पान:निवडक अंतर्नाद.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दोन संकल्पना - एक विचार - पर्यावरणाच्या रक्षणासाठी आपण काही केलं पाहिजे अशी जाणीव आजकाल पुरेशा प्रमाणात नसली तरी काही प्रमाणात का होईना, निश्चितच सर्वत्र पसरू लागली आहे ज्या प्लास्टिकच्या पिशव्या निसर्गक्रमात नष्ट होत नाहीत त्या मी वापरणार नाही, वाण्याकडून घेतलेलं सामान आणण्यासाठी मी जातानाच कापडी पिशवी बरोबर नेईन अशा अतिशय साध्या साध्या प्रकाराने का होईना कित्येक माणसं पर्यावरण स्वच्छ राखण्यातला आपला खारीचा वाटा उचलू लागली आहेत आणि ही अतिशय चांगली गोष्ट आहे मानव मोठ्या प्रमाणात खनिज इंधनाचा वापर करीत आहे आणि त्याने जीवनावश्यक प्राणवायूचं प्रमाण घटून उष्णता निर्माण होते आणि वातावरणातील कार्बन डाय ऑक्साईडचे प्रमाण वाढते. हा दुष्परिणाम यळणं माणसाला फारच कठीण जात आहे कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायू यांचा वापर करायचं बंद किंवा कमी करणंसुद्धा कठीण जात आहे. त्यामुळे या पर्यावरणीय समस्येच्या बाबतीत तरी गुन्हा करतोय हे कळतंय, करू नये हेही पटतंय पण गुन्हा केल्याशिवाय तर भाग नाही अशी आपली अवघडलेली मनःस्थिती झालेली आहे या अशा अवघडलेल्या मनाला शांती मिळवण्याचा एक मार्ग उपलब्ध आहे आणि तो म्हणजे वृक्षारोपण करणं, माझ्या ओळखीच्या काही पर्यावरणवादी मित्रांनी, म्हणूनच मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घ्यायचं ठरवलं, काही वर्षांपूर्वी त्यांनी मुंबईपासून जवळचंच एक खेडंगाव निवडलं. या गावाच्या शेजारी पूर्वी जंगल होतं, आता नाही. मुंबईच्या 'विकासासाठी' त्या जंगलाची जंगल अधिकारी आणि मुंबईतील बिल्डर यांनी संगनमतानं हत्या केलेली आहे. मित्रांनी आपापसात वर्गणी काढून, पैसे गोळा करून विविध प्रकारची सुमारे पाच हजार रोपटी त्या गावातील गावकऱ्यांच्या हवाली केली. बाल्यावस्थेत असताना त्या झाडाची नीट देखभाल व्हावी म्हणून गावातल्याच एक- दोघांना पगार देऊन झाडांची निगा राखावयास सांगितलं, खतं खरेदी करून दिली. दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला अशी हजारभर रोपटी विविध गावांत वाटायची आणि या प्रयोगाला सातत्य आणायचं असंही त्यांनी ठरवलं. त्यांच्या त्या प्रयोगाचा आमच्या मित्रमंडळात बोलबाला झाला. कौतुक झालं. ही झाली पाच-सहा वर्षांपूर्वीची गोष्ट. अलीकडे त्यांच्यातला एक जण भेटला तेव्हा मी मोठ्या उत्सुकतेनं त्याला त्यांच्या सामाजिक वनीकरणाच्या कार्यक्रमाविषयी विचारलं. तोड वाकडं करीत तो म्हणाला - 'काही उपयोग नाही रे, आमचा प्रयोग फसला. गावाशेजारी जंगल पुन्हा तयार होणं गावकऱ्यांच्याही किती हिताचं आहे हेही आम्ही पटवून सांगितलं होतं. पण आमच्या पर्यावरणीय शिक्षणाचाही काही परिणाम झाला नाही. पहिली तीन-चार वर्षं गावकऱ्यांनी झाडांची नीट देखभाल केली. पण पाचव्या वर्षी जाऊन पाहतो तो सगळी झाडं तोडली गेली होती.' एक मोठा सुस्कारा सोडून विषण्ण होऊन तो म्हणाला, 'त्यांना तरी काय दोष देणार म्हणा ! दारिद्र्यरेषेखाली असलेल्यांनी चुलीच्या सरपणासाठी ती वापरली असली तर त्यांना काय बोलणार? आज पोटात पडलेली आग महत्त्वाची, पर्यावरण वगैरे सर्व नंतर !' - आजच्या भुकेची समस्या सर्वांत महत्त्वाची, धर्म वगैरे नंतर विचारात घ्यायच्या गोष्टी आहेत असं खुद्द विश्वामित्रांनी बारा वर्षांच्या तपस्येनंतर पोटात आग पडलेली असताना मेलेल्या कुत्र्याची तंगडी खाताना म्हटलं होतं. तेव्हा मला मित्राचं मत न पटण्याचा प्रश्नच नव्हता. पण नंतर एकदम काही तरी महत्वाचं आठवल्यासारखं करून मित्र म्हणाला, 'पण या गावकऱ्यांचं वागणंही मोठं विचित्र होतं हं. त्यांनी सगळी झाडं सरसहा तोडली पण त्यातली जी वडा- औदुंबराची झाडं होती ना, त्यांना मात्र त्यांनी ह्यत लावला नाही. ती अजूनही वाढतायंत.' मित्रानं सांगितलेल्या त्याच्या अनुभवातील या 'टेल पीस नं मला विचार करायला लावलं, गावकऱ्यांनी वडा- औदुंबराची झाडं तोडली नव्हती याचं कारण उघड होतं. ही झाडं पवित्र मानली जातात, औदुंबर हे तर साक्षात दत्ताचं निवासस्थान असतं आणि त्यामुळे ती तोडली तर आपल्याला पाप लागेल हीच भावना त्या गावकऱ्यांच्या मनात असणार. आमच्या मुंबईकर मित्रांनी फुकट दिलेली झाडं तोडली तर ते गैरकृत्य होणार होतं, ते बेकायदेशीर कृत्यही ठरण्याची शक्यता होती. पण गावकऱ्यांचं मन कायदा मोडण्याइतपत निर्ह्यवलं होतं; पाप करायला मात्र त्यांची तयारी नव्हती. प्रसंग छोटा असला तरी तो बरंच काही सांगून जातो. समाजात बऱ्या आणि वाईट, समाजाला उपकारक आणि अपायकारक अशा दोन्ही तऱ्हेच्या घटना घडत असतात. उपकारक घटना घडाव्या म्हणून समाजाचं नियमन करणाऱ्या व्यक्ती अथवा संस्था अशा घटनांना प्रोत्साहन देत असतात. उलटपक्षी समाजाला हानिकारक, अपायकारक घटना घडू नयेत असाही समाजधुरीणांचा प्रयत्न असतो. बहुतेक सर्वच मानवी समाजात हे वाईट गोष्टींना बंदी करण्याचं काम सुरुवातीच्या काळात धर्मानं केलं. ज्या गोष्टी समाजाला हानिकारक होत्या अशा गोष्टींना 'पाप' हे लेबल चिकटवण्यात आलं आणि प्रत्येक पापासाठी देवाच्या दरबारात शिक्षा भोगावी लागते असं धर्मानं माणसाच्या मनावर बिंबवलं. पंधराव्या सोळाव्या शतकांत युरोपात राज्यक्रांत्या झाल्या. ब्रिटिशांनी राजाचे अधिकार अगदी मर्यादित केले आणि फ्रान्समध्ये तर लोकशाही अवतरली. लोकशाहीचा हा लढा बऱ्याच अंशी राजेशाहीविरुद्धचा असला तरी तो एका अर्थी धर्माविरुद्धचाही होता. कारण राजेशाहीला धर्माचा म्हणजे निवडक अंतर्नाद १३