ते समयीं ।। १३ ।। ऐसा अलौकिक अनुभव | बालकाचा
वाढवी भाव | श्रीबाबांना ही ते देव । तेव्हांपासून वाटत
॥ १४ ॥ यथाकाळी लग्न जाहलें | तरुण बाबा आनंदले ।
इंचगिरीस सकुटुंब राहिले । करणिकवृत्ति करूनिया
।। १५ ।। निंबरगीमहाराज इंचगेरींत । एकदा
कुलकर्ण्याच्या घरीं उतरत | सारी रात्र साधना बसत |
आश्चर्य बाबांना वाटले ॥ १६ ॥ त्यांनी त्रिवार विचारणा
केली । खोकल्याने बसण्याची वेळ आली । 'इन्नायित्तप्पा'
म्हणोनि | सकाळी हुल्याळाप्रति ते गेले ॥ १७॥ कांहीं
काळ ऐसा लोटला । आकस्मिक आला यमाचा घाला ।
कन्या कांता स्वसदनाला । करालकालें खेचल्या ||१८||
पडतां आकाशींची कु-हाड | उडाली अंतरी गडबड । मति
जाहली दिड् मुढ | क्रांति प्रचंड प्रपंची ॥ १९ ॥ उपजले
वैराग्य प्रबळ | गेले गाणगापुर तात्काळ । उपोषण
करूनिया सकळ गुरुचरित त्यांनी वाचिलें ॥ २ ॥ तेव्हां
तया दृष्टांत झाला | श्रीदत्तांनीं सद्गुरु दाविला । त्याप्रति