पान:नित्यनेमावली.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ आरत्या वेदांत- जय जया दासबोधा ग्रंथराजा प्रसिद्धा | भारती ओवाळीन विमळज्ञान वाळबोधा || संमतींचा काव्यसिंधु भरला | श्रुतिशास्त्रग्रंथगीता साक्ष संगम केला । महानुभाव संतजनीं अनुभव चाखिला | अतान जडजीवा मार्ग सुगम झाला ॥ १ ॥ नवविधा भक्तिपंथें रामरूप अनुभवी । चातुर्य निधी मोठा मायाचक्र उगवी | हरिहरहृदयींचें गुह्य प्रकट दावी । वद्धचि सिद्ध झाले असंख्यांत मानवी ॥२॥ ३ वीसही दशकींचा अनुभव जो पाहे । नित्यनेम विवरितां स्वयें ब्रह्मचि होये । अपार पुण्य गाठीं तरि श्रवण लाहे । कल्याण लेखकाचें भावगर्भ हृदयीं ।। ३ ।।