Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
११

 साधु कोणास म्हणावें याबद्दल बहुजनसमाजाच्या फारच चमत्कारिक कल्पना असतात. प्रत्ययाचें ब्रह्मज्ञान कोणीच पहात नाहींत. जो नानाविध चमत्कार करतो अथवा अप्रबुद्ध बोलत असतो तोच साधु; ज्याचें शरीर वृद्धापकालींहि तेज:पुंज असतें, अथवा ज्याचा शिष्यसमुदाय फार तोंच साधु : ज्यांच्या शिष्यवर्गात पुष्कळ विद्वान व श्रीमंत लोक असतात, अथवा उपनिषदें, भाष्य वगैरेचें ज्यास उत्कृष्ट विवरण करतां येतें त्यासच साधु म्हणावें; अशा अनेक प्रकारच्या कल्पनांनीं जनसमुदायांत काहूर उठविलें आहे. आत्मज्ञानाचा लोप झाला असल्यानें जिकडे तिकडे अज्ञानांधकार पसरला आहे. या अज्ञानांधकाराचा नाश करण्याचें दिव्य कार्य भाऊरावमहाराज करीत आहेत. ते स्वतः चमत्कार करीत नाहीत; पण अनेक चमत्कार आपोआप होतात :-

 आपण महंती न करिती । परि सर्वत्र चमत्कार होती । कां ते पुण्यमार्गे चालती । म्हणोनियां ॥

 ज्ञानास सिद्धींचा विटाळ । ऐसें वदती वेळोवेळ | परी तो गोविंद कृपाळ । भक्तकाज करीतसे ||

पं. स. २-७१, ७२.

 " शब्दज्ञानानें भुलून जाऊं नका " असें ते नेहमीं सांगत असतात. " बाबांनो मी धनगर आहें. मला व्याकरण कोश वगैरे