पान:नित्यनेमावली.pdf/१७४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

श्री रामभाऊ रानडे यांचे चरित्र सातवा समास १ ॐनमो जी गुरुदेवा । सच्चिदानंदा चित्सूर्या । आत्म- विद्येच्या आचार्या | मतिप्रकाश मज देई ||१|| माझिये हृदयी वसावें । आपुलें दिव्य दर्शन द्यावें । पावन चरित्र वदवावें । मज मतिमंदाकडोनी ||२|| जमखंडी पात्रन परम | होत नूतन क्षेत्रोत्तम | भूमंडळी ख्यातनाम । नाम- जन्माकारणें ||३|| पहिल्या कन्यंनतर जाण । बहुत दिन नसे अपत्यदर्शन | तेणें गुणें दुःख दारुण | पार्वती मातेस होतसे ॥ ४ ॥ रामेश्वराचे उपासन । आणि अखंड नाम स्मरण | अनन्यभावें करी जाण माता पूत्रापेक्षेनें ॥५॥ तंव तिची तपस्या फळली | पुत्ररत्न प्राप्ति झाली | माता कृतज्ञतेनें भरली | आनंदाश्रू ढाळत ||६|| रामेश्वर चा वरद पुत्र । म्हणोनि नांव रामचंद्र | रानडे कुल परम पवित्र | त्याच्या जननें जाहले | ७ || धन्य मातेचें उदर | जथे । 1 -