Jump to content

पान:नित्यनेमावली.pdf/१४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नव्हती. गुप्तं आहे उदंड धन | काय जाणती सेवक जन | स आहे तें ज्ञान | बाह्यात्काराचे ||" या न्यायानें इतर जनांस त्यांचीं योग्यता कशी कळावी ? आत्मज्ञान जीर्ण झालें होतें, त्याचा त्यांनों जीर्णोद्धार केला व त्यांनी लाविलेला आत्मज्ञानवृक्ष वाढून पुढे त्यांस जशीं फळे येतील तशी त्यांची योग्यताही प्रकट होईल.
 नारायणरावमहाराज यांच्या शिष्यांपैकी मुख्य म्हटलें म्हणजे रघुनाथप्रिय साधु हे होत, हे बालब्रह्मचारी पुरुष होते. काशीयात्रा करून रामेश्वरास जातांना ते निंबरगीनजीक सोनगी गांवी राहिले असतां त्यांच्या तपोवलानें त्यांनी पुष्कळ चमत्कार केले व त्यांची पुष्कळ प्रसिद्धी झाली. नंतर निवरगीमहाराज तेथें येवून त्यांनीं " तुमचा मार्ग फक्त पुण्यतंचयाचा आहे, आत्मज्ञानाचा नव्हे" अशी त्यांची खात्री करून दिली.; आणि रघुनाथप्रिय साधु शरण आल्यानें त्यावर अनुग्रह केला. ( पं. स. १- ३०, ३१. ) नंतर साधुनुवा निवरगीहून जवळच असलेल्या उमदीस जाऊन राहिले व बारा वर्षे साधन करून त्यांनी पुष्कळ ज्ञान मिळविलें. तदनंतर त्यांनीं गुर्वाशेनें पुष्कळ लोकांवर अनुग्रह केला व नंतर ते चिमडास येऊन राहिले. तेथें त्यांनी शके १८०१ चैत्र शुध्द ३ स देह ठेविला. त्यांचें ज्या जागीं दहन केलें तेथें एक मोठा वृक्ष लाविला आहे, व तेथील 'तापनाशी' तीर्थात त्यांच्या नांवें त्यांचे शिष्य रामभाऊमहाराज यांनीं एक बाण स्थापिला आहे.