पान:निखळलेलं मोरपीस.pdf/८२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदर्श शिक्षकासमोर उभा होता. त्याच्या डोळ्यांतील पाणी थांबत नव्हतं.

 तेवढ्यांत कुणीतरी शासकीय अधिकारी पुढे आला. के.ई.एम्. हॉस्पिटलमध्ये स्मगलर्सनी केलेल्या बेछूट गोळीबारात जे मृत झाले, त्यांच्या जवळच्या नातलगांना प्रत्येकी पन्नास हजाराचा चेक शासनातर्फे द्यायला तो आला होता.

 फोटोतील आप्पांचे ओठ काही तरी बोलण्यासाठी विलग झाले होते. ते म्हणत होते, "थँक यू, मि. डेथ."

 पण त्यांचे शब्द फक्त नियतीलाच ऐकू जात होते!

निखळलेलं मोरपीस / ८१