पान:निवडक अंतर्नाद.pdf/१६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एकटेपणाच्या ता मधुकर धर्मापुरीकर एकाच विषयाच्या, एकाच प्रकारच्या अनुभवाशी गुंतून असणाऱ्या दोन भाषांतल्या या लघुकथा. एक, 'माय फादर सिट्स इन द डार्क' ही इंग्रजी कथा तर दुसरी 'मां रसोई में रहती हैं' ही हिंदी कथा. या दोन्ही कथांच्या निमित्ताने माणसाच्या एकटेपणाची हकिकत मांडणारा हा कथानुवाद आणि लेख. पिता-पुत्र संबंधांवरच्या कथांच्या संपादनाचे काम चालू होते. मराठीशिवाय हिंदी भाषेतल्या कथांचाही शोध घेत होतो. या दरम्यान हिंदीतील सुप्रसिद्ध कवी कथालेखक श्री कुमार अंबुज यांची, श्री जयप्रकाश सावंत यांनी अनुवादित केलेली कथा 'समस्या' (मूळ शीर्षक 'मुश्किल') वाचण्यात आली. कथा फारच ●आवडली आणि मी ती निवडली. कुमार अंबुज यांच्या कथांबद्दल कुतूहल वाढले. त्यांचा 'इच्छाएं' हा कथासंग्रह मागवून घेतला. त्यांच्याशी फोनवर बोललो. ते उत्तम कवीही आहेत हेही दरम्यान समजले आणि पिता-पुत्र नात्यावर त्यांच्या उत्तम अशा कविताही वाचण्यात आल्या. असे काही छान वाचण्यात आले, की हाती घेतलेल्या कामाला गती येते, तसे माझे झाले. आणि कुमार अंबुज यांच्याशी या विषयावर झालेल्या गप्पांमुळे त्यांची मैत्रीही झाली. नव्याने ओळख झालेला लेखक, त्याच्या आवडलेल्या कथा- कवितांच्या अनुषंगाने होणाऱ्या गप्पा, प्रत्यक्ष भेट नसताना होणारी ती मैत्री मोठी जिव्हाळ्याची असते. या माझ्या उपक्रमामुळे आणखी दोन तीन परभाषक लेखकांशी मैत्री झाली. 'इच्छाएं' या संग्रह्मत 'मुश्किल' ही मूळ कथा वाचली आणि पहाटे तीनच्या आसपास मला जाग आली. काही खुडबुड ऐकायला आली; जाऊन पाहतो, तर स्वयंपाकघरात आई काहीतरी भांडी काढीत होती. मला पाहताच तिला आश्चर्य वाटलं. मग हसून सांगू लागली, "अरे, पहाटेला आणखी वेळ आहे, जा झोप जा... तिची दंतपक्ती मोठी मोहक दिसायची. >> १६८ निवडक अंतर्नाद मी आळस देत विचारलं, "इतक्या रात्री काय करतेस? झोपली नाहीस का?" "असं कसं? आताच तर उठले मी!” त्याच नादात इतर कथा वाचल्या आजचा परिसर, आजचे वास्तव साधेपणाने मांडणाऱ्या या कथा; शिवाय, भूतकाळाच्या आठवणींतून आज काही शोधू पाहणाऱ्या या सगळ्याच कथा विसंगती, उपरोध, व्यंगांचे अस्तर लावून असतात, त्यामुळे गांभीर्य अधिक जाणवत असते. या संग्रहातली, 'मां रसोई में रहती हैं ही कथा वाचली आणि दोन-तीन वर्षांपासून पिता-पुत्र नात्याच्या कथा गोळा करीत होतो, त्या कामाला स्थगिती देऊन वेगळ्याच नादाला लागलो. किशोरवयीन मुलाने आपल्या आईबद्दल सांगितलेली कथा कुमार अंबुज यांनी आठवणींच्या रूपातून सांगितली आहे गोष्ट सांगायची इच्छा आणि शैली असेल तर, गोष्टीसाठी ठळक घटनांची गरज नसते हे दाखवून देणारी ही साधीसुधी, मात्र सुरेख अशी कथा आहे आई स्वयंपाकघरात असते... स्वयंपाकघरात बसून राहणारी आई. केव्हाही पाहा दिवसा, रात्री स्वयंपाकघरातच वावरत असणाऱ्या आपल्या आईबद्दल हा पोरगा सांगतो आहे. पूर्ण कथेत आई स्वयंपाकघरातच आहे, ती बाहेर येतच नाही. कथेत तसं काही 'घडत नाही, तरीही ही एक कथा आहे, उत्तम कथा. "अं! रात्री तर अकरा वाजेपर्यंत जागीच तर होतीस!” मी आश्चर्याने विचारलं. "मग काय झालं? माझी झोपच एवढी असते. तू जा, झोप जा!" काही दिवसांनंतर मी अचानक रात्री एक-दीड वाजता उठून बसलो. कोणतं स्वप्नं तुटलं होतं, का कसलातरी आवाज आला होता. लक्षात आलं, की स्वयंपाकघरात कुणीतरी आहे. लाइट