पान:निवडक अंतर्नाद.pdf/१५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मेल वाचून 'आय व्हेरी वेल अंडरस्टॅंड इट् बेबी' असं म्हणालो आणि लगेच स्वतःची जीभ चावली. ह्या 'बेऽऽबी' वरून काय गदारोळ झाला होता! आता सुचित्राला किंवा कोणत्याही बाईला मी चुकूनही बेबी म्हणालो, तर स्वप्नातही मी जीभ चावेन ह्यात शंका नाही. ★★★ "पण तुम्ही असं कसं म्हणू शकता?” "का? त्यात काय झालं? तू इतरांच्या दृष्टीने असशील a grown-up matured woman. पण माझ्यासाठी you are always a baby.” "हे तर आणखीन भयानक आहे. सर, प्लीज थांबवा हे सारं. माझ्या मनातल्या तुमच्या इमेजला तडे जाऊ नयेत असं वाटत असेल तर ही बेबीची भाषा बंद करा." "अरे, पण काय चुकलं माझं ? तू तुझा फेमिनिझम असा झेंड्यासारखा प्रत्येक क्षणी फडकावलाच पाहिजे का?” "तर मग तुम्हीही ऐका. मी शक्य तितक्या शांतपणे तुम्हांला सांगायचा प्रयत्न करते, तो तुमच्याविषयी माझ्या मनात असणारा आदरभाव लक्षात ठेवून पुढच्या वेळी मी इतक्या विनयाने बोलणार नाही. तर पहिली गोष्ट ही, की मी स्वतःला फेमिनिस्ट मानत नाही. मला त्या शब्दाची लाज वाटते म्हणून नाही, तर मला अभिप्रेत असलेल्या फेमिनिझमपर्यंत मी अजून पोहचले नाही, म्हणून, दुसरी गोष्ट, तुम्ही म्हणता तो फेमिनिझम जर माझा असेल, तर तो तितकाच तुमचाही असायला हवा. आपलं नातं १५ सेकंदांच्या ad filmमधलं नसेल, तर आपण विचारांच्या एकाच वेवलेंथवर आहोत असं मी मानते. मी तुमच्याहून वयाने, अनुभवाने खूप लहान आहे, आपल्या नात्याची सुरुवात गुरु-शिष्य म्हणून झाली, हेही खरं आहे. पण म्हणून तुम्ही मला बेबी म्हणावं? एखादा पुरुष समोरच्या स्त्रीला बेबी म्हणतो तेव्हा त्यामागे भयंकर patronizing attitude असतो. ह्या शब्दाला chauvinism चा वास येतो असं नाही तुम्हांला वाटत? तेही इतका वैचारिक प्रवास केल्यावर? अगदी माझ्यासोबत इतकी वर्षं घालवल्यावर?” "सॉरी, मी खरंच इतक्या सीरीयसली विचार नव्हता केला ह्या शब्दाचा, त्यातून प्रकट होणाऱ्या अर्थ आणि भाव ह्यांच्या विविध छटांचा. " "मग करा ना सर! संकल्पनांच्या बाबतीत काटेकोरपणाचा आग्रह धरणाऱ्या तुमच्यासारख्या माणसाने तर शब्दांच्या वापराबद्दल अधिकच दक्ष राहायला हवं." "ओके. मानतो मी हे सगळं पण एक सांग, अगदी प्रेमाच्या क्षणी स्त्री व पुरुष परस्परांना बेबी म्हणतात, हे तुला मान्य आहे? तुझ्या पिढीकडूनच हे ऐकलं आहे मी.” "सर, तुम्ही माझ्या पिढीचे नाही आहात. तुमची, किंवा माझी भाषाही ह्या पिढीची नाही. पण तुम्ही प्रेमाच्या आवेगात, जवळिकीच्या क्षणात असे काही म्हणाला असता तर मीही तुम्हाला तसा प्रतिसाद दिला असता. मला तर खूपदा वाटतं की खरं तर १५० निवडक अंतर्नाद ‘you' are a baby - a baby that always wants to be pampered. पण नका ना हा विषय काढू ज्या गावाला जायचं नाही असं ठरवलंय, त्याची चर्चा तरी का करायची? जाते मी...' आणि ती गेली निघून. मग १५ दिवस फोन नाही, मेसेज नाही की मेलला उत्तर नाही. मी फोन केला तरी घेतला नाही. अखेरीस आली तीही न कळवता. बाहेर आकाशात ढग दाटले होते, केव्हाही कोसळतील असं वाटत होतं. मीही माझं बाहेर जाणं रद्द करून पावसाच्या कोसळण्याची वाट पाहत बसलो होतो. तेवढ्यात ती आली. डोळ्यात श्रावणमेघ दाटलेले. काही बोलली नाही. फक्त 'सॉरी' लिहिलेला कागद माझ्या हातात ठेवला आणि निघाली. मला वाटलं – तिला जवळ घ्यावं, मांडीवर घेऊन थोपावं, म्हणावं - You are just a kid, baby. तिच्या डोळ्यातून वाहणारे अश्रू ओठांनी टिपून घ्यावे आणि रात्रभर तिला आंदोळत, आंदोळत प्रेम करावं तिच्यावर इतक्या वर्षांच्या अर्ध्यामुर्ध्या प्रेमातून तिच्या मनाला पडलेल्या गाठी- निरगाठी हळुवारपणे सोडवाव्या. एका रात्रीत तिला इतकं प्रेम द्यावं की ते आयुष्यभर तिला पुरू शकेल, माझ्या डोळ्यात तिने ते सारं वाचलं म्हणाली - मला जाऊ द्या सर, आता नाही गेले तर मग जाताच येणार नाही.' ती झटकन गेली आणि दोनच मिनिटांत सावित्री आली. म्हणाली, 'सुचित्रा आली होती? आणि इतक्या लगेच गेलीही?' मी 'हु' करून पुस्तक डोळ्यांसमोर धरलं. सुचित्राच्या व माझ्या प्रसंगावधानाचं मला कितीतरी दिवस कौतुक वाटत राहिलं... ★★★ अशी कितीतरी भांडणं... त्या साऱ्यातून किती जवळ आलो आम्ही! आमचं पहिलंवहिलं भांडण तर माझ्या नेहमीच लक्षात राहील. नुकतीच आम्ही परस्परांजवळ आपल्याला काय वाटतं ह्याची कबुली दिली होती. म्हणजे माझ्याकडून धो धो प्रवाह अगदी सुरुवातीपासून वाहत होता, पण तिने आपली कवाडं बंद करून घेतल्यामुळे तिच्यापर्यंत तो पोहचला नव्हता, किंवा आधी आलेल्या असंख्य कटू अनुभवांमुळे ती आमच्या नात्याला कुठल्यातरी समाजमान्य चौकटीत बसवू पाहत होती. पण केव्हातरी ही कोंडी फुटली. तेव्हाच केव्हातरी मी तिला माझी डायरी वाचायला दिली. आमच्या पहिल्या भेटीचा प्रसंग ती वाचत होती. आश्चर्याने फुललेले तिचे डोळे, मध्येच जिवणीपाशी रेंगाळणारं किंचितसं हसू (खळखळून हसणं विसरून आता युगं उलटली होती), सेमिनारमध्ये बोलताना आमची नजरानजर झाली व मी सगळं काही विसरून पार भांबावून गेलो ह्या क्षणापाशी ती आली आणि तिचा श्वास फुलला, दृष्टी एकाग्र झाली. मी स्वतःला सावरलं इथपर्यंत आल्यावर ती खुदकन हसली. पण मग अचानक एका शब्दाशी