पान:निवडक अंतर्नाद.pdf/२२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

डोळा वाटुली संपेना... इथे रंगली पंगत मिटक्यांची, भुरक्यांची; साधासुधा माझा हात बाळजीभ अमृताची; इथे चालला अभ्यास इथे झाली भातुकली गोष्टी, गाणी नि मस्करी खोली भरून राहिली; इथे घडले पतंग इथे फिरला भोवरा इथे हदगा मांडला इथे खुडला मोगरा; खेळा-शाळेच्या मागून दूर दूर दिसाकाठी सांजावता दारामध्ये कमरेला घट्ट मिठी दिसामाशी वाढताना घर झाले हे लहान पालवीत पंख नवे गेली याच दारातून सांज टळली तरीही दार लावावे वाटे ना 'वळेल का कुणी मागे?' डोळा वाटुली संपेना... संपावया हवी वाट लावायला हवा दिवा पोटासाठी मुकाट्याने हवा टाकायला तवा डोळा वाटुली संपेना... इंदिरा गेली अनेक वर्षे मराठी काव्यप्रांतात आपल्या स्वयंभू तेजाने तळपणारे एक ठळक, ठसठशीत कविनाम चार तपांहून अधिक काळ इंदिराबाई आपले कवितालेखन करत आहेत. एकोणीसशे चाळीस साली सहवास या समर्पक नावाने इंदिरा संत आणि ना. मा. संत ह्या संत दांपत्याच्या कवितांचा एकत्रित असा संग्रह प्रसिद्ध झाला. तो इंदिराबाईंच्या कवितेचा पहिलावहिला अविष्कार होता. 'सहवास' मधल्या इंदिराबाईंच्या कवितांवर समकालीन काव्यसंकेतांची छाया पडलेली होती. ती तशी असणे स्वाभाविकही होते. पण त्या कवितांतूनही ओवीबद्ध रचना, भावनेचा सच्चेपणा, सहज सोपी पण आपल्या साधेपणानेच मनाला जाऊन भिडणारी मृदुकोमल रचना हे इंदिराबाईंचे काव्यगुण प्रकट होऊ लागले होते. संत दांपत्याचे एकमेकांवरील उत्कट प्रेम, उभयतांची काव्यात्म वृत्ती आणि तरुण वयातच अंकुरू लागलेला कवितेचा ध्यास - या सर्व गोष्टींचा प्रत्यय त्यात येतो. आपल्याला लाभलेल्या सफल प्रेमजीवनाविषयीची तृप्तीही तिथे आढळते. तथापि विवाहानंतर अवघ्या दहा वर्षांतच इंदिराबाईंचे पती ना. मा. संत यांचे दुर्दैवी निधन झाले आणि इंदिराबाईंवर दु:खाचा प्रचंड डोंगर कोसळला. या दारुण घटनेने त्यांचे संथ, सुरक्षित जीवन जसे उलटे-पालटे झाले तसे त्यांच्या कवितेनेही अंतर्बाह्य वेगळे रूप धारण केले. आनीतून तावून निघालेले सोने जसे अधिकच लखलखते, त्याप्रमाणे यानंतर लिहिली गेलेली इंदिराबाईंची कविता एक अनपेक्षित झळाळी घेऊन अवतीर्ण झाली. प्रियकराचा अकाली झालेला वियोग आणि त्यामुळे आलेले अपार एकाकीपण यांच्या दुःखाला इतक्या उत्कटपणे, इतक्या विविध रूपांनी आणि इतक्या वेगवेगळ्या प्रतिमांतून मराठी कवितेत यापूर्वी कधीही उदार मिळालेला नव्हता. सहवास नंतर प्रकाशित झालेले शेला, मेंदी, मृगजळ यांसारखे संग्रह म्हणजे विरहदुःखाच्या व्यथेचे अत्यंत तीव्र, तीक्ष्ण, विविधांगी आविष्कार आहेत. इथून पुढच्या इंदिराबाईंच्या कवितेचे जसे अंतरंग बदलले, तशी तिची शब्दकळाही पार पालटली. पूर्वी साध्या सहज भाषेत बोलणारी त्यांची कविता आता प्रतिमांच्या भाषेत बोलू लागली. निसर्गाची विविध रूपेच आता प्रतिमा बनली. त्याखेरीज खास इंदिराबाईंचे म्हणून अनेक भावनाकारही ( Motifs) आता त्यांच्या कवितेत येऊ लागले. वाट, रात्र, नक्षत्रखचित आकाश, माळ, तृण, नागीण, ऋतुंचे बदलते रंग अशा प्रतिमा या कवितांत वारंवार भेटतात आणखी एक महत्वाची प्रतिमा 'माती' ही आहे कवयित्रीचे या मातीशी जडलेले नाते केवळ या जन्मापुरते नाही, इंदिरा ते जन्मजन्मांतरीचे आहे. आपल्या 'मृण्मयी' कवितेत कवयित्री म्हणते - रक्तामध्ये ओढ मातिची, मनास मातीचे ताजेपण मातीतुन मी आले वरती, मातीचे मम अधुरे जीवन इंदिराबाईंच्या कवितेतील निसर्गप्रतिमा या केवळ निवडक अंतर्नाद २१