र्सिटीनेंच फेलो नेमलें, एक वर्ष ते सिंडिकेटचेही सभासद होते, परंतु पुढे मात्र निवडून आले नाहींत. पुढे पुढें सीनेटच्या बैठकींसही त्यांस वेळेवर जातां येत नसे. कारण कामाचा बोजा त्यांच्यावर किती पडें हें त्यांचे त्यांनाच कळे. ते हजर असले म्हणजे मात्र वादविवादांत लक्षपूर्वक मन घालावयाचे. शिक्षण हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. बी. ए. च्या परीक्षेस इतिहास हा विषय सक्तीचा असावा कीं नाहीं या प्रश्नावर जेव्हां भवति न भवति होत होती तेव्हां गोपाळरावांनी उत्कृष्ट भाषण केलें. हेंच त्यांचें शेवटचें भाषण होय. हिंदुस्तानांतील तरुणांस इतिहासाची फार अवश्यकता कशी आहे तें त्यांनीं स्पष्टपणे सांगितलें. हा विषय अवश्यक असावा असें त्याचें म्हणणें होते आणि त्याच वेळेस जर मतें घेतलीं असती तर गोपाळरावांचा जय झाला असता. कारण त्यांच्या भाषणानें खरोखरच मनावर परिणाम घडवून आणला असें तें भाषण ऐकणारे लोक सांगत. परंतु उपयोग झाला नाहीं. नवीन 'ऐच्छिक इतिहास' या विषयाचा अभ्यासक्रम जेव्हां आखण्यांत आला तेव्हां मात्र त्यांच्या मतास- म्हणण्यास मान देण्यांत आला. राजनीतिशास्त्राचा अभ्यास आणि अर्थशास्त्र हा विषय बी. ए. ला हिंदुस्थानची आर्थिक परिस्थिति हा विषय एम्. ए. ला ठेविण्यांत त्यांनींच भीड खर्च केली. ते पुष्कळ वर्षे इतिहास व इंग्रजी यांचे परक्षिकही होते.
१८९६ मध्यें कलकत्त्यास राष्ट्रीय सभा होती. रानडे व गोखले ही गुरुशिष्यांची जोडी तेथे गेली होती. गोखल्यांविषयीं रानडे यांस आतां बरीच अशा वाटू लागली होती. हा पुढे मोठा मनुष्य होईल, राष्ट्राचा नेता होईल असे भविष्यकाळचें स्वप्न त्यांच्या दृष्टीस दिसूं लागलें होतें. गोखल्यांची तेथे ओळख करून देतांना ते म्हणाले 'हा एक होतकरू तरुण असून हिंदुस्थानच्या पुढाऱ्यांत याची गणना होईल,' हे त्यांचे शब्द अक्षरशः खरे ठरले, म्हणजे या सुमारास रानड्यांस त्यांचे सर्व गुण, त्यांची योग्यता कळून आली असली पाहिजे; एरव्हीं नेहमीं जबाबदारपणे बोलणाऱ्या व अवास्तव स्तुति न करणाऱ्या रानड्यांच्या तोंडून असे उद्गार बाहेर पडले नसते. "स्तुति येति न मुखासि या असारा ज्या"– असार म्हणजे पोकळ स्तुति अशा थोर पुरुषांच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/८७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
गोखल्यांची मुंबई-विद्यापाठांतील कामगिरी.