पान:निवडक अंतर्नाद.pdf/१२१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तिथेच कशाला? झोपडीतही राहणं अशक्य झालं होतं. दुर्गंधीमुळं डोकं फाटून जायची वेळ आली होती. नुसत्या आठवणीनं सुमेसरला वाटलं की ती डेऱ्यावरची दुर्गंधी वाऱ्याबरोबर इथपर्यंत आली जणू. त्याला ओकारी येईलसं वाटलं. पण थुंकी टाकली तर आवाज होईल कदाचित. मग त्यानं तोंडातली तंबाखूची गोळी ह्यतानेच काढून बाहेर यकून दिली. अजूनही मिसिरच्या अंगणातल्या खाटांवर पहारेकरी झोपलेलेच होते, आणि एका खाटेखाली अल्सेशिअनपण बेशुद्धीत असल्यासारखा पडून होता. मात्र एक खाट अजूनही रिकामीच दिसत होती. हा ललनवा परतला नाही कसा अजून? कुठं गेला असेल? आपल्याला पाहिलं तर नाही ना त्यानं? कुणास ठाऊक! कुठे अंधाऱ्या कोपऱ्यात बसून मी उठण्याचीच वाट पाहत असेल. उठलो की बसली त्याची काठी टाळक्यात दुसऱ्या एखाद्या पहारेकऱ्याच्या काठीनं प्राण जायला थोडा वेळ लागेल कदाचित. पण ललनवाचा वार म्हणजे वज्रस्त्रच जसा बाप जल्लाद तसाच बेटा या निठल्ल्यांना कामं काहीच नाहीत. बस! खा, प्या आणि शरीरावर चरबी गोळा करा. यांच्यासाठी मिसिरजी जणू देवघरचे दूतच बनून आले आहेत. काय मेल्यांनी जादू केली मिसिर आणि यांच्या भाऊबंदांवर, की त्यांच्या डोळ्यांदेखत धान्य- धुन्य उचलून स्वतःचं घर भरतात आणि ते एक शब्दही बोलत नाहीत. मिसिरजींच्या मागे लागून लागून महतोंच्या पाड्यावर एक बोरिंगपण बसवून घेतलं होतं. काय असं देणं लागत होते मिसिरजी यांचं? त्यांच्या घरी काही कार्य निघालं की आम्हीदेखील एका पायावर उभे असतो कामाला. पण त्यांनी आमच्यावर कधी विश्वास नाही दाखवला. आम्ही खालच्या जातीचे आहोत, हे कबूल, पण महतो पाड्याची जात तरी कोण मोठी लागून गेली आहे? आमच्यापेक्षा थोडे उच्च असतील एवढंच. पण हे महतो लोक आमचाही केवढा दुस्वास करतात! सुमेसरला वाटलं की ही त्याची सगळी तर्कसंगती चुकली होती. सोपी, साधी गोष्ट ही की जो ज्याची चाकरी करत असेल, तो त्याचा हुकूम पाळणारच, ही रीतच आहे जगाची, तसं म्हणाल तर रामायणबाबांनी कितीकदा मिसिरला सांगून पाहिलं होतं- 'जसं महतो टोळी आणि मल्लहांच्या टोळीला तुम्ही आश्रय दिलाय, अडी-अडचणीला सल्ला देताय, तशी आम्हांला पण काही सेवा करण्याची संधी द्या, आम्हीही कुठे कमी पडणार नाही.' पण मिसिरनं आम्हाला कधीच त्यांच्याइतकं जवळ केलं नाही. आता मधून मधून एखादा बांबू कापून नेण्याची परवानगी मिळत होती तेवढीच, आणि हरियाच्या मृत्युनंतर एक बैलगाडी भरून बांबू दिले होते. त्या दानाचा अर्थ डेरावाल्यांना कळत नाही थोडाच ! या निरर्थक गोष्टींचा विचार करून काय फायदा ? सुमेसरचं डोकं भणभणू लागलं होतं. आता खरी काळजी करायला हवी ती इथून सुखरूप आपल्या झोपड्यांकडं कसं जाता येईल त्याची, तिकडे रात्रीचा शेवटचा प्रहर संपून दिवसाचा पहिला प्रहर सुरू होऊ घातलेला आहे. आकाशातले मघाशी चमकणारे तारेपण क्षीण होत चालले. अजून ललनवा दिसत नाही याचा अर्थ १२० निवडक अंतर्नाद उठण्यामधे धोका आहे. पण चार वाजत आले आहेत, म्हणजे थांबण्यातही धोका आहे एकदा का पहारेकरी उठले की बहिर्विधीसाठी तेपण इकडेच येणार आणि तो अल्सेशिअनपण इकडेच येणार. रात्रीचा मोकळाच असतो. फक्त दिवसा बांधतात त्याला. संकट अगदी समोर येऊन ठेपलं. इकडे आड तिकडे विहिर, आता उठून पळण्यातला धोका पत्करायलाच पाहिजे. नीट विचार करून सुमेसरनं बरोबर आणलेल्या अल्युमिनियमच्या टमरेलातील पाणी हळूहळू सांडून टाकलं आणि उभं राहून तो अंडरवियरची नाडी बांधू लागला. आता त्याची दृष्टी स्थिर होऊन फक्त अंगणातल्या बाजांवरच खिळली होती. हृदयाचे ठोके वाढले होते. हातापायांना कापरं भरलं होतं. घामानं शरीर डबडबून गेलं. नाडी बांधून त्यानं पायातली ययरची चप्पल एक एक करून हातात घेतली, आणि खाली वाकून वाकून बांबूच्या गजपणातून वाट काढत तो हळूहळू एक एक पाऊल टाकू लागला. चर्र, चर्र, चर्र्र्र... कितीही सांभाळा, बांबूची वाळकी पानं पायाखाली चुरतच होती आणि आवाज थोपवता येत नव्हता. दहा एक पावलांनंतर बांसवाडा संपेल आणि शेताचे बांध सुरू होतील. तिथं सकाळप्रहराचा लालिमा पसरलेला होता. गोष्टी स्पष्ट दिसत होत्या. अंगणात कुणी जागं झालं असलं तर नक्कीच त्याला बघू शकेल. ती दहा पावलंपण त्यानं पार केली. उजेडाच्या आगीत पाऊल टाकण्याआधी पुनः एकदा अंगणाकडे नजर टाकली, आणि पटकन पुढे केलेलं पाऊल मागे घेतलं. अल्सेशिअनची शेपटी जोरजोरात हलत होती. ती थांबेपर्यंत आपणही थोडी वाट पाहावी हे बरं! आता जराशी देखील मृत्यूला निमंत्रण ठरू शकते. त्यानं आधीच जरा जास्त उशीर केला. तो ललनवा झोपेत असतानाच उठून जायला हवं होतं. पण आता उशीर केलेलाच आहे तर इथून पुढे जपून जपूनच पावलं यकली पाहिजेत. त्याची नजर अजूनही अल्सेशिअनच्या शेपटीवरच स्थिरावली होती. पण शेपूट हलायची थांबत नव्हती. आता तर त्याच्या देहाची हालचाल दिसू लागली. बहुतेक तो उठून आपलं अंग ताणून आळोखेपिळोखे देत आहे. सुमेसरची भीती वाढली. हे म्हणजे जणू कुणी पळण्याच्या रस्त्यावर मोठेमोठे दगडच रचून ठेवले असावेत. सुमेसरनं आठवतील त्या सर्व देवांचा धावा सुरू केला आणि हनुमानावर येऊन तो अडकला. आपल्याला हनुमानचालीसा पाठ म्हणता येत नाही. आधी का नाही आपण घोकून ठेवली? तिचं पारायण करताक्षणी संकटं स्वतःच पळू लागतात. पण आता काय उपयोग! हे संकट काही टळताना दिसत नाही. जर तो धावत जाऊन बांधालगतच्या पायवाटेवर पोचला तर? तर काय? तिथंदेखील तो पळू शकणार नाही. आवाज होईल आणि अल्सेशिअन हवेच्या वेगानं पळत येऊन त्याला जबड्यात पकडेल, सुमेसरनं कसाबसा हा विचार डोक्यातून परतवून लावला. तिकडे अल्सेशिअन आता उठून सावध होऊन बसला होता, तो परत झोपी जाण्याची शक्यता संपली होती. सुमेसरला वाटलं, त्याचं सर्व शरीर मृतवत झालेलं आहे. फक्त डोक्यात थोडी आकलनशक्ती शिल्लक राहिली आहे. तिथं त्याला