पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

फायद्यातोट्याचा विचार न करता संघर्ष करण्याची एस. एम. ची मानसिकता मला आवडली. १९४८ साली नाशिकला मामांच्या घरी काही दिवस असताना जवळच भरणाच्या राष्ट्रसेवादलाच्या शाखेत मी जाऊ लागलो, परंतु सहा महिन्यांतच आम्ही पुन्हा बीडला परत आलो. त्यानंतर बरीच वर्षे राष्ट्रसेवादलाचा संपर्क आला नाही. बीडला सेवादलाची नियमित शाखा आम्ही चालवत होतो. मात्र मध्यवर्तीशी त्याचा काही संबंध नव्हता. त्या शाखेवर अनेकांची भाषणे होत. त्यात विचाराने लोकशाही समाजवादी असलेले बाबासाहेब परांजपेही होते. परंतु माझे वय राजकीय तत्त्वज्ञान समजण्याचे खचितच नव्हते. चळवळीच्या काळात काँग्रेसचे हंगामी प्रमुख बनलेल्या मामा देवगिरीकरांनी काँग्रेस सेवा दलाचे विसर्जन जाहीर केले, त्यामुळे स्वतंत्र युवक संघटना स्थापन करण्याची गरज वाटू लागली. एस. एम., नानासाहेब गोरे व शिरुभाऊ लिमये यांनी ही जबाबदारी स्वीकारण्याचे ठरवले. राष्ट्रसेवादलाचे काम बेचाळीस ते सत्तेचाळीसपर्यंत व्यवस्थित चालले. बेचाळीसच्या चळवळीत तोडफोडसुद्धा करणारे समाजवादी कार्यकर्ते नेते असलेले राष्ट्रसेवादल ही वाढणारी शक्ती असली तरी ती मंगल आहेच की नाही, अशी शंका शंकरराव देवांच्या मनात निर्माण झाली व ती त्यांनी बोलून दाखवली, त्यामुळे राष्ट्रसेवादल काँग्रेसपासून स्वतंत्र झाले. आपला कार्यक्रम स्वतंत्रपणे सेवादलाने राबवावा, फक्त निवडणुकीच्यावेळी आणि महत्त्वाच्या राजकीय प्रश्नांबद्दल मात्र समाजवादी पक्ष ही आपली राजकीय आघाडी आहे, असे सेवादलाने मानावे, असा सल्ला आचार्य जावडेकरांनी दिला. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संघटना खूप जोरात फोफावत असल्यामुळे सेवादलाचे कार्य वाढवण्याची गरज समाजवादी नेत्यांना वाटत होती. १९६० साली मी एम.ए. झालो आणि लातूरच्या दयानंद महाविद्यालयात मराठी विषय शिकवू लागलो. त्यावेळी बापू काळदाते राष्ट्रसेवादलाचे पूर्ण वेळ सेवक होते. महिन्या दोन महिन्यांनी त्यांची लातूरला फेरी होई. लातूरला राष्ट्रसेवादलाची शाखाही असे आणि सेवादलाच्या विचारांना मानणारी व समाजवादी कार्यकर्त्यांबद्दल सहानुभूती बाळगणारी निरनिराळ्या व्यवसायांत असलेली काही माणसेही होती. त्यामुळे लातूर राष्ट्रसेवादलाच्या कार्याचे एक केंद्र बनले होते. याच काळात वरळीला सरदार पटेल स्टेडियमवर राष्ट्रसेवादलाचा भव्य क्रीडा मेळावा भरला होता. या मेळाव्याला मी गेलो होतो. मेळाव्याच्या समारोपासाठी महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल श्रीप्रकाश आले होते. त्यांच्या पहिल्या रांगेच्या मागच्याच रांगेत मी बसलेलो होतो. राज्यपालांच्या शेजारी बसलेले एस. एम. त्यांच्याशी बोलत होते. दोघेही एकमेकांना पहिल्या नावाने संबोधत होते. मला त्याबद्दल आश्चर्य वाटत होते. नंतर अनेक वर्षांनी कळले, की श्रीप्रकाशांच्या घरीच समाजवादी पक्षाच्या स्थापना - तयारीची बैठक झाली होती. श्रीप्रकाश समाजवादी विचारांच्या आणि नेत्यांच्या स्नेहात होते. एस. एम. नी २२४ निवडक अंतर्नाद बोलताबोलता श्रीप्रकाशांना प्रश्न केला की राज्यसभेवरील नेमणुका करताना राजकारणात नसलेल्या पण समाजोपयोगी काम करणारांचा विचार का होत नाही?' श्रीप्रकाशांनी विचारले, 'तुझ्या मनात असे एखादे नाव आहे काय?' एस. एम. नी संततिनियमनाच्या प्रचाराचे काम सातत्याने करणाऱ्या शकुंतलाबाई परांजप्यांचे नाव सुचवले. थोड्याच दिवसांनी शकुंतलाबाईंची राज्यसभेवर नेमणूक झाली. एस. एम. च्या शब्दाला त्यांची निःस्वार्थवृत्ती जाणणाऱ्या मंडळीत केवढे महत्व आहे, हे मला कळले. पुढे मी समाजवादी पक्षाचे काम रीतसर करू लागलो. फारसा क्रियाशील नव्हतो, जवळपास सहानुभूतीदाराचेच काम होते; पण थोडा अधिक वेळ त्यासाठी देऊ लागलो होतो. समाजवादी पक्षाच्या दोनतीन मेळाव्यांत-अधिवेशनांत एस. एम. ना पाहण्याची संधी मिळाली तेव्हा एस. एम. विषयी कार्यकर्त्यांच्या मनात किती प्रेम आहे, हे लक्षात आले. हडपसरच्या मेळाव्यात बाबा आढाव यांनी राजकीय पक्षाच्या माध्यमातून समतेची चळवळ पुढे नेणे क्य आहे, त्यासाठी आंदोलनाचे मार्गच स्वीकारावे लागतील, अशी भूमिका मांडली होती. त्या चर्चेच्या नंतर शेवटी एस. एम. नी दोन्ही मार्ग एकमेकांच्या हातात हात घालून स्वीकारणे कसे आवश्यक आहे, याबद्दल आपले मत मांडले होते. एस. एम. च्या राजकीय जीवनाचा प्रारंभ 'युथ लीग' नावाच्या युवक संघटनेत झाला होता. जातीयवादाविरुद्ध संघर्ष, संपूर्ण स्वातंत्र्यासाठी लद्य आणि स्वदेशीचा वापर अशा तीन प्रतिज्ञा या संघटनेचे युवक घेत होते. या संघटनेच्या परिषदांना सुभाषचंद्र बोस आणि जवाहरलाल नेहरूसुद्धा येत असत. विशीपंचविशीतच एस. एम. चा राजकारणातला सहभाग सुरू झाला. कठीण आर्थिक परिस्थितीशी सामना देत, चळवळीतून वेळ मिळेल तेव्हा अभ्यास करीत, त्यांनी शिक्षण चालू ठेवले होते. फारसे वक्तृत्व नव्हते; आपले भाषण मुद्दाम आकर्षक करण्याची सवयही नव्हती; पण प्रतिपादनात त्या विषयासंबंधी केलेला विचार आणि तळमळ प्रगट होत असे. मनाचा नितळपणा आणि पूर्णपणे निःस्वार्थवृत्ती हे एस. एम. चे गुण त्यांच्याबद्दल विलक्षण प्रेम निर्माण करण्याला कारणीभूत होते. पर्वती हे आता पुणे शहरात आलेले देवस्थान, त्यात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्यांना प्रवेश मिळावा यासाठी आपल्या मित्रांसह एस. एम. नी सत्याग्रह केला आणि त्यात सनातन्यांनी केलेल्या मारहाणीत डोकेही फोडून घेतले. किडकिडीत शरीरयष्टी असलेल्या; पण वृत्तीने निर्भय असलेल्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या रंगाने गोरे असलेल्या, नितळ स्वभावाच्या या तरुणाने तत्कालीन अनेक तरुण मुलींच्या मनात स्थान मिळवले असणार, पण आपल्या पुढील कर्तव्याचा आणि जीवनातल्या आपल्या प्राधान्यांचा कधीही विसर न पडू देणारा हा तरुण या तारुण्यसुलभ भावनेला निग्रहाने दूर सारत होता. शेवटी एक शाळेत शिक्षिकेचे काम करणाऱ्या तारा पेंडसे या तरुणीच्या आराधनेला यश आले. संसार मांडण्यासारखी आपली आर्थिक परिस्थिती नाही, हे स्पष्टपणे एस. एम. नी अनेक वेळा सांगूनही ताराबाई आपल्या निश्चयापासून मागे ढळल्या नाहीत. निमंत्रणपत्रिकाही न काढलेल्या व गोखले हॉलमध्ये १९३९ साली संपन्न झालेल्या या विवाहास अनेक मंत्री, विविध