पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

"ठीक आहे, तुझ्या बाबतीत तर म्हणता येईल ना दुधावरची साय, गुलाबपाण्यात भिजलेली..." "सर, आता बस झालं, तुमच्या प्रतिभेला बहर येण्यापूर्वी आपण उठू यात बरं, कंदुली आली असेल घरी वाट पाहत असेल.” "चला, कोणीतरी वाट पाहतंय तुझी . " "तुमचं घरही तुमची वाट पाहत असतं सर जरा संवाद >> तर करून पहा. "तुला वाटत नाही राणी, की मी संवादाचे प्रयत्न केले असतील म्हणून? कारण नसताना गिल्ट घेऊन जरा जास्तच केले मी प्रयत्न, जाऊ दे झालं. जपून जा, बाय!” "बाय सर, स्वतःला सांभाळा. " ★ ★ ★ सुचित्रा कशी सांभाळू शकते स्वतःला आणि मी का नाही? मी पुरुष आहे म्हणून, म्हातारपण घेरू लागलं आहे म्हणून, ती 'सुचित्रा' आहे आणि मी 'अरविंद' आहे म्हणून? मीही गुंतवतो माझं मन रमतो मुलगा-सून नातू ह्यांच्या प्रेमात - प्रश्नांत, जपतो बायकोला, बघतो तिचं दुखणं खुपणं ( दुखण्यावर उपाय करता येतात मला खुपण्यावर नाही), अजूनही वाचतो अफाट, लिहितो, फिरतो, भाषणं देतो, जगभरातल्या विद्वानांशी संपर्क ठेवतो ऐकतो गाणी, करतो पांचट विनोद, पण तरीही आतून ओली जखम चिघळत राहते. माझ्या प्रश्नांना नाही मिळत तर्कसंगत उत्तरं, मग मी हताश होऊन जातो. सगळं सगळं फोल वाटतं. प्रचंड गिल्टी वाटत राहतं आतून, सावित्रीबद्दल नाही, तर सुचित्राबद्दल, मला माहीत आहे मी अन्याय नाही केला सावित्रीवर ती जरी कोणाच्या प्रेमात पडली असती, तरी मी घेतलं असतं ते समजून, कारण मुळात कोणी कोणाच्या प्रेमात कधी पडावं ह्याला कोणताच नियम कधीच लागू नव्हता, अगदी मानवी आहे, नैसर्गिक आहे हे असं वाटणं, अनादी अनंत काळापासून स्त्री-पुरुष असे प्रेमात पडत आले आहेत, ह्या मधु तेजाबाची चव चाखत आले आहेत, हे जाणतो मी. बहुपतीत्व, बहुपत्नीत्व, एक पती-पत्नीत्व, टोळ्या, आधुनिकोत्तर समाज - सर्वत्र हे घडत आलं आहे, घडत राहणार आहे, हे मी जाणतो माझ्या अध्ययनातून. सावित्री हे समजू शकत नाही. तिची वाढ वेगळ्या प्रकारे झाली आहे व तिने त्याहून वेगळं काही आकळण्याचा प्रयत्नही केला नाही. माझी त्याबद्दल तक्रार नाही. वाईट वाटतं ते फक्त सुचित्राबद्दल. 'अशा अडनिड्या वळणावर तू का आलीस माझ्या आयुष्यात?' असं मी तिला विचारतो तेव्हा खरं तर मला हे स्वतःला विचारायचं असतं, की 'तुला होती ना ही अक्कल? होतास ना तू वयाने, ज्ञानाने, अनुभवाने मोठा ? मग का नेलंस तू स्वतःला त्या वळणावर जिथे ही तरुण पोर भेटणार होती? का केलेस प्रयत्न तिच्याशी संपर्क ठेवण्याचे, वाढवण्याचे? तुला तिचं भलंच करायचं होतं, तर राहायचं होतं तिच्यापासून सुरक्षित, आदरणीय अंतरावर तिलाही भेटलाच असता कोणीतरी तिच्यावर तुझ्याइतकंच किंवा तुझ्याहून अधिक प्रेम करणारा का बांधून ठेवलंस तिला अशा नात्यात ज्याला तसा काहीच अर्थ नाही? किंवा असंही वाटतं, कशाला ह्या काळात, ह्या समाजात जन्माला आलो आपण दोघं? युरोप, अमेरिकेत असतो (किंवा तिथे गेलो) तर कोणालाच गैर वाटणार नाही आमचं नातं. अगदी भारतात, ह्या महाराष्ट्रात राहत असतो कुठल्या तरी आधीच्या शतकात – गाथा सप्तशतीच्या काळात, तरी कोणी नाकं मुरडली नसती आमच्या नात्याला हा चोरटेपणा, हा अपराधगंड नसता आला आमच्या वाट्याला. ★★★ “किंवा समजा असं झालं असतं, की आपण ह्या वळणाऐवजी एरवी कोठेतरी भेटलो असतो, तर?” "सर, आपण पहिल्यांदा भेटलो तेव्हा तुम्ही होता ४७चे व मी होते पंचविशीतली, तुमच्या तरुणपणी भेटलो असतो, म्हणजे तुमच्या पंचविशीत, तर मी तेव्हा कुठे चाला बोलायला लागले होते! अगदी पस्तिशीत म्हटलं तरी माझं तेव्हाचं वय होतं १३ वर्षं. आणि अगदी आत्ता भेटलो असतो तर आणखीनच कठीण झालं असतं असं नाही वाटत तुम्हांला ?... कसलं दुःख आहे तुम्हांला, मनासोबत शरीराला नेता आलं नाही, ह्याचं ? देहाच्या पडावावर आपण विसावलो होतो काही काळ खूप शांत, तृप्त, निवांत वाटलं होतं आपल्याला! पण त्या वाटेने पुढे जायचं नाही हेही आपणच ठरवलं होतं ना? त्या निर्णयाचा पश्चात्ताप होतोय? की आपण त्या निर्णयाचा आता पुनर्विचार केला तरी शरीरमनात ती असोशी उरली नाही ह्याची खंत वाटतेय तुम्हांला ? .... तुम्ही मला मागे कधीतरी जी. ए. कुलकर्णीच्या एका कथेबद्दल सांगितलं होतं. तुम्ही म्हणाला होता की त्यांच्या लिखाणातली नियतिशरणता तुम्हांला पटत नाही. पण त्यांच्या काही कथा अनुभव म्हणून, प्रचिती म्हणून ( हा तुमचाच शब्द हं! ) मनाला भिडतात, त्यांतली ही एक. ह्या कथेत एक वाटसरू चालत चालत एका चौरस्त्यावर येतो. त्यातला एक रस्ता पकडून पुढे जातो. त्याच्या अखेरीस त्याच्या वाट्याला जे काही येतं, ते त्याला पटत नाही. समजा तो त्या रस्त्याने गेला नसता आणि त्याने दुसरा रस्ता धरला असता तरी अखेरीस तो तिथेच पोहचला असता जिथे तो आता आहे, अशी काहीशी ती गोष्ट होती. मलाही हेच वाटतं, की ह्या नाही, तरी त्या वळणावर आपण भेटणारच होतो, म्हणून भेटलो. "ह्य नियतीचा संकेत वगैरे नाही. मी नशीब वगैरे मानत नाही, हे तुम्हांला माहीत आहे. आतापर्यंत माझ्या आयुष्यात जे काही घडलं ते कुठेतरी माझ्याच संमतीने घडलं असेल असं मी मानते. माझी संमती नसेल त्या गोष्टीला, तर ती रोखण्यासाठी पुरेसं सामर्थ्य नसेल माझ्यात, पण ते तसं का घडलं, माझ्याच बाबतीत का घडलं असा आकांत मी करणार नाही. माणसं आणि नातेसंबंध आपल्यावर येऊन आदळत असतात. आपल्याला प्रत्येक वेळी निवड नाही करता येत - मग ते नातं रक्ताचं असेल, नोकरी - व्यवसायातलं असेल, लग्नासोबत आलेलं असेल किंवा निखालस मैत्रीचं असेल. आपण फक्त त्या नात्यांना आपल्या पद्धतीने निवडक अंतर्नाद १५५