पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

शिडकावा ह्यामुळे मी अधिकाधिक रीलॅक्स होत होतो. माझं भाषण आता हळूहळू 'चढू' लागलं होतं. तेवढ्यात मला 'ती' दिसली. 'ती' बऱ्याच मागे तिसऱ्या चौथ्या रांगेत बसली होती. अर्धगोलाकृती रचनेत काहीशा परिघावर तिच्या आसपासच्या दोन-तीन खुर्च्या रिकाम्या होत्या. ती अगदी मन लावून माझं भाषण ऐकत होती. माझ्या कुठल्याशा वाक्याला दाद देत तिने सहज नजर उचलून समोर पाहिलं आणि आमची नजरानजर झाली. तिच्या प्रतिसादामुळे मनोमन हरखलेला मी तिच्या दृष्टिक्षेपामुळे पार स्तिमित झालो. मला आधी जाणवलं त्या नजरेतलं तेज बुद्धिमत्तेचं, सजगतेचं, एवढा कसलेला वक्ता मी, पण पार गोंधळून गेलो. तिच्या नजरेत गुंतलेली माझी नजर मी प्रयत्नपूर्वक सोडवली खरी, पण ती तिच्या चेहऱ्यापाशीच थबकून राहिली. मी आजवरच्या आयुष्यात देश-विदेशात काही कमी सुंदर मुली पाहिल्या नव्हत्या. पण हे सौंदर्य वेगळंच होतं. त्यात आव्हान नव्हतं की आवाहन, निमंत्रण नव्हतं, तसा ताठाही नव्हता. स्वतःच्या प्रकाशाच्या आभेत गुंतलं होतं ते. बाहेरच्या जगापासून काहीसं अंतर राखून असणारं, स्वमान नव्हे, पण स्वतःशी संवादात हरवलेलं असं ते व्यक्तित्व, माझ्या भाषणाच्या रूपाने तिचा बहुधा स्वतःशीच छानसा संवाद सुरू झाला होता, पण मी असा अर्ध्यावर अडखळल्यामुळे तो अचानक तुटला, म्हणून तीही थबकून माझ्याकडे पाहत होती. दोन तीन सेकंद असेच गेले, मी अवाक्, अखेरीस मी सावरलो. झटकन प्रसंगावधान राखून माझी नजर मी ओळखीच्या एका वरिष्ठ प्राध्यापकांकडे वळवली, एक वाक्य बोलून पुन्हा पॉज घेतला. मग म्हणालो, - "माणसा-माणसांच्या संवादात कधी असंही घडतं की थबकायला होतं. ह्याचा अर्थ असा नाही, की संवाद संपला किंवा अशक्य झाला. त्याचा अर्थ हा असतो, की संवादासाठी अधिक संपन्न, अधिक अर्थवाही भाषेची गरज आहे आणि ती भाषा आपलीशी करण्यासाठी थोडं थांबण्याची, स्वतःला समोरच्याला, संवादप्रक्रियेला नव्याने समजून घेण्याची गरज आहे. अशा वेळी थोडं थांबणं आवश्यक असतं आणि उपयुक्तदेखील हेच समाजाच्या बाबतीतही घडतं. प्रत्येक समाजाचा काळाशी सतत संवाद सुरू असतो. कधी कधी त्या संवादातही अशी वेळ येते पॉज घेण्याची अशीच वेळ आता भारतीय समाजावर आली आहे. परंपरा आणि परिवर्तनाची घुसळण आपल्या परिचयाची आहे. पण कधी कधी परिवर्तनाची गती व तीव्रता इतकी जास्त असते, की तिला पाहण्यासाठी, समजून घेण्यासाठी भूतकाळाशी असणारं आपलं नातं आपल्याला काही काळ स्थगित ठेवावं लागतं. माझ्या आजच्या भाषणाचा विषय आहे - A Pregnant Pause : A Tool to Understand the Meaning of Globalization for India. राळ्यांचा कडकडाट झाला. बाजी पुन्हा माझ्या हातात आली होती. ते भाषण मग तुफान रंगलं. मी दोन-तीनदा 'तिकडे' पाहिलं. 'ती' नोट्स घेण्यात गर्क होती. लेक्चर संपल्यावर माझ्याभोवती गराडा पडला नवे प्राध्यापक, पीएच.डी. व एम. फिल. चे १४८ निवडक अंतर्नाद विद्यार्थी ती मात्र आली नाही. रात्री मी डायरीत लिहिलं - My God, she was so distractingly beautiful! ★ ★ ★ "तू कशाला आलीस इथे ?” "तुम्हांला पाहायला आले होते. नको येऊस म्हणत असाल तर जाते परत. " "इतकी कशाला चिडतेस?" “चिडू नको तर काय करू? तुम्हांला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करायची वेळ आली, आणि मला पत्ताच नाही. एकतर कितीतरी दिवस भेटायचं नाही, फोन, मेसेज करण्यावर बंधनं, नशीब, निदान तुमची मेल कोणी चेक करत नाही. तुम्ही मला एक शब्दाने कळवू नका आणि मी आल्यावर मला विचारता, की का आलीस?" "चुकलो बाई, साफ चुकलो. सॉरी म्हटल्याने राग जाईल का की कान धरून उठाबशा काढू ?" "काढाच कधीतरी उठाबशा, मलाही बघू देत तुम्ही कसे दिसता उठाबशा काढताना ! आता नाटकं पुरेत उठाबशा काढू नका, फक्त हे सांगा की तुम्हाला नेमकं काय झालं? हॉस्पिटलला जाण्याची वेळ का आली? आणि थापा नकोत, आपल्याकडे बोलायला वेळ कमी आहे हे लक्षात ठेवा. एकमेकांपासून काही लपवायचं नाही हे आपण खूप आधीच ठरवलं होतं, ह्याची आठवण करून द्यायला हवीय का ?" "नाही ग बाई, तुझ्यापासून लपवणार तरी काय मी ? शक्य असतं तर तुलाच लपवलं असतं माझ्यापासून...' " "डायलॉग पुरेत, तब्येत..." "माइल्ड हार्ट अॅटॅक येऊन गेला असावा अशी डॉक्टरना शंका आहे, मला तसं वाटत नाही. पण बीपी २०० / ११० च्या खाली जातच नाही." "कुठलं टेन्शन आहे तुम्हांला ?" "कुठलंच नाही, फक्त एका प्रश्नाचं उत्तर कितीतरी वर्षं शोधूनही सापडत नाही.” "कुठल्या?" "आयुष्याच्या अशा अडनिड्या वळणावर का भेटलीस तू मला...?" "काय बोलणार मी ह्यावर? बोलायचं काही राहिलंय?" "नकोच बोलूस तू काही.” तुडुंब भरलेले डोळे, आतुर पण विवश हात.... "अरे, कशावरून एवढा वाद चाललाय दोघांचा ? सुचित्रा, तू केव्हा आलीस, मला कळलंही नाही..." "नाही मॅडम, आताच आले. एक पेपर पाठवायचा होता कॉन्फरन्ससाठी सरांना फोन लावला तर लागतच नव्हता. चक्कर