शेळ्या पाळणारी एक म्हातारी आणि तिची नात. त्यांच्या तेवीस शेळ्या. सगळ्याच काळ्या. पण दोघी त्यांना बरोबर ओळखतात. भुंडी नावाची त्यांतली एक हरवते आणि शेवटी सापडते. साधेसुधे प्रसंग, हलकेफुलके अल्पाक्षरी संवाद यांच्यातून चितारलेली एक कथा. मुलगी थकलेली. चिमुरडी पोरच भर उन्हात दारात येऊन उभी राहिलेली. 'मावशीऽ पाणी दे ग.' तिला बघून पत्नीनं विचारलं, 'अशी घाबरलेली का?' 'लई येळ झाला, शेरडी शोधतेय. आता घशाला कोरड पडलीय, पाणी दे ना मावशी. ' ‘देते, पण झालं काय?' 'भुंडी हरवली. ' न विंचरलेले केस तिच्या कपाळावर आलेले. पालथ्या मुठीनं तिनं ते मागं केले. कपाळावरचा घामही तसाच पुसला चेहरा रडवेला, हताश झालेला. 'सगळी ठिकाणं बघितली; पण नाय गावली. ' 'अग, तू तिला ओळखणार कशी? सगळ्या शेळ्या तुझ्या काळ्याच. त्यांतली नेमकी कोणती हरवली? कसं ओळखणार?' भुंडी तिनं परत तेच सांगितलं हरवलीय. ' भुंडी विद्याधर म्हैसकर 'तुझी आजी कुठाय आज?' 'डोंगराकडं गेलीय. भुंडी तकडं गेलीय का बघून येते म्हणाली. ' ‘आणि बाकी शेळ्या कुठं गेल्या?' 'समद्यास्नी घरला नेलं. कोंडून हिकडं आलेय. ' मी संवाद ऐकत होतो. टेबलावर चाललेलं काम आवरतं घेतलं. उठलो, बाहेर गेलो. हिनं पाण्याचा तांब्या पुढं केला. मुलीनं आधी चूळ भरली, पाण्याचा १३६ निवडक अंतर्नाद हबका तोंडावर मारला. मग डाव्या हातातला तांब्या तिरका तिरका करत उजव्या हाताची ओंजळ ओठाजवळ घेतली. त्यात पडणारं पाणी घटाघटा प्यायला लागली. एक थेंब जमिनीवर सांडला नाही. तांब्या संपवून राहिलेल्या पाण्यानं खंगाळून परत केला. मी विचारलं, 'भुंडी हरवली?' रडवेल्या चेहऱ्यानं तिनं मान हलवली. 'कोणती भुंडी ?' 'थोरली. ' दारात उभा होतो, तो मी पुन्हा घरात गेलो, कपायतून रेखाटणांच्या वह्या काढल्या. त्यातील नेमकी वही घेऊन बाहेर गेलो. मला जे जे भावतं ते ते मी रेखाटत असतो. घरासमोर वडाच्या झाडाखाली रोज शेरडं घेऊन म्हातारी आणि तिची नात येणारच, वीस-पंचवीस तिची शेरडं आहेत, वड
पान:निवडक अंतर्नाद.pdf/१३७
Appearance