केलें. त्या गोष्टीच्या अनुकरणार्थ कांहीं आज आम्ही शिवाजी- उत्सव करीत नाहीं. तर जो धर्माभिमान, जो राष्ट्राभिमान, जें तेज, जें धैर्य, जें वीर्य, जें शौर्य, जो स्वार्थत्याग, जें युक्तिबल, शिवाजीनें व त्या वेळच्या लोकांनी दाखविलें तेच गुण आजही आपल्या अंगांत पाहिजेत. आपण शेळपट, नादान होत चाललो आहों याची जाणीव लोकांच्या मनांत टिळकांस उत्पन्न करावयाची होती. मुसलमानांस वाईट वाटण्याचें यांत कारण काय? मुसलमानांस आणि हिंदूंस सोंवळा असा नेल्सन, वेलिंग्टन, नेपोलियन यांपैकीं कोणाचा उत्सव आम्हीं सुरू केला पाहिजे होता कीं काय असें चिरोलसाहेबांस आमचें विचारणें आहे. जी विभूति लोकांस आपलीशी वाटेल, अवतारी वाटेल तीच त्यांच्यापुढें ठेवावी लागते. मुसलमानांनी सुद्धां शिवाजी- उत्सव करावयास हरकत नाहीं. त्याने त्यांच्या धर्मावर हल्ला केला नाहीं; त्यांच्या मशिदी पाडून मंदिरें उभारली नाहींत; परधर्मी म्हणून त्यांच्या मुंडक्यांची रास केली नाहीं; परधर्मांतील स्त्रियांशी विवाह केला नाहीं; परकी स्त्रिया जनानखान्यांत घातल्या नाहीत; तेव्हां असें उदाहरण त्यांच्या हिंदुस्तानांतील इतिहासांत क्वचित्च सांपडेल. शिवाजीचे गुण आपल्यांत आणण्यासाठी हा उत्सव आहे. आणि त्या गुणांची सदा सर्वकाळ जरुरी आहेच.
परंतु टिळकांच्या या दोन उत्सवांनीं सरकारास वाटले की, यांत जातीजातींचें वैमनस्य वाढविण्याचें बीज आहे. त्याचीच री मवाळांनींही ओढली. मलबारी या गृहस्थांनी ईस्ट आणि वेस्ट या मासिकांत १८९७ मध्ये सद्यःस्थिति या विषयावर एक लेख लिहिला आहे. या उत्सवासंबंधी ते म्हणतात "His movement to revive the memory of Shivaji though deserving of sympathy from every generous heart so far as it aims at the unity of the Deccan, is historically an anachronism. आणि पुढे म्हणतात Mind has been liberated to a certain extent, not so the heart." पहिल्याच वर्षी मुंबईत दंगे झाले. मुसलमानांस हिंदूंनीं आपल्यासारखा दहा दिवसांचा उत्सव सुरू केला हें खपलें नाहीं. हिंदूंनी आपणांस वचकावें, त्यांनीं नरमून असावें ही त्यांची इच्छा. हिंदु तुमच्या मोहरमांत भाग घेतात तुम्ही गणपत्युत्सवांत
पान:ना. गोखले चरित्र.pdf/८५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५३
शिवाजी उत्सवाची मीमांसा.