहमी ऊठबस असे. त्या सर्वांचे, तसेच भारतात राहून लढणाऱ्या भगतसिंग यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांचे श्यामजी कृष्ण वर्मा हे प्रेरणास्थान होते. पुढे १९१० साली सावरकरांना अटक झाली तेव्हा त्यांची सुटका व्हावी म्हणून श्यामजींनी युरोपात दबाव गट तयार केला होता. भारतीय स्वातंत्र्याला युरोपिअन जनतेचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांनी केलेल्या अथक कार्याचं महत्त्व आपल्याकडे फारसं ठाऊक नसलं, तरी ते खूप होतं, कारण युरोपिअन जनमताचा प्रभाव ब्रिटिश सरकारवर पडतच होता. खुद्द ब्रिटनमध्ये श्यामजींना मानणारा ब्रिटिशांचा मोठा गट होता. हाउसची सूत्रं त्यांनी सावरकरांच्या हाती सुपूर्द केली होती. फ्रेंच सरकारने श्यामजींचा ताबा आपल्याला द्यावा म्हणून ब्रिटिशांनी प्रयत्न सुरू केले. सुरुवातीला फ्रेंच सरकारने त्यांना दाद दिली नाही, पण पुढे पहिले महायुद्ध सुरू झाल्यावर फ्रेंच सरकारचाही नाइलाज झाला. त्याचवेळी, म्हणजे १९१४ साली, श्यामजी पॅरिस सोडून जिनिव्हाला राहायला गेले. स्वित्झर्लंड हे महायुद्धात तटस्थ राष्ट्र असल्याने त्यांना तिथे आश्रय घेता आला. श्यामजींनी लंडनमध्ये इंडिया हाउस स्थापन केलं. इंडिया हाउसचा अधिकृत उद्देश लंडनमध्ये शिकायला लंडनमधील Inner Temple मधून श्यामजींना १९०९ साली त्यांच्या क्रांतिकारी हालचालींमुळे काढून टाकण्यात आलं. कोर्टात वकील म्हणून उभं राहण्यासाठी हे सदस्यत्व आवश्यक असायचं, खूप नंतर म्हणजे २०१५ साली, ह्या Inner Templeने त्यांचं सदस्यत्व रद्द करायचा निर्णय, मरणोत्तर का होईना, पण मागे घेतला व त्यांना मरणोत्तर सन्माननीय सदस्यत्व दिलं गेलं; श्यामजींच्या कर्तृत्वावर पुन्हा शिक्कामोर्तब केलं गेलं. पुढे श्यामजींची तब्येत झपाट्याने ढासळू लागली. ३० मार्च १९३० रोजी त्यांचं जिनिव्हा इथेच निधन झालं. तत्पूर्वी जिनिव्हाच्या स्थानिक प्रशासनाशी व तेथील सेंट जॉर्जेस स्मशानभूमीच्या अधिकाऱ्यांशी बोलून श्यामजींनी त्यांच्या व पत्नीच्या अस्थी भारत स्वतंत्र झाल्यावर भारतातच पाठवल्या जाव्यात व आपल्या जन्मगावी पुरल्या जाव्यात अशी इच्छा व्यक्त केली व भारत कधी स्वतंत्र होईल याची खात्री नसल्याने त्या अस्थी जिनिव्हातच पुढील शंभर वर्षांसाठी जतन कराव्यात अशी व्यवस्था केली. त्यासाठी आवश्यक ते पैसेही त्यांनी भरले. त्यांच्या निधनाची • बातमी ब्रिटिशांनी गुप्त ठेवली होती; पण देशातील जहाल क्रांतिकारकांपर्यंत ती पोचली होती व त्यावेळी लाहोर तुरुंगात बंदिस्त असलेल्या भगतसिंग व अन्य क्रांतिकारकांनी त्यांना तुरुंगातच श्रद्धांजलीही वाहिली होती. येणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल म्हणून वापर करण्याचा होता; पण लौकरच स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या जहाल क्रांतिकारकांचा तो प्रमुख अड्डा बनला. स्वातंत्र्यवीर सावरकर, मदनलाल धिंग्रा आदी क्रांतिकारकांची तिथे नेहमी ऊठबस असे. त्या सर्वांचे, तसेच भारतात राहून लढणाऱ्या भगतसिंग यांच्यासारख्या अनेक क्रांतिकारकांचे श्यामजी कृष्ण वर्मा हे प्रेरणास्थान होते. १९०५ मध्येच श्यामजींनी द इंडियन सोशिऑलॉजिस्ट हे मासिक सुरू केलं. मासिकाचं उपशीर्षक होतं : स्वातंत्र्याचे मुखपत्र • राजकीय, सामाजिक आणि धार्मिक सुधारणा, त्यातून भारतीय व ब्रिटिश राजकारणाविषयी जहाल मतं मांडली जात, लौकरच ब्रिटिश सत्तेच्या ते डोळ्यात आलं व श्यामजींना अटक करायचं ठरलं. ही बातमी श्यामजींच्या कानावर गेली व अटक टाळण्यासाठी ते १९०७ साली पॅरिसला गेले. जातेवेळी इंडिया २३० निवडक अंतर्नाद १९४७ साली भारत स्वतंत्र झाला, पण दुर्दैवाने त्यानंतरही ह्या महान क्रांतिकारकाच्या अस्थी भारतात परत आणायचं कोणालाच सुचलं नाही. तत्कालीन सरकार तर ह्याबाबत पूर्ण उदासीन होतं. अखेर २२ ऑगस्ट २००३ रोजी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी ह्याबाबत पुढाकार घेतला. ते जिनिव्हाला गेले आणि त्यांनी त्या अस्थी गुजरातमध्ये आणल्या. संपूर्ण राज्यभर त्या मिरवणुकीने फिरवल्या गेल्या व नंतर श्याम जींच्या इच्छेनुसार मांडवी ह्या त्यांच्या जन्मगावी आणल्या गेल्या. पुढे २०१० साली ह्याच ठिकाणी भव्य अशा क्रांतितीर्थची उभारणी पूर्ण झाली. इंडिया हाउस, इंडियन होमरूल सोसायटी ही नावं केव्हातरी इतिहासात ओझरती वाचनात आली होती. पण ह्या सर्वांचे जनक श्यामजी कृष्ण वर्मा हे होते हे मात्र मला ठाऊक नव्हतं. कच्छचं रण आणि अहमदाबादचा पतंगोत्सव बघणं महत्वाचं ह्येतंच, आणि त्यासाठीच आम्ही गुजरातचा दौरा आखला होता; पण ह्या निमित्ताने एका श्रेष्ठ पण माझ्यासाठी अज्ञात राहिलेल्या क्रांतिकारकाशी परिचय झाला याचा आनंद सर्वाधिक होता. त्यांच्या स्मृतीला उशिरा का होईना, पण वाहिलेली ही श्रद्धांजली. (ऑगस्ट २०१७)