पान:निर्माणपर्व.pdf/125

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

  अशोकचे आज पत्र आले आहे. सोल्झेनित्सिनच्या 'Documentary Record' मध्ये शेवटी शेवटी ३।४ पानांचे एक पत्र आहे. रशियन जनतेला उद्देशून लिहिलेले. देश सोडायच्या आदल्या दिवसाचे. ते पत्र भाषांतर करून 'माणूस' दिवाळी अंकात द्यावे असे अशोकने कळवले आहे.

 मला तर भाषांतराचा मनस्वी कंटाळा; पण दुकानात जाऊन पुस्तक आणले व पत्र पाहिले.

 पत्राचे शीर्षक : Live not by lies.
 सोल्झेनित्सिन लिहितो--

 The simplest and most accessible key to our self neglected liberation is this personal non-participation in lies..
 खोटं लिहू नका, खोटं बोलू नका. खोट्याचा प्रचार करू नका.
 असत्याशी असहकार करा.
 त्याने लिहिले आहे : गांधीजींच्या मार्गापेक्षाही हा मार्ग सौम्य आहे. कमी अवघड आहे; पण सद्य:स्थितीत तोच एक शक्य आहे, उपलब्ध आहे, परिणामकारकही आहे.
 पत्राचा शेवट त्याने असा केलेला आहे--
 If we are too frightened to do anything, then, we are a hopeless, worthless people and the contemptuous lines of Pushkin fit us well :
 What use to heards are gifts of freedom ?
 The scourge, and a yoke with tinkling bells.
 This is their heritage,
 bequeathed to every generation. रेडिओचा एक अधिकारी भेटला होता. संघविरोधी भाषणे करण्यासाठी रेडिओने अनेक नामवंत व्यक्तींना विचारून पाहिले. संघाविषयी मुळीच सहानुभूती नसणाऱ्यांनीही सद्यःस्थितीत अशी भाषणे रेडिओवरून करण्यास नकार कळविला.
 काही नामवंत साहित्यिकांनी म्हणे रेडिओ-टि. व्ही. च्या कुठल्याच कार्यक्रमांची आमंत्रणे स्वीकारायची नाहीत असे ठरविले आहे.हेही नसे थोडके.

ऑक्टोबर १९७५ । (आणीबाणी)

निर्माणपर्व । १२४