पान:निवडक अंतर्नाद.pdf/१९३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सीमावासीयांच्याविषयी त्यांच्या मनात अतिशय आदरभाव होता. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात मराठीसाठी महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या बाबूराव ठाकूरांपासून ते किरण ठाकूरांपर्यंत सर्वांच्याविषयी त्यांच्या मनात आपुलकी होती. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असताना सीमाप्रश्नासंबंधी साहित्य महामंडळात आणि सरकारपुढे आपल्या मर्यादशील परंतु कणखर भूमिकेचे त्यांनी सतत भान ठेवले. सीमाभागातल्या आणि चळवळीशी संबंधित एका ज्येष्ठ लेखकाला म. सा. प.च्या वार्षिक समारंभात सन्मानित करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली. मराठी माणसांची मुस्कटदाबी करणाऱ्या कन्नडिगांना त्यांच्या धारदार लेखणीतून त्यांनी अनेकदा फटकारले. साहित्य संमेलनाच्या संयोजनात त्यांचा हातखंडा होता. एखाद्या मॅनेजमेंट गुरूप्रमाणे ते लहान-सहान तपशिलांचा विचार करीत असत. साहित्यसंस्थांमध्ये धडाडीच्या कार्यकर्त्याची भूमिका बजावणाऱ्या डॉ. जोगळेकरांना लेखनासाठी फारशी उसंत मिळाली नाही. त्यांनी मोजके लिहिले, पण पुढच्या अनेक पिढ्यांना उपयोगी पडेल असे लिहिले. अभिनव भाषाविज्ञान, मराठी वाङ्मयाचा अभिनव इतिहास भाग १ व २ (संपादन, लेखन), मराठी टीकाकार, मराठी भाषेचा इतिहास, साहित्य समीक्षा-स्वरूप आणि विकास या त्यांच्या ग्रंथांमुळे अभ्यासक आणि संशोधक कायम त्यांच्या ऋणात राहतील. संस्थात्मक कार्यात सहभागी न होता साहित्यसंस्थांवर टीका करणाऱ्या लोकांना ते सुनावत असत. "प्रवाह्यत सामील व्हा. संस्था चालविण्यातल्या अडचणी समजून घ्या आणि मग बोला", अशा शब्दांत ते आपली भूमिका भल्याभल्यांना तोंडावर ऐकवीत असत. या साऱ्यामागे एक कळकळ होती, ते त्यांच्या प्रदीर्घ अनुभवाचे बोल होते. ते हट्टी होते, पण तो त्यांचा हट्ट रचनात्मक आणि चांगल्या कामासाठी होता. तपशीलवार सांगत होते. चित्रपटाच्या कथानकाच्या मागची कथा त्यांना तोंडपाठ होती. या प्रवासात असंख्य हिंदी गाणी त्यांच्याकडून ऐकायला मिळाली. हिंदी चित्रपटावरून विषय जेव्हा मराठी चित्रपटांवर आला, तेव्हाही जोगळेकरसर तितकेच समरसून बोलत होते. गीतांचा, गीतकारांचा संगीतकलेचा इतिहास त्यांना माहीत होता. गीतांवरून विषय कवितांवर आला होता, तेव्हा त्यांच्या पाठांतराला सलाम करावा अशीच परिस्थिती होती. प्रवासातल्या या गप्पांचं ध्वनिमुद्रण व्हायला हवं असं मला सारखं वाटत होते. या प्रवासात जोगळेकरसर मिरासदारांच्या तोडीस तोड विनोद सांगत होते. या सर्वांमध्ये वयाने, अनुभवाने आणि कर्तृत्वाने मी सर्वांत लहान; पण जोगळेकरसरांनी मला एक छोटा मित्र म्हणून त्या मैफलीत सामावून घेतले होते. अशा वेळी या करारी माणसाच्या अंत:करणातले खळाळते निर्मळ पाणी दिसत असे आणि त्यांच्याविषयीचा आदर वाढत असे. एरवी धीर-गंभीर मुद्रेने समाजात वावरणाऱ्या डॉ. जोगळेकरांच्या अंतरंगात एक खोडकर, मिष्किल माणूस दडलेला असायचा प्रवासाला कुठे बाहेर निघाले, की मग त्यांचे एक वेगळेच दर्शन घडायचे. बार्शीच्या म. सा. प.च्या शाखेच्या उद्घाटनासाठी मी, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. वि. भा. देशपांडे आणि जोगळेकरसर पुण्याहून बार्शीला निघालो. या प्रवासात सरांच्या मोकळेपणाचा मी अनुभव घेतला. द. मा., वि. भा. आणि गं. ना. यांच्या पोतडीतून एकेक किस्से बाहेर पडत होते. शब्दबद्ध न झालेल्या महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचे दर्शन त्यांच्या बोलण्यातून घडत होते. जोगळेकरसरांनी तर आघाडीच घेतली होती. चित्रपटाचा विषय निघाला, तशी त्यांची कळी आणखीनच खुलली. जुन्या नट-नट्यांचा इतिहास ते अधिकारवाणीने १९२ • निवडक अंतर्नाद सर माणूसघाणे नव्हते, पण चुकीची कामं करणारी माण त्यांच्या आसपास बसली, की त्यांच्याशी ते फारशा आपुलकीने वागत नसत. 'मऊ मेणाहून आम्ही विष्णुदास' या तुकोबारायांच्या उक्तीला कृतीत उतरविणारे सर 'नाठाळाचे माथां देऊं काठी' या उक्तीचेही स्मरण ठेवत असत आणि अशा लोकांना त्यांच्या जागा दाखवून देत असत. एक निवृत्त प्राध्यापक एकदा परिषदेत आले. 'संस्थेला देणगी द्यायची आहे. पद्धत काय असते ? रक्कम कशी गुंतवावी लागते?' याची त्यांनी चौकशी केली. अमुक एका दिवशी येऊन 'चेक देतो' असेही सांगितले. निघताना स्वत:च्या पिशवीतून हळूच एक पुस्तक काढत ते डॉ. जोगळेकरांना म्हणाले, "मी पंधरावीस पुस्तके लिहिली आहेत. मला शासनाचा पुरस्कारही मिळाला आहे. पण आपल्या संस्थेने मात्र माझी दखल घेतली नाही. यावर्षी जर आपण माझ्या पुस्तकाचा पुरस्कारासाठी विचार केलात तर बरे होईल.” हे ऐकल्यानंतर काहीसा आवाज चढवत जोगळेकरसर त्यांना म्हणाले, "हे पहा, आमच्याकडे देणगी घेऊन पुरस्कार देण्याची प्रथा नाही. पुरस्कारासाठी ग्रंथांची निवड नेमलेले परीक्षक करतात, तुमचं पुस्तक पुरस्काराच्या योग्यतेचं असेल तरच पुरस्कार मिळेल. देणगी देऊन पुरस्कार मिळवू, अशा भावनेने तुम्ही आला असाल, तर तुमची देणगी आम्हांला नको आहे. या आता." त्या गृहस्थांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता. सर तीस वर्षे परिषदेसाठी काम करीत होते. पूर्वी दुचाकीवर येत असत, गेल्या काही वर्षांत रिक्षाने येत होते. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोनही वेळेला स्वखर्चाने रिक्षाने येत असत. गेल्या तीस वर्षांतल्या या फक्त प्रवासखर्चाचा जरी हिशोब मांडला तरी तो काही लाखांमध्ये जाईल. आर्थिक पदरमोड करून संस्थेसाठी झिजणारा असा व्रतस्थ कार्यकर्ता शोधूनही सापडणार नाही. साहित्यसंस्था समाजाच्या आर्थिक मदतीवर चालतात हे खरे असले तरी पैशासाठी संस्थांनी स्वतःची तत्त्वे गहाण यकावीत, तडजोड करावी या गोष्टीला ते कडाडून विरोध करीत असत. अशा संस्थांमध्ये नाना प्रवृत्तींची माणसं अनेक हेतू मनात बाळगून येत