पान:निवडक अंतर्नाद.pdf/११४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अंगाला छान वाटत होते. मग गोसावी म्हणाला, "आता बद्रीला पुढे बसू दे. मी मागे बसतो व झोपण्याचा प्रयत्न करतो. " त्याने ड्रायव्हरला थांबण्याची सूचना केली. अॅम्ब्युलन्स थांबल्यावर आम्ही सर्वच उतरलो. सगळ्यांनाच घाईंची लघवी लागली होती. आम्ही रांगेत लघवीला उभं राहिल्यावर राहुलने मागे एकदा काढलेला आमचा फोटो मला आठवला व त्याही परिस्थितीत हसू आलं. आज राहुलचा मृतदेह आमच्याबरोबर होता. बद्रीलाही ते आठवलं असावं. तोही हसला. ड्रायव्हर कुठेतरी दूर लघवीला जाऊन आला. गाडी परत सुरू झाली. यावेळी बद्री माझ्याजवळ बसला होता. मी जरा सावरूनच बसलो होतो. गोसावीनं जे सांगितलं त्या सर्व गोष्टींचा विचार करत होतो. गोसावी आणि राहुलमधल्या आर्थिक संबंधांबद्दल आपल्याला काहीच कसं माहीत नव्हतं याचं आश्चर्य वाटत होतं. माणूस कळणं किती अवघड असतं, याची जाणीव होत होती. “और बद्री ? तेरा कैसा चल रहा है?" मी विचारलं. बद्री काहीच बोलला नाही. "बहुत बुरा हुआ राहुलका, उसने ऐसा करना नही था, " बद्रीला मराठी चांगलं समजायचं पण बोलता यायचं नाही. किंबहुना त्याने प्रयत्न केला नाही, "राहुल गया उसमे मै दोषी हूँ ऐसा लगता है" जरा वेळानं तो म्हणाला. मी एकदम आवंढा गिळला. बद्री हे नवीनच सांगत होता. "हां राघव. मुझे ऐसाही लगता है " “क्यो? तुने क्या किया?" "राहुल चक्कर आदमी था. एक बात उसके दिमाग मे घुस गयी तो उसको निकालना मुश्कील होता था, बहुत जिद्दी था.” "उसने क्या किया ?" “तूने रूम छोड़ दिया तबसे वो कुछ खोया खोया लगता था. हमे कुछ बोलता नही था. एक छुट्टी के दिन मै उसको माटुंगा मे मेरे मामा के घर लेके गया, तुझे भी मालुम है मेरे यहाँ कुछ रिश्तेदार है. मै उसे लेके गया. अपनेपनमे उधर कुछ और ही हो गया. " "क्या हुआ?" "मेरे मामा की बेटी बीस साल की है बी. कॉम. करती है पिक्चर में श्रीदेवी कैसी दिखती है, वैसी है. उसे कॉलेज की श्रीदेवी कहतेभी है. राहुलने उसको देखा और वो पागल हो गया. हम घर आते वक्त वो मुझे कहता है की वो लक्ष्मी से शादी करेगा.” मलाही हे नवीनच वाटलं. "राघव, हम अय्यर है. लक्ष्मी अभी सीख रही है, उसको आगे पढ़ना है." "अय्यर है तो क्या हुआ? राहुल भी कुछ कम नहीं था.” जातधर्माबद्दल कोणी बोललं की मला राग यायचा, पण आपल्या भारतीय मनात जात-धर्म- प्रांत अगदी खोलवर रुजले आहेत. "ये नही हो सकता राघव, मुझे ये अच्छी तरहसे मालूम है, मैने उसे यही समझाया. उसने मेरा माना नही.” "मग त्याने काय केलं?” "आपल्या घरी त्याने मला दोनतीनदा तिच्याबद्दल विचारलं. तिचाच विचार तो एकसारखा करत असावा. मुझे बोलता नही था. एक दिन उसने पागलपन की कमाल कर दी.” "क्या?" "वो मुझे पुछे बगैर मेरे मामा के पास चला गया. खुद के बारे में मामा को सब बताया और बोला की उसको लक्ष्मीसे शादी करनी है. मामा परेशान हुए, उसने प्रपोजल रिजेक्ट नहीं किया मगर हाँ भी तो नही बोला. वो कैसे हाँ बोलता था ? राहुल हॅड टेकन इट इन राँग स्पिरीट मामाने मुझे उसके घर बुलाया और ये सब बात बतायी. मै परेशान था. राहुल दुःखी था, वो मुझसे मदत चाहता था, परहॅप्स इट वॉज हिज फर्स्ट लव पहला प्यार ज्यादा दुःख पहुँचाता है, उसका अंत ऐसे होगा ये मैन कभी सोचा नही था. वो खोया खोया रहता था. मै उसे क्या मदद कर सकता था? शादी खेल थोडी है? राहुल मेरा अच्छा दोस्त था. शायद मैने ठीक से दोस्ती निभायी नही मामला इस हद तक पहुंचेगा ऐसा लगता था, तो मै जरूर कुछ ना कुछ करता था, उसकी जान सबसे किंमती थी. राहुल कभी किसीसे मदत नहीं चाहता था. सिर्फ इस मामले मे उसे मेरी मदद की जरूरत थी और मैने कुछ नही किया वो अंदरही टुटता गया. सब दुःख अपने आप सह लेता था, आय वॉज हेल्पलेस. मैने उसे बचाने की कोशीश तक नहीं की सिर्फ देखता गया." बद्री खिडकीवर डोकं ठेवून बसला. तो आतून रडतो आहे हे कळत होते. मी त्याचा हात हलकासा हातात घेतला. "जे घडायचं ते घडून गेलं. आता त्याचा काही उपयोग नाही. " "हम सबको तेरी याद आती थी. तू उसे समझा सकता था. वो तेरी बात मानता था. " मी काही बोललो नाही. राहुलने चार दिवस आधीच फोन करून मला भेटायला सांगितलं होतं. मीसुद्धा त्याला भेटणारच होतो. त्याआधीच त्यानं ते केलं. त्याला माझ्याशी काय बोलायचं असेल? मी गप्प बसलो. डोळ्यावर झोप येत होती. कोणाशीच बोलावंसं वाटत नव्हतं. डोक्यात राहुलचे विचार होते. तेवढ्यात बद्री बोलला, "अरे खन्ना को बैठने दो. वो बेचारा कबसे पिछे बैठा है.” मला ते नकोसं वाटत होतं. आता खन्ना आणखी काय सांगेल याची भीती वाटत होती. पण बद्रीने अॅम्ब्युलन्स थांबवली. निवडक अंतर्नाद ११३