१८९५ साली सुरू केलेला शिवाजी-उत्सव हीं दोन कारणें रानडे- पक्षीयांनी पुढे केली. परंतु या गोष्टींचा राष्ट्रीय सभेच्या कार्यक्रमाशीं कांहीं एक संबंध नव्हता. हे सामाजिक आणि धार्मिक प्रश्न आहेत. लोकांस एकत्र आणण्यास आणि त्यांच्या उत्सवप्रियतेसही पुष्ट करण्यास टिळकांनी हा गजाननोत्सव सुरू केला. राजकीय विघ्नांचे हरण होण्यासाठीं या विघ्नहर्त्याचा सार्वजनिक पूजामहोत्सव करण्याची त्यांनी रूढि पाडिली. तेहतीस कोटि देवता असतां हिंदु लोक स्वाभिमानरहित होऊन मुसलमानांच्या मोहरमांत भाग घेतात, त्यांच्या डोल्यांपुढे नारळ फोडतात, पाणी ओततात, नाकें घांसतात- हें काय? परकी धर्माबद्दल सहानुभूति मनांत बाळगा, परंतु स्वत्वाचा अभिमान सोडूं नका. मुसलमान तुमच्या गणपयुत्सवांत, विष्णुपूजेत भाग घेतो काय? कधींही नाहीं. तो जर तुमच्यांत मिसळत नाहीं तर तुमचें काय अडलें आहे त्यांच्यापुढे नाकदुऱ्या काढण्याचें? परस्परांनीं परस्परांबद्दल सहानुभूति, सलोखा, प्रेमा दाखविला तर रास्त आहे. परंतु एकानें नाक घांसावयाचें आणि दुसऱ्यानें तर्र असावयाचें हें आह्मांस सहन होत नाहीं. सत्त्व विसरणाऱ्या लोकांस स्वतःचा फाजील अभिमान बाळगणाऱ्या लोकांजवळ गोडीनें वागतां येणें शक्य नाहीं. शेळी आणि वाघ एका वनांत राहणें शक्य नाहीं; दोघे वाघ राहू शकतील. समान दर्जाचे लोक एकत्र राहतील, विषम दर्जाचे लोक संतोषानें- गुण्यागोविंदाने राहणें म्हणजे पाणी आणि विस्तव एकत्र राहण्याप्रमाणें आहे. सर्पाशीं दर्पानेंच वागले पाहिजे तर तो नमेल. आपण त्यास दूध पाजूं लागलों आणि आपल्या घरांत त्याला ठेविलें तर तो विषच वमणार आणि दंश करणार. मानवी स्वभाव असाच आहे. तेव्हां टिळकांनीं हिंदूंचें दौर्बल्य जाणून त्यांस मुसलमानांच्या दर्जाला आणण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांत अभिमान आहे; आपल्यांतही पाहिजे. 'उत्सवप्रियतेमुळे जर मोहरमांत तुम्ही भाग घेत असाल तर हा गजाननोत्सव मी सुरू करितों- चला या इकडे' असे टिळकांनी म्हटले म्हणजे टिळक वितुष्ट पाडणारे झाले काय?
त्याप्रमाणेंच शिवाजी- उत्सवानें मुसलमानांस वाईट वाटेल हा दुसरा आक्षेप, वाईट वाटण्याचे कारण? शिवाजीनें मुसलमानांस सळो की पळो
पान:ना. गोखले चरित्र.pdf/८४
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५२
गणपत्युत्सवाचा हेतु.