पान:निवडक अंतर्नाद.pdf/११३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

मी त्यांना नकार दिला नाही. ते आपणहून मला पूर्ण वेळ पुढे बसण्यास सांगत होते. तेवढे मला जपत होते. सुरुवातीस गोसावी माझ्याजवळ बसला. अॅम्ब्युलन्स हायवेला लागली आणि तिने चांगलाच वेग पकडला. झोंबणारा वारा येऊ लागला म्हणून माझ्याकडील खिडकी बंद करून टाकली. गोसावी माझ्याशी बराच वेळ काहीच बोलला नव्हता. काहीतरी विचार करत असावा. मग एकदम म्हणाला, "राघव, मला तुझ्याशी काही बोलायचं आहे " "मग बोल ना –" काही क्षण परत शांततेत गेले. "राहुलने माझ्यामुळे आत्महत्या केली असं मला वाटतं.” त्याचा चेहरा एकदम रडवेला झाला. मी त्याचा हात धरला. हलकासा दाबला. "मोकळेपणी सांग, मनात ठेवू नकोस. त्याने जास्त त्रास "जवळपास गेलं वर्ष तो माझा खर्च करत होता. माझा उदरनिर्वाह त्याच्यामुळे होत होता. तुला माझी घरची परिस्थिती माहिती आहेच. वडील सरकारी नोकरीत, प्रामाणिक अधिकारी. आई घरीच असते. दोघं धाकटी भावंडं बहीण बी. कॉम. ला तर भाऊ इंजिनिअरींगला. मला काहीतरी वेगळं बनायचं ह्येतं. लहानपणापासून सिंदबादच्या सफरी मनावर कोरत आल्या. वाटलं असं आपणही समुद्रावर जावं, त्या ऊर्मीतून ह्या कोर्ससाठी आलो. चार वर्षं झाली, अजूनही आपला कोर्स झालेला नाही. वडलांना सांगितलं होतं की दोन वर्षांत कोर्स पूर्ण होईल. पण तीन वर्षं झाली. तसा वडलांचा धीर खचत गेला. ते तसे वाईट नाही आहेत, पण त्यांच्याही अडचणी आहेत. "मी मागच्या वर्षी गावी गेलो होतो. तेव्हा वडलांनी घरची परिस्थिती समजावून सांगितली. धाकट्या बहीण-भावाने तुला पोसण्याची वेळ आणू नकोस म्हणाले. आपण हैद्राबादहून मुंबईत आलो होतो. वडलांचं म्हणणं मुंबईत शिकवण्या वगैरे करूनही बरेच पैसे मिळतात. आता तू तुझं बघून घे, अगदीच अडचण असेल तर मला सांग, मी गावाहून आल्यावर खूप परेशान होतो. इथे विरारला कोणाच्या शिकवण्या घ्यायच्या हा प्रश्नच होता. होईल.” माझ्या बोलण्याने त्याला थोडा धीर आला असावा. "कारण शेवटी राहुलच मला पोसत होता. तो लग्न करून मधेच निघून गेला असता तर? वडलांकडून पैसे घेणं मी कधीच "राहुल खूप चांगला होता. त्याच्याशिवाय मी हा कोर्स पूर्ण बंद केलं होतं. त्यांना वाटत होतं मी शिकवण्या घेऊन शिकतो करू शकत नाही. " आहे. कोणालाच सत्य काय ते माहिती नाही. "का?" "राहुलला माझी ही अवस्था कळली असावी. त्याने मला माझी परेशानी विचारली. तो म्हटला, 'शिकवण्या घेणं तुला जमेल का ह्याची मला शंका आहे. तू जरूर प्रयत्न कर, पैशाची चिंता करू नकोस. मी माझ्या घरून जास्त पैसे मागवेन, तुझा कोर्स पूर्ण करण्याची जबाबदारी माझी!' वडील नकार देत होते ते राहुल करू बघत होता, मीसुद्धा बदमाशच असेन. राहुलचं म्हणणं मी सरळ मान्य केलं. कुठलीही खळखळ न करता ते स्वीकारलं, मला रेडिओ ऑफिसर व्हायचं होतं. मी शिकवण्यांसाठी प्रयत्नच केला नाही. राहुलवर पूर्णपणे अवलंबून होतो. जणू माझा त्याच्यावर हक्कच होता. तुम्हाला कळू नये म्हणून महिन्याच्या सुरुवातीलाच तो माझ्याकडे पैसे देऊन ठेवायचा. नंतरही मला लागले तर मी त्याच्याकडे हक्काने मागायचो. तो घरचा श्रीमंतच होता. त्याला काही फरक पडत नव्हता. सगळं व्यवस्थित चाललं होतं. "मला हे बिलकूल अपेक्षित नव्हतं. कोणी एवढा चांगला असू शकतो हे माझ्या कधी मनातही आलं नव्हतं, जे करायला ११२ निवडक अंतर्नाद "तू आमच्यातून बाहेर पडलास आणि काहीतरी बिनसायला लागलं. राहुल उदास दिसायचा, पण आम्हाला काही सांगायचा नाही. "त्याच्या लग्नासाठी घरून कधीचा दबाव येत होता. अखेर राहुलने लग्न करायचं ठरवलं. मला धक्काच बसला. राहुलने लान करून मला चालणार नव्हतं. माझं रेडिओ ऑफिसर बनण्याचं स्वप्न अधुरं राहिलं असतं. "राहुल गेला असता तर माझ्या स्वप्नांचा चक्काचूर झाला असता. मी त्याची कडक शब्दांत निर्भर्त्सना केली! लग्नच करायचं होतं तर एवढी वर्षं आमच्याबरोबर कशाला काढलीस म्हणून विचारलं. तो वाद घालण्याच्यांपैकी नव्हता. "मी एक दिवस त्याला स्पष्टच म्हटलं, 'तू लग्न करून गेलास तर मी काय करायचं? मला असं अर्धवट सोडून तू कसा जाऊ शकतोस?' "तो म्हटला, 'मी लग्न ठरवतो आहे. लगेच करत नाही. मी स्वतः हा कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न करेन. तूही लवकरात लवकर हा कोर्स पूर्ण करण्याचा प्रयत्न कर.' "मला काय हौस आहे कोर्स लांबवण्याची? आणि तू आता असं म्हणतो आहेस. पण घरच्यांपुढे तू काय बोलणार?" "मग राहुल गप्प बसला. कुठलाच वाद तो वाढवायचा नाही. "तो गावाला जाऊन लग्न ठरवणार होता. मला तसं व्हावसं बिलकूल वाटत नव्हतं. मी अगदी स्वार्थी झालो होतो, मला काय झालं होतं तेच मला आता समजत नाही. दुसऱ्या दिवशी तो गावाला जाणार आणि हे घडलं. तो आता कायमचाच गेला. माझे सगळेच प्लॅन अर्धवट सोडून त्याच्यावर मी नैतिक दबाव आणला होता. त्याला टेन्शन आलं असणार मैत्री आणि घरचे लोक यांच्यामधे तो अडकला होता. त्याला काय करावं हे सुचलं नसेल. माझ्यामुळे त्याचं असं झालं. >> गोसावी परत रडू लागला. मी त्याला थांबवलं नाही. थोड्या वेळानं तो आपोआपच थांबला. काही वेळ कोणीच बोललं नाही. अॅम्ब्युलन्स बऱ्यापैकी वेगानं चालली होती. ड्रायव्हरच्या खिडकीतून गार वारा येत होता.