पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

आकार देण्याचा प्रयत्न करू शकतो. अर्थात, ते दोघांचं असल्यामुळे दोघांनी तसं ठरवल्याशिवाय आपल्याला तसं करता येत नाही. आपण त्यात आपल्या बाजूने प्रामाणिक असणं, निखळ असणं, खुलं असणं एवढंच करू शकतो. एवढं करूनही त्या नात्याचं काय होतं, समोरची व्यक्ती, समाज हे त्याकडे कसे बघतात हेही आपण ठरवू शकत नाही. समाजाचे नॉर्म्स आपण ठरवून बदलू शकत नाही. ते पाळायचे की नाही, कितपत पाळायचे हे निर्णय मात्र आपण घेऊ शकतो. "...सर, तुम्हांला पडलेला प्रश्न मलाही खूपदा पडतो. पूर्वी अनेकदा मी बेसावध असताना तो माझी वाट अडवायचा मीही बेचैन व्हायचे तुमच्यासारखी. सतत एक ओझं असायचं मनावर, कशाचं ते कळत नव्हतं, पण ते अचानक बदललं. "त्याला कारण ठरली माझी शाल्मली. तिला लहानपणापासून लाडाने कंदुली म्हणत होते. त्यामुळे ती मोठी झाली हे लक्षातच आलं नव्हतं माझ्या. ती लॉ करायला दिल्लीला गेली. सुटीत आली की लाड करून घ्यायची. फोनवरून एवढ्या तेवढ्या गोष्टी विचारायची. त्यामुळे मीही बेसावधच होते. आत्ता कुठे ती वीस वर्षांची होतेय. ह्या वेळी ती घरी आली तेव्हा म्हणाली- 'अम्मा, तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे' "मला वाटलं पोरगी प्रेमात पडली वाटतं. मी म्हणाले - 'बोल ना.' "ती म्हणाली 'नाही, मी नाही बोलणार बोलायचं तू आहेस. मी फक्त तुला काही विचारणार आणि तू खरं खरं सांगायचं, लपवायचं नाही. ' "मी म्हटलं - विचार ना, तुझ्यापासून काय लपवणार मी?' " तिने मला काय विचारलं असेल? म्हणाली 'अम्मा, तुझं प्रेम आहे अरविंद सरांवर?' "आणि मी क्षणात उत्तरले 'हो !' 'आणि त्यांचं?' 'त्यांचंही आहे माझ्यावर प्रेम', बोलताना जराही संकोचले नाही मी. 'मला वाटलंच होतं, ही इज सच अ वंडरफुल पर्सन, यू आर व्हेरी लकी अम्मा.. ' 'का ग? आणि हे सारं आता कशाला विचारलंस? 'अग, अगदी लहानपणापासून मला हा प्रश्न पडला होता, कधी कधी मैत्रिणीही विचारायच्या, कधी त्यांच्या आया खवचटपणे आडून आडून विचारायच्या. त्यांना कसं तोंड द्यायचं हे मी स्वतःच शिकले होते, कधी तुझ्यापर्यंत येऊ दिलं नाही मी ते. तू मला कधी गिरीशपासून तोडलं नाहीस. तोही भारतात आला की मला भेटून जायचा, कधी फोनही करायचा. माझे लाडही केले त्याने. पण त्याला कधी अप्पा किंवा पप्पा म्हणावंसं वाटलं नाही मला. नंतर नंतर तोही त्याच्या नव्या संसारात, नव्या मुलांमध्ये रमला. त्याचं फारसं दुःखही झालं नाही मला. मी अरविंद सरांना सरच म्हटलं, पण माझ्या मनात १५६ निवडक अंतर्नाद वडिलांची जी प्रतिमा आहे ती त्यांचीच आहे.' पण आता कसं काय विचारलंस?' 'मी आता थर्ड इयरला आहे. मला खूप प्रश्न पडतात रिलेशनशिपबद्दल खूप कन्फ्युजन असतं डोक्यात माझ्या आसपासचे सारे जण कन्फ्युज्ड आहेत. आमची अख्खी जनरेशनच तशी असेल बहुतेक. ' 'मी स्वतःला विचारते 'काही वाईट नाही. अंधविश्वासू असण्यापेक्षा कन्फ्युज्ड असणं बरं, निदान तुम्ही विचार करत आहात, कोणत्याही गोष्टीवर उगाचच विश्वास ठेवत नाहीत, बाबा वाक्यं प्रमाणं मानत नाही ह्याचं द्योतक आहे ते, ' मी तिला म्हणाले, मी कोण आहे? माझ्या जवळचे, आसपासचे लोक कोण आहेत? काय नातं आहे त्यांचं माझ्याशी, एकमेकांशी ? हे सारे प्रश्न मला सतावतात. तू इतक्या मोकळेपणाने माझ्याशी बोलतेस, हीच तर ताकद आहे माझी. तुला एक सांगू? म्हणजे तसं काही सांगण्याचा अधिकार नाही माझा मी लहान आहे अजून आणि तुम्ही सगळा मागचा पुढचा विचार करून ठरवल्या असतील आपल्या नात्याच्या सीमारेषा. पण तरीही सांगते तुम्हा दोघांना कधी आपलं नातं जाहीर करावंसं वाटलं तर नक्की करा, मी तुमच्या सोबत आहे.' - "गुणाचं लेकरू माझं. तिचं एवढंसं बोलणं मला किती ताकद देऊन गेलं.. 22 "म्हणजे तू असं म्हणते आहेस का, की आपण आता आपलं खरंखुरं नातं जगजाहीर करावं? आणि माझ्यात तेवढी हिम्मत नसेल तर?" “अरविंद, आता तुम्ही माझे सर नाही, फक्त प्रियकर आहात. समजून घ्या मला काय म्हणायचं आहे ते. माझा असा आग्रह नाही की आपलं नातं आपण जाहीर करावं. तुमच्यावरची बंधनं मला माहीत आहेत. मी फक्त माझा अनुभव शेअर करत होते तुमच्यासोबत मी किती भित्री, संकोची, जगाची, इतर लोकांची पर्वा करणारी होते व अजूनही आहे हे तुम्हांला चांगलंच माहीत आहे कंदुलीला आपल्याबद्दल काय वाटेल, ह्याचं माझ्यावर प्रचंड दडपण होतं. खूपदा तर ती घरी येण्याची वेळ झाली असली तर तुम्ही अगदी माझ्या कामासाठी माझ्याकडे आले असतानाही मी तुम्हांला 'जा' म्हणायचे. तुम्हांला आठवतं ना हे सारं? त्याच माझ्या लाडक्या मुलीशी आपल्या नात्याबद्दल निःसंकोचपणे बोलण्याची ताकद मला कुठून मिळाली हे मला माहीत नाही. पण ते सांगितल्यावर मला विलक्षण बरं वाटलं I felt empowered. तिलाही हे नातं मान्य झालं ही आनंदाची गोष्ट, पण तसं झालं नसतं तरी मला अपराधी वाटलं नसतं. "मला वाटतं की खुलेपणात एक ताकद आहे आणि मला ती जाणवली. तुम्ही तुमच्या एखाद्या मित्राशी, किंवा तुमच्या मुलाशी विशूशी बोललात तर तुम्हांलाही बरं वाटेल कदाचित..... प्रत्येकाचं सत्य वेगळं असतं आणि प्रत्येकाला ते -