पान:निवडक अंतर्नाद.pdf/१७०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

चालू होता, जाऊन पाहिलं तर स्टुलावर बसून आई वर्तमानपत्र वाचत होती. मला पाहून गडबडून गेली. मग स्वत:ला सावरून विचारू लागली, "पाणी प्यायचं आहे?” आणि मी काही सांगायच्या आधीच ओगराळे घेऊन पाण्याचा पेला भरू लागली. पाणी पिऊन मी विचारलं, “आई, तू अजून झोपली का नाहीस?” "अं! झोप येत नव्हती तर इथे येऊन वाचत बसले, झोपते आता " "काय बोलतेस आई तू! केव्हाही पहा, अर्ध्या रात्रीसुद्धा तू स्वैपाकघरातच बसून असतेस!" "का रे! स्वैपाकघरात बसू नये का? मला तर इथेच बसायला आवडतं.” "ठीक आहे, मी वैतागून म्हटलं, "चल, आता झोप बरं!” "तू जाऊन झोप जा, मी येतेच एवढं पान वाचून." पुन्हा असं अनेक वेळा झालं. जेव्हा केव्हा मला रात्रीला जाग येते - बारा वाजता, दोन वाजता, चार वाजता किंवा पहाटे पहाटे पाचला - तेव्हा आई मला स्वयंपाकघरात दिसायची. कधी सांगायची, "विरजण घालायचं राहूनच गेलं होतं बघ, आता पाच मिनिटांत झोपायला जातेच बघ." कधी म्हणायची, "अरे, लक्षात आलं की घरात भाजीच नाही उद्याला मग सकाळसाठी चणे भिजत घातले बघ." किंवा कधी म्हणायची, "कणीक तशीच बाहेर होती, फ्रीजमध्ये ठेवायला आले.” एकदा रात्री बारा वाजता पाहिलं, तेव्हा ती कॅलेंडरवर दुधाचा हिशेब मांडीत होती. विचारलं, तर सांगितलं, "दररोज दूधाचा हिशोब लिहून ठेवते, पण आज विसरले बघ आत्ता आठवलं तर लिहून ठेवत आहे." कधी रागावते माझ्यावर म्हणते, "मी कधी रात्री उठले काही कामासाठी तर, लागलीच माझ्या मागे मागे येतोस !” हे तर ती नेहमीच म्हणत असते, "पाणी प्यायला उठले होते, तर खिडकीतून छान हवा येऊ लागली, तर थांबले घटकाभर,” स्वयंपाकघरात दक्षिण दिशेला एक छोटीशी खिडकी होती. एकदा मी घाबरलो होतो. रात्रीचे दोन अडीच वाजले असावेत. आई आपल्या खोलीत दिसली नाही. वडील केवळ उताणं झोपून घोरत होते. बाथरूममध्येसुद्धा नव्हती ती बैठकीत आणि स्वयंपाकघरात अंधार होता. बाहेरचा दरवाजा तर आतून बंद होता. मी आवाज दिला, "आई, कुठे आहेस?" स्वयंपाकघराच्या अंधारातून आई बाहेर आली "काय रे, काय झालं? एवढं ओरडायला काय झालं? मला भीती वाटली! हळू बोल. घरातले उठतील ना!” "मी कुठे जाईन - मी तर स्वैपाकघरातच होते!” "मी सगळीकडे शोधलं- स्वैपाकघरात तर अंधार होता. " "तुला वाटत असेल काळोख, मला सगळं दिसतं, पाणी प्यायला आले होते, खिडकीतून पहात होते. आज सप्तमी आहे वाटतं... 33 गोष्ट सांगायची इच्छा आणि शैली असेल तर, गोष्टीसाठी ठळक घटनांची गरज नसते हे दाखवून देणारी ही साधीसुधी, मात्र सुरेख अशी कथा आहे. "बाप रे, आई! मी किती घाबरलो होतो! मला वाटलं, कुठं गेलीस तू?" मला फार राग आला होता, पण मी काय करणार होतो ? जाऊन झोपलो! बाहेरून परतलं, की आईच नेहमी दरवाजा उघडते. मात्र ती येते, सरळ स्वयंपाकघरातून आणि जाते पुन्हा स्वयंपाकघरातच, कधी अचानकच उत्साहाने सांगते, "बरं झालं, आलास ते जरा स्टूलवर चढून तो पापडाचा डबा काढून दे बरं!" तिची सगळी कामं स्वयंपाकघराशीच संबंधित असतात. आणि तिची सगळी स्वतःची कामंसुद्धा स्वयंपाकघरातच व्हायची. •ब्लाऊजची हुकं शिवण्यापासून ते गहू निवडणं- पाखडण्यापर्यंतची सगळी कामं. वर्षातून एखाद्या वेळी मावशीला नाहीतर आत्याला ती पत्र लिहिते, तेही इथूनच स्वयंपाकघरात बसून एखादं पुस्तक हाताखाली धरून, वहीच्या पानावर ती लिहिते. शेजारच्या आजी किंवा गल्लीतल्या मुली आईला नेहमी भेटायला येतात, त्यांनाही ती इथेच बसवून घेते. एक लहान चटई आहे, ती कधी फाटत नाही ना उसवत आजी, अलका आणि मधू या सगळ्या जणींनी आईला अनेक वेळा सांगितलं आहे, तिचं हे स्वयंपाकघर फार छान आहे, नीटनेटकं ठेवलेलं. आमच्या सगळ्या गल्लीत हे सर्वांना माहीत आहे. कधी निवांत असलेली आई दिसते, तीही आपल्या त्या फूटभर उंचीच्या स्टुलावर बसलेली आणि इथेच स्वयंपाकघरात हे स्टूल माझ्या जन्माच्याही आधीचं आहे....नाहीतर आई दिसते, ती खिडकीशी उभी असलेली दिसते. कुठे हरवून गेल्यासारखी. खिडकीतून दूरवर न जाणे कुठे नजर लावून! मला तर वाटतं, दक्षिण दिशेचं सगळं आभाळ तिला आता माहीत झालेलं आहे. तिकडे कोणते तारे आहेत, किती आहेत, कोणती नक्षत्रं आहेत.... कोणत्या ऋतूत, कोणत्या वेळेस हा सूर्य तिथून सरकतो, आणि चंद्राच्या किती कला आहेत इथून दिसणाऱ्या - तिला सगळं काही माहीत आहे हवेच्या अदमासावरून आकाशावरून तिला ऋतूंचा अंदाज येत असतो किंवा असं वाटतं, की ती हे सगळं पाहातसुद्धा नसेल. दूरवर दिसणाऱ्या दोन-तीन झाडांच्या पानांकडे पाहत असेल किंवा केवळ श्वास घेण्यासाठी म्हणून ती इथे उभी राहत असेल. तिच्याकडून या गोष्टी माहीत करून घेणं नेहमीच मोठं अवघड असतं. ती आपल्याला काहीतरी सांगून वेळ मारून नेऊ शकते आणि गंमत म्हणजे आपल्याला वाटणारही नाही, की ती तशा तऱ्हेने काहीतरी वेळ मारून नेते आहे. तिला स्वयंपाकघरातून बाहेर काढायचा बोलवायचा प्रयत्न नेहमीच असफल होत असतो. आवाज देऊन तिला विचारलं, की निवडक अंतर्नाद १६९