पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

हे टोपण नाव घेऊन स्त्री जीवनावरील खळबळजनक लेखन करणाऱ्या बाळुताई खरे यांच्याशी बेडेकरांचा विवाह झाला आहे ही वार्ता साहित्य सांस्कृतिक जगात सनसनाटी ठरली, सुशिक्षित, साहित्यप्रेमी समाज बाळुताईंच्या लेखा- भाषणांची चर्चा करीत विश्राम बेडेकरांच्या पुढील लेखनकृतीची प्रतीक्षा करीत राहिला. बेडेकरांचं नाव यापूर्वी मी ऐकलं होतं, ते सिनेमा-नाटकांच्या संबंधात वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी त्यांनी 'ब्रह्मकुमारी' नावाचं नाटक लिहिलं होतं. मास्टर दीनानाथ, चिंतामणराव कोल्हटकर यांनी ते दिमाखदार बसवलं होतं. आता जरी त्यातली गाणीच गाजत असली तरी तेव्हा ते नाटक ही एक अभिनव साहित्यकृती समजली गेली होती. पुढे याच 'बलवंत' कलावंतांसाठी बेडेकरांनी 'ठकीचे लग्न आणि सत्याचे प्रयोग' हा, दोन वेगळ्या कथानकांचा विनोदी चित्रपट दिग्दर्शित केला होता. ‘ब्रह्मकुमारी' मी वाचलं नव्हतं, पण हा वेगळा बोलपट पुण्याच्या 'किर्लोस्कर' थिएटरात दोन-चार वेळा पाहिला होता. आचार्य अत्रे - मास्टर विनायक यांच्या कामगिरीच्या आधी कितीतरी वर्षे बेडेकरांनी दामुअण्णा मालवणकरांना पडद्यावर आणलं होतं, गडकरी-चिं. वि. जोशी यांच्या लेखनाला दृक्श्राव्य माध्यम दिलं होतं. अभिजात विनोदी सिनेमा काढण्याची करामत केली होती. यातच अकस्मात भर पडली. भोवरे उठले ते बेडेकरांना प्रभात फिल्म कंपनीमध्ये पाहिलं – तेव्हा! 'प्रभात' ही आम्हा सर्वांना प्रिय, पूज्य अशी संस्था होती. तेथील कलाकार व कारागीर माझे अभिजात, अभिनव असं नाटक, मग चित्रपट आणि मग कादंबरी विश्राम बेडेकरांचं नाव माझ्या लेखी फार महत्वाचं स्फूर्तीचा झटका, अवकाशातून येणारा अनुभूतीचा स्पर्श, काळजात उगवणारी कलाकल्पना, निर्मितीचं गूढ, प्रतिभेच्या परीसाचा चमत्कार, आकृतिबंधाचा आमच्या या भेटीमुळे बेडेकर माझे लेखनातले मार्गदर्शक होण्याऐवजी माझ्या झालं होतं. आदराचं, आणि कुतूहलाचंही... साक्षात्कार, कलाकाराच्या दैवी गुणाचं लेखी एक कुतूहलजनक कलाकार म्हणून गारुड... आजवर सर्जनशील ठरले. मित्र होते. तेथील कलाकृतींची जडणघडण मी जवळून न्याहाळीत होतो. अशा कलामंदिरात विश्राम बेडेकर, शांतारामबापू यांच्याकडे कथा-संवाद लिहायला व चित्रपटाचं तंत्र शिकायला आले आहेत ही घटना मला अर्थपूर्ण वाटली, प्रभात-बेडेकर युती मराठी चित्रपटसृष्टीचं भवितव्य अधिक उज्ज्वल करणार यात मला संदेह नव्हता... बेडेकर- शांतारामबापू यांच्यामधील जुगलबंदीचे किस्से कानावर येऊ लागले दुसऱ्याला चटकन चांगलं न म्हणणारे शांताराम आठवले व राजा नेने बेडेकरांनी लिहिलेल्या 'शेजारी' कथेच्या संवाद, सिनॉप्सीसची तोंड भरून तारीफ करू लागले... पायघोळ धोतराचा काचा, खांद्यावर कायमचा कोट टाकलेला, भक्कम शरीराला साजेसा व तरी जरा मोठा भासणारा जबडा - आपल्याच नादात प्रभात रोडवरून एकटे जाणारे, इंटरनॅशनल बुक डेपोत पुस्तकं चाळणारे, ई. म्युरॅटोर रेस्टॉरंटमध्ये शिरणारे विश्राम बेडेकर - एखाद्या ग्रीक पुतळ्याकडे पाहावं तसं मी व माझे स्नेही भारावून बघत राहिलो. - बाळुताईंची व माझी आधी बरीचशी ओळख होती. पहिल्या पुस्तकाच्या उत्साहात मी 'नजराणा' च्या प्रती ओळखीच्यांना वाटीत होतो, त्यात एक प्रत कुठल्याशा निमित्ताने बाळुताईंना आवर्जून दिली. पुढे त्या भेटल्या तेव्हा म्हणाल्या की, त्यांना वाचायला फुरसत मिळाली नाही, पण बेडेकरांनी त्या कथा वाचायची शिफारस केली आहे. बाळुताईंनी माझं पुस्तक वाचलं नाही याचं वाईट वाटण्याऐवजी बेडेकरांना 'नजराणा'तल्या कथा आवडल्या याचाच मला हर्ष झाला. मी मग एका रविवारी सकाळचा उठलो आणि प्रभात रोडवरच्या एका गल्लीतील 'मनुस्मृति' बंगल्याच्या दाराशी उभा राहिलो. 'नजराणा' ह्या माझ्या पहिल्या कथासंग्रहाच्या निमित्ताने बेडेकरांची भेट झाली. १७८ निवडक अंतर्नाद विश्राम बेडेकरांनी माझं स्वागत केलं. पण 'नजराणा' चा विषय त्यांनी काढला नाही. मी 'रणांगण' बद्दल बोलू लागलो तेव्हा म्हणाले की ती कादंबरी त्यांनी लिहिलीच नाही! 'नजराणा' तील कथांचा अखेर नाइलाजानं त्यांनी उल्लेख केला. एखाददुसरी उणीव दाखविण्यापुरता ! मला रागबिग आला नाही. उलट गंमत वाटत राहिली. बेडेकरांना माझ्या कथा आवडल्या होत्या हे त्यांच्या अर्धांगीने आधीच मला सांगितलं होतं, 'रणांगण' त्यांनीच रचलं आहे हेही मला विश्वासू ठिकाणाहून कळलं होतं. कलाकृतीबद्दल ऐकलेलं, वाचलेलं, मानलेलं हा माणूस मोडून टाकीत होता. 'रणागंण' नंतर पुढील चार पाच वर्षांत त्यांनी कथा-कादंबरी काही न लिहिल्याने कुतूहल या अभिजात लेखकाने लेखणी खाली ठेवावी याचं कुतूहल व किंतू, साहित्य सोडून सिनेमात रमलेला हा मनस्वी माणूस एखादा प्रतिभासंपन्न, प्रायोगिक चित्रपट तयार करील याबद्दल कुतूहल आणि काळजी. 'शेजारी'च्या पटकथेची पडद्यावर परवड झाली होती. शांताराम - जयश्री प्रकरणामुळे चित्रपटाचा तोल गेला होताच, पण 'शेजारी' ची मूळ कथा वि. चिं. बेडेकरांची नाही, तर वि. स. सुखठणकरांची आहे, असा दावा केला गेला होता. महापुराची शिकवण ही सुखठणकरांची कथा पुरावा म्हणून पुढे केली जात होती. दुसऱ्याच्या कथा- कल्पनेवर बेडेकरांनी प्रतिभेचा पसारा मांडावा हे मला त्या वेळी विचित्र, विषादपूर्ण वाटलं. प्रभातमध्ये • प्रलय झाला. राजा नेने वगैरे माझे मित्र बाहेर फेकले गेले. या घटनेने मी व्यथित झालो. पण विश्राम बेडेकर प्रभातमध्ये प्रस्थान ठेवून आहेत याने मुदितही झालो. 'रामशास्त्री'च्या चमकदार दिग्दर्शनात बेडेकरांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनीच पटकथा व दिग्दर्शन बांधेसूद केलं, हे कानावर आलं तेव्हा वाटलं की त्यांचा पुढील चित्रपट.. पण त्यांचं कथा- संवाद- दिग्दर्शन असलेलं प्रभात चित्र 'लाखाराणी' अनाकलनीय व