पान:निवडक अंतर्नाद.pdf/१८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

साक्षात्काराच्या कल्पनांना कवटाळून बसलो. बेडेकर बोलत आहेत त्यामागे पद्धतशीर बेफिकीरी आहे, असं मला भासू लागलं. बेछूटपणा, कदाचित कडवटपणा पण वरवरचं शल्य नाही, तर खोलवरची वेदना. त्या वेदनेला आलेलं 'सिनिक' स्वरूप सांभाळण्याचं सोंग.. मला अर्थात् 'रणागंण' ची आठवण झाली. एव्हाना 'रणांगण' ची दुसरी आवृत्ती बाजारात आली होती व त्यावर लेखक म्हणून विश्राम बेडेकरांचं नाव स्पष्टपणे छापलेलं होतं. आता ते पितृत्व नाकारू शकत नव्हते. मातृत्व, मूळ... बेडेकरांनी त्या अभिजात कलाकृतीचं जन्मरहस्य झटकन सांगून टाकलं. "इंग्लंडहून आलो होतो अन् सोलापूरला बाळूताईच्या बंगल्यावर रिकामा बसलो होतो. ती दिवसभर कामात आणि मी घरी उपऱ्यासारखा, निरुद्योगी, तिने लिहिलेल्या पुस्तकांची पारायणं करीत. तिला प्रसिद्धी, कौतुक खूप मिळत होतं. आपल्या लिखाणाबद्दल अभिमान, गर्वही होता. मला त्या लेखनात अनेक दोष दिसायचे, ते मी दाखवायचाही. पण नुसतं टीका करायला काय जातं? स्वत: काही न लिहिता... म्हटलं, कादंबरी कशी लिहायची हे दाखवावंच. म्हणून, अन् वेळही मोकळा होता म्हणून 'रणांगण' लिहिली. " कसा रिकामटेकड्याचा, चुटकीसारखा खेळ आहे असंच बेडेकरांनी बोलताना जणू सुचवलं. नेहमीसारखी कलती मान करून रोखून पाहिलं. मिश्कील स्मितही केलं. मग सगळं मनातून काढून टाकल्याचा आविर्भाव केला. मला हसू आलं. सगळं मनात घट्ट जाऊन बसलं, हा इसम जातिवंत कलावंत आहे. प्रतिभेचं याला दैवी देणं आहेच, पण जादूगाराचं कसबही याचेजवळ आहे. जीवनातलं याला काही वेगळं कळलं आहे. एका दृष्टीने हा सर्वांपासून मुक्त आहे. एका अर्थाने हा आयुष्याचा खेळ मस्तीत खेळत आहे दाद, मान्यता सारं फालतू आहे वगैरे... मग एकदम म्हणाले, "एवढे सगळे रणागंण ला डोक्यावर घेतात. पण इतक्या वर्षांत मला त्याबद्दल डझनभरसुद्धा पत्रं आली नाहीत..." नंतरच्या एका भेटीत बेडेकर आणिक मोकळे झाले. प्रभातने शिस्त, शिरस्ता वगैरे जी जी घडी घालून दिली होती ती ती सारी, सर्वाधिकार मिळताच, त्यांनी मोडली असं मी ऐकत होतो. त्याबद्दल मी त्यांना विचारलं तेव्हा त्यांनी त्याचा इन्कार केला. 'चूल आणि मूल' चित्रपटासाठी गाणी आपण एकटाकी कशी लिहिली हे ते खुलवून सांगू लागले. असल्या शीघ्रकवित्वाला फार कसब लागत नाही, असंही बजावून आणिक किस्से सांगू लागले. सारं निरर्थक, सोपं आहे इत्यादी... शिस्त, शिरस्ता, तपश्चर्या, १८० निवडक अंतर्नाद मला गंमत वाटली, "अहो, मी तीस-पस्तीस वर्षं कथांचे रतीब घालतोय. चारशेचेवर कथा मला डझनभरच पत्रं आली असतील. वाचकांची खुषीपत्रं येणं हे कित्येकदा धोकादायक..." "इंग्लंडहून आलो होतो अन् सोलापूरला बाळुताईच्या बंगल्यावर रिकामा बसला होतो. ती दिवसभर कामात आणि मी घरी उपन्यासारखा, निरुद्योगी. तिने लिहिलेल्या पुस्तकांची पारायणं करीत. तिला प्रसिद्धी, कौतुक खूप मिळत होतं. आपल्या लिखाणाबद्दल अभिमान, गर्वही होता. मला त्या लेखनात अनेक दोष दिसायचे. ते मी दाखवायचाही. पण नुसतं टीका करायला काय जातं? स्वतः काही न लिहिता... म्हटलं, कादंबरी कशी लिहायची हे दाखवावंच. म्हणून, अन् वेळही मोकळा होता म्हणून 'रणांगण' लिहिली.” हे सारं या गृहस्थाला माहीत नाही काय? 'रणांगण'चं व्हावं तेवढं कौतुक झालं नाही, त्याकाळी कुठलंसं बक्षीस मिळालं तेही दुसरं नि विभागून, 'ब्रह्मकुमारी' वरही अत्रेसारख्यांनी परीक्षणं लिहिली नाहीत अशा अनेक फुटकळ व फालतू तक्रारी या लेखकाला सुचतात हे पाहून मला काहीतरी समजल्यासारखं वाटलं. खूपसं कळून घ्यावंसं वाटलं. प्रतिभावान पण वेगळ्या व्यक्तिमत्त्वाच्या लेखकाचे मनोव्यापार व लेखनप्रकार, आमच्या अर्ध्या सटीसहामाहीच्या भेटीगाठीत आणि बेडेकरांच्या नाटका चित्रपटांतून मी त्यांच्या मनोरचनेचा चक्रव्यूह न्याहाळीत होतो. 'सेंड मी नो फ्लॉवर्स' ही परदेशी वस्तू त्यांनी घेतली याचं हीण, आणि त्याचं 'वाजे पाऊल आपुले' हे उत्कृष्ट नाटक बनवलं याचा हर्ष! फाशीच्या शिक्षेसारखा कठीण; सर्वव्यापी विषय व त्याच्यावरील 'नरो वा कुंजरो वा ' हे नाटक. कुठे तसं वरच्या दर्जाचं, अपूर्व, पण काही ठिकाणी ठिसूळ, अधांतरी... 'सोहराब रुस्तुम' हे ताकदीचं तितकंच चटपटीत चित्र, लोकमान्य टिळकांच्यावरील अभिनव, उत्कृष्ट डॉक्युमेंटरी, आगरकरांच्यावर चित्रपट काढण्याचा भव्य संकल्प आणि 'टिळक ● आणि आगरकर' हे खूप परिश्रम करून लिहिलेलं व दिग्दर्शिलेलं पण अनेक त्रुटी असणारं विवाद्य नाटक... आणि अर्थात रणांगण... •बेडेकरांच्या एकूण लेखन-दिग्दर्शनातच असं द्वंद्व दिसतं. खूप दिपविणारं अन् त्यातही उसनं असणारं; प्रतिभा पणाला लावलेलं, पण अडचणींनी अवघडलेलं... मला विश्राम बेडेकरांच्या एकूण आयुष्याबद्दलच अचंबा वाटू लागला. हा हिंदुस्थानातला पहिला दुसरा हस्ताक्षरतज्ज्ञ. हजारो रुपये कमविण्याची कला हस्तगत, पण अन्नान्नदशा दाखविणाऱ्या चित्रपटधंद्यात उडी... ऐन तारुण्यात दीनानाथ- कोल्हटकरांचा सहवास अन् चित्रपट-नाटकाने दिलेलं अपयश... दिलदार, लखपती, साहित्याची जाण असलेले प्रकाशक मोटे परममित्र व बंडखोर लिखाण करणाऱ्या तेजस्वी स्त्रीशी