पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

नाय. पायाला मुंग्या येतात. असं खाली बसलं की थांबतात. म्हणून ईलभर बसायचं.' म्हातारी आणि नातीची भाकरी खाऊन झाली. पाणी प्याली. उठता उठता पुटपुटली. 'शाणी भुंडी गेली. कशी गेली कळत नाय.' 'कशाला आणायची गाभण शेळी?' मी जरा रागानंच विचारलं. 'त्याला काय झालं? चरत चरत ती येणारच. कुठं का असेना, रानात डोंगरात नाही तर बांधावर, व्याली की तिथंच पोराला चाटून साफ करणार तासाभरात हवा खाऊन पोर आपल्या पायांवर उभं राहतंय. मग आपण घ्याचं उचलून एकटीला घरी ठेवून कोण तिच्याकडं बघणार?' 'सगळं खरं, पण आत्ता कोण आहे तिच्याजवळ?' ?? दिवस गेले... महिनाभर परगावी गेलो होतो. आलो त्या दिवशी म्हातारी वडाखाली बसलेली. पाच-पंचवीस शेरडं इकडं- तिकडं भटकत चरत चघळत होती, उभी आडवी, तिरकी, मागून पुढून, सगळ्या कोनांतून त्यांचं दर्शन होत होतं.... एक बोकड चांगला पोसलेला. तो पाठमोरा, त्याचं तोंड दिसत नव्हतं. पुढचे दोन्ही पाय गुडघ्यात दुमडून, शेळीच्या मागच्या पायांतून कासेला दुशा देत, तो लुचत होता. त्याचे मागचे तगडे पाय उभे शेपटी उंच धरलेली. खुळखुळा वाजवावा तशी हलत होती. त्याच्या फाकलेल्या मांड्यांत नारळ लोंबत होता, 'एवढा मोठा बोकड झाला तरी दूध पितोय?' म्हातारी म्हणाली, 'शेळीच पाजतीय तेला आपखुषीनं लहान आहे. ' 'लहान? किती वर्षांचा झालाय? 'दोन वर्षांचा ' 'मग लहान कसा ?' 'बरमचारी हाय.' 'म्हणजे?' 'बाल बरमचारी. ' 'बोकड आणि ब्रह्मचारी ?' 'हो.' म्हातारी पुढं म्हणाली – 'ते दोन पाट बघ, बोकड हायेत. तीन महिन्यांचे झालेत, आणि महिन्याभरात उडायला लागतील अन् ह्यो दोन वर्साचा हाय, पण एकदाही मादीवर गेला नाय. ' मी गप्पच झालो. 'ह्याला दुसऱ्या कळपातल्या माद्या दाखवल्या, तरी उडाला न्हाय. सगळ्या माद्या ह्याला आय भनी परमान हायेत...' 'मग याचा उपयोग काय?' 'राखणीचा ह्यय तो.' 'याला घालवलास तर सात-आठ हजार मिळतीलच की.' 'याला न्हाय घालवायचा, तो दुसरा बोकड, तकडं उभा हाय बघा दाढीवाला, त्याला खाटकाची मागणी आलीय. दहा हजाराला, पण आत्ता देणार नाय. खुदब्याला घालवीन, तवा बारा हजार सहजी मिळतील.' मला एकाएकी भुंडी शेळीची आठवण झाली. म्हातारीला विचारलं - 'भुंडी शेळीचं पुढं काय झालं?' 'ती सापडली की, त्याच दिवशी आमची वाट बघत घरी जाऊन थांबली होती. त्या दिवशी बरमचारी सारखा थांबत होता. त्याचं कळपावर लक्ष असतंय. सगळ्यात फुडं चालत असला तरी मागं कोण राहिलंय, कोण दिसत नाहीय हे त्याला बराबर कळतं. त्यो कावराबावरा होऊन थांबतो. त्या दिवशी तो असंच करायला लागला तेव्हा शंका आली. भुंडी हरवली, हे कळलं, ते त्याच्यामुळंच.' 'कमाल आहे. पण आत्ता भुंडी कुठं दिसत नाही ते?' म्हातारी हसली. म्हणाली - 'ती काय, बरमचाऱ्याला पाजतीय...' 2225 (रेखाटने लेखकाचीच) (जानेवारी २०१७) अतनाद in concer bala जानेवारी २००८ (चित्रकार आलालाल रहिमान) निवडक अंतर्नाद • १३९