हे पान प्रमाणित केलेले आहे.
५५
उमदीशानुग्रह तुज लाभे बाल्यदशीं । साधनयोगें
कैवल्याचा प्रभु होशी ||१|| गुरुलिंगजंगम प्रभुचा तूं
नव अवतार | सद्गुरु उमदीशाचा शिष्योत्तम थोर |
भक्तिपयाचा प्रेषित सिद्ध महोदार | साक्षात्काराचा
तूं महाभाष्यकार ||२|| निंबाळाश्रम तव हें मुक्तीचें
तीर्थं । परमार्थाचें मंदिर अध्यात्मपीठ | ध्यानाची
नेमाची असे साधनपेठ । भक्तजनांना वाटे भूवरि
वैकुंठ || ३ || भक्तीची फल्गुनदी पुनरपि प्रकटाया |
जडजीवां ताराया अवतार घ्यावा । भक्तजनांचें
वांछित पुरवा गुरुदेवा । लक्ष्मीसुत प्रार्थितसे धरूनि
नम्रभावा ॥४॥ जयदेव जयदेव ||
(१४)
( चाल :- जय जय गुरुलिंगा )
( चाल :- जय जय गुरुलिंगा )
जय जय श्रीगुरुदेवा | वाढवि सद्भावा | भक्त -
जनांना दावा । अक्षय निज ठेवा ||ध्रु०|| नवयुगिचा