पान:निवडक अंतर्नाद.pdf/१०६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

दाटाळून आली आवाज घोगरा झाला, मस्तक भणकल्यासारखं झालं. हाताच्या मुठी रागाने वळून ताठ झाल्या. अन् त्याचा तो अवतार पाहून सुभाष झोरेच्या पोटास झोंब आली, तरी उसणं अवसान आणून तो म्हणाला - "आरे काय, दारू बिरू पिवून आला का काय बापा राम पाह्यरी?” आपल्याले "दारू पिवून नशा येणार नाई आता... त्याच्यासाठी तुमचं रगत प्यावं लागंल वरपून चिरपून.... तवा अंगात भिणंल, अन् पर नशा येईल... मायमी तुह्या • खराब बी मपल्या मस्तकी मारलं, सम्दं पानदान वाजवलं.” त्याचा आवाज चिरकला. त्याचा तो अवतार पाहिला अन् सुभाष झोरे घरात पळू पाहू लागला. दुकानाचं तिकडच्या हॉलमध्ये उघडणारं दार त्याने लावून घेतलं होतं. त्याचा आता पश्चात्ताप झाला. मनास भीती वाटाय लागली. तो भेदरून विठोबा गवारेला पाहत होता. अन् तिकडं बायको अन् पोरंसोरं गाणे पाहण्यात दंगून गेले होते. मैं तो भेलपूरी खा रहा था! गाणं जोरात सुरू होतं. बंद दारातूनही इकडं ऐकायला येत होतं. त्याला एकदम राग आला. साले बायकोपोरं कोणी दार उघडून इकडे येत कावून नाईत? हा इठल्याबी खरंच आपलं रगत पिते का काय म्हणावं? त्याची छाती दडपून दडपा झाली, धाकड धुकून होऊन ऊरात दूखाय लागलं, तो हळूहळू दाराकडे सरकू लागला. तसा विठोबा गवारेने गचकन त्याचा हात धरला. अन् सुभाष झोरेच्या अंगास कापरं सुटलं, तो भेदरल्या डोळ्यांनी विठोबाकडे पहाय लागला, कसा एकदम गलितगात्र झाला. "सांग, मले खराब बियाणं देलं का नाई?” "हावं देलं!” "उडदाच्या थैल्यात माती मिसळली का नाई?" भेसळ प्रतिबंधक अधिकाऱ्यानं विचारावं तसं त्याने विचारलं. "हावं मिसळली... माती नाई. रेती मिसळली!” तशी फाड्कन विठोबानं त्याच्या गालफडात लगावली. सुभाष झोरे इकडचा तिकडे दुमता तिमता झाला. "तुहा विचार तरी काय हाये भल्या माणसा ?” "मी तुपला मुडदा पाडणार ह्यये साल्या... एकतं थैलीवर छापेल किंमतीच्या जास्त पैसे घेतले. अन् त्यातबी भेसळीचं बियाणं देलं... हरामखोरा! देश पोसणाऱ्या बळीराजाच्या टाळूवरचं लोणी खातू! अन् सावसुदाम्यासारखा कृषी सेवा केंद्राचं नाव बळीराजा ठेवतू आता मी तुपला भेसळ करणारा हात मोल्ड्याबिगर राह्यणार नाई...” असं म्हणून विठोबा त्याच्याकडे सरकायला लागला तसा सुभाष झोरे बोंब माराय लागला. "महेशाऽऽ नरशाऽऽ दार उघडा... दार उघडा... हा मारून राह्यला बे मले!” तो दाराजवळ जाऊन ओरडायला लागला. पण आतून कोणाची काही चाहूलच नाही. आत टी. व्ही. वर मुकाबला मुकाबलाऽऽ गाणं सुरू होतं. आतले सगळे तल्लीन होवून गाणे ऐकत होते. याचा आवाज तिकडे अजिबात जातच नव्हता. "बिलकुल बोंबलायचं नाही! बिलकुल बोंबलायचं नाई... चूप बसायचं... नाईतं आसाच नल्डा दाबून जीभ बाहीर काढीन तुपली!" विठोबा गवारे असं त्याच्या कानाशी धमकावल्यासारखा बोलला, त्याच्या डोळ्यापुढे पायाखाली चेंगरून मारलेलं बेडूक दिसाय लागलं, आतडे कातडे पोटाच्या बाहेर पडलेले बटबट डोळ्यांचे वाळूचे खडे झालेले... ते बेडूक आठवलं. डसणारे डास आठवले... सुभाष झोरेही एक डास वाटाय लागला. भेसळ करून शेतकऱ्याचं रक्त पिणारा मोठा डास... अन् पुन्हा त्याने मच्छराला मारण्यासाठी मारावी तशी थापट सुभाष झोरेच्या गालावर उठवली. तर सुभाष झोरे एकदम त्याच्या पायावरच पडला. "तुम्ही सम्दी नुकसान भरपाई मी करून देतो. पण तू मले सोडून दे! मारू नको! याच्या पुढी मी आजेबात आसे धंदे करणार नाई! काळाबाजार करणार नाई... तुले किती जवारी झाली आस्ती सम्दी ?" “सम्दी तीस पोते! तीन एकरात तीस पोते!” “तं त्या तीस पोत्याचे पैसे आत्ताच मपल्याकडून घेऊन जाय! तीनशे रुपये क्विंटलचय भावानं नऊ हजार व्हतात... पण मी दहा हजार देतो तुले... पण मले आशी मारझोड करू नको, माही बी. पी. वाढली तं पटकन मरून जाईल मी! अन् माहे लेकरं बाळं उघडे पडतान... 22 त्याला घाम फुटला होता. जीव घाबरला होता. म्हणून धडपडत भिंतीकडे गेला. बटण दाबून पंखा सुरू केला. सिलिंग फॅनची पाती गरगर-गरगर फिरायला लागली. तोंडाचा आ वासून तो धापा टाकाय लागला, पंख्याच्या हवेने त्याचा घाम जिरल्यासारखा झाला. “काई हारकत नाई दे दहा हजार रुपये! अन् बाबू मी सांगून • ठेवतो. मी जिवावर उदार होयेल हाये. माह्याशी जर का दगाबाजी केली त खतमच करून टाकीन तुले मले काय इथी संसारात राहून खायची त तिथी जेलात जावून खाईन मी... पोरंबाळं धावूनच खातात मपले... पण तुपल्या सम्द्या घराचा उन्हाळा केल्याबिगर राहणार नाई मी... तरी "" "नाई रे बाबा! काईंच दगाबाजी नाई करत मी, मले महा जीव प्यारा हाये!” "चाल जाय! आण घरातल्या तिजोरीतून दहा हजार रुपये !” असं म्हणून विठोबा गवारेने त्याला ढकलून दिलं. अन् आरामात बाजयाच्या बियाण्याच्या थैल्या भरलेल्या होत्या, त्या थैल्यावर बैठक मारून बसला. बसल्या बसल्या भोवताली डोळे भिरभिरायला लागले. भोवताली खचाखच माल भरलेला होता. फळ्यांवर विषारी किटकनाशकांच्या बाटल्या मांडून ठेवल्या होत्या. बाजूच्या भिंतीला लागून युरियाच्या, सुफलाच्या खताच्या थैल्या होत्या. निवडक अंतर्नाद १०५