पान:नित्यनेमावली.pdf/१५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 रघुनाथप्रिय साधु उमदीस असतांना त्यांनी भाऊरानमहाराज यांचें अंतःकरण निर्गुण उपासनेकडे कसें ओढून घेतले, त्यांस ते निवरगीमहाराजाकडे कसे घेऊन गेले, व गुर्वाज्ञा झाल्याने स्वत:च भाऊरावांवर कसा अनुग्रह केला ( पं. स. २-१७-२१), पुढें भाऊरावांनी प्रपंच चालवून परमार्थ कसा साधला ( २१ - ३१ ), लोकनिदेस कसें जुमानलें नाहीं ( ३१ ३९ ), कित्येक वर्षे, गुरूंवर विश्वास ठेवून खडतर तप सें केलें ( ४०-४५ ), निंबरगीमहाराजचा देहांत झाल्यावर प्रेमदुःखानें विव्हल होऊन दुप्पट जोरानें साधन कसें चालविलें, व अद्वैतसिद्धिी कशी मिळविली ( ५०-५५), याचें वर्णन पंचसमासी समास २ यामध्ये सापडेल. पूर्ण अद्वैतबोध झाल्यावर केवळ लोकानुग्रह करण्याच्या इच्छेनें, गांवोगांवी हिडून त्यांनीं भक्ति कशी वाढविली, व समुदाय वाढवीत असतां त्यांचें वर्तन कसें असें याचें थोड़ें दिग्दर्शन त्याच समासांत (५५-७४) ओव्यांत सांपडेल. त्यांचें वय हल्ली ६८ वर्षांचें आहे व त्यांस दोन मुलगे आहेत. त्यांनी इंचगेरी या गांवीं ( तालुका इंडी, जिल्हा विजापूर ) एक मठ स्थापिला आहे; व तेथें वर्षांतून तीन वेळेस उत्सव होत असतो. चैत्र शुद्ध ९ ते १५ पर्यंत सप्ताह होतो; नंतर सर्व श्रावणमासपर्यंत त्यांचे पुष्कळ शिष्य तेथें जमून साधन वाढ- वितात; पुन:मार्गशीर्ष शुद्ध ९ ते १५ पर्यंत दुसरा सप्ताह होतो त्या मठाचें व सप्ताहाचें वर्णन पंचसमासी समास ३ मध्ये आहे.