पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

विश्राम चिंतामण बेडेकर जन्म : १३ ऑगस्ट १९०६, निधन ३० ऑक्टोबर १९९८ सहजीवन... शेजारी आणि अमरभूपाळी या श्रेष्ठ पटकथा, रणांगण... 'रणांगण' शी मी अडलो तेव्हा बेडेकर भेटले. डेक्कनक्वीनच्या प्रवासात गप्पांच्या ओघात त्यांनी एक कथाकल्पना सांगितली. ती ऐकताच मी सावरून बसलो. भारावून म्हणालो, 2237 "बेडेकर, यावर अप्रतिम कादंबरी होईल. रणांगणसारखी.” "खरं म्हणता?” माझ्या विचारांचं आवर्तन पुरं झालं, 'रणांगण' नंतर बेडेकरांनी पुन्हा कथा-कादंबरी का लिहिली नाही याचं एक कारण कळलं. 'रणांगण' चं अफाट यश त्यांना सतावत असावं असावं? की साध्या लेखनापेक्षा परफॉर्मिंग आर्टस्मध्येच त्यांची प्रतिभा चालते? नाटकातले प्रवेश, सिनॅरीयोतले सीन्स त्यांना आधीच दिसतात? टिळकांच्यावरील डॉक्यूमेंटरी करीत असलेले, 'लाखाराणी' दिग्दर्शित करीत असलेले मनस्वी बेडेकर मी बघितले होते. नाटकाच्या तालमी घेताना त्यांचे प्रकटणारे रूप मोठे मोठे नट व निर्माते रंगवून सांगत होते. याचं माध्यम दृक्श्राव्य हा कलावंत नाटकाच्या व चित्रपटाच्या दिग्दर्शनातच रमतो, रंगतो (रेखाटन

बाळ ठाकूर) पुन्हा कुतूहल, पुन्हा कोडी. वाटलं, बेडेकरांना भेटावं, भेटत राहावं. नाटकाच्या तालमीचे वेळी, सिने-शूटिंग सुरू असेल तेव्हा, संवादात भरबदल, काटछाट करताना बघावं. त्यांच्या मनाचा मागोवा घ्यावा. पण माझा स्वभाव आड आला. इतर उद्योगही कलावंत, लेखक, बेडेकर बरेचसे अज्ञातात, अंधारातच राहिले. खेरीज माझ्यासारख्या सामान्य इसमासाठी त्या थोर कलावंताने आपला अमूल्य वेळ दवडावा हेसुद्धा... तरी वाटतं या माणसाची व आपली मैत्री व्हायला हवी. वारंवार भेटीगाठी घडायला हव्यात. विशेषतः काही निमित्ताने त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं, त्यातील अखरेच्या तीन ओळींच्या मजकुरामुळे तर मुद्दामच. "तुमच्या भेटी झाल्याचं समाधान माझ्या ध्यानात आहे. त्या प्रत्येक वेळी तुमच्या विशेष परिचयाची संधी हुकली अशी चुटपुटही मनाला लागून राहिली. तुम्ही आता मनावर घेतलंत तर हे एक असमाधान नाहीसे होईल..." (फेब्रुवारी, १९९९) निवडक अंतर्नाद १८१