मनाची आणि बुद्धीची या प्रकारें उन्नति होत होती. आतां १८९५ साल उजाडलें, या वर्षी कामाचा बोजा संस्थेतही पुष्कळ पडला व बाहेरही कामानें आ पसरला होता. कामास गोपाळराव ना कधींच म्हणावयाचे नाहींत; शरीराकडे सुद्धां पहावयाचे नाहीत. हे काम रेटण्यास ते पुढे सरसावले.
प्रथम ४ मे १८९५ साली बेळगांवास आठवी प्रांतिक परिषद भरली होती. या सभेत फेरोजशहा मेथा यांच्या अभिनंदनासाठी ठराव गोपाळरावांनीच मांडला. मेथा हे हिंदुस्थानांत गाजलेले, नांवाजलेले पुढारी. मुंबई म्युनिसिपालिटीचे ते जीव की प्राण. हिंदु लोकांस म्युनसिपल् कामे कशीं चोख व उत्तम रीतीने करितां येतात हे त्यांनी सरकारास दाखविलें, त्याप्रमाणेंच ते वरिष्ठ कायदे कौन्सिलांत व प्रांतिक कायदे कौन्सिलांत सडेतोडपणें आपले म्हणणे पुढे मांडीत. ते सरकारास वांकून नसत. या वर्षी विशेषतः त्यांनीं कलकत्ता येथील वरिष्ठ कायदे कौन्सिलांत हिंदूंची बाजू सांवरून धरिली, सिव्हिल सर्व्हंट हेच हिंदुस्थानचे राज्य करण्यास लायक अधिकारी आहेत असे सरकारी गोऱ्या सभासदांनी म्हणतांच फेरोजशहांनीं सिव्हिल सर्व्हंटांचे सर्व दोष चव्हाट्यावर मांडले, सर जेम्स वेस्टलंड यांच्या अंगाची तर आग उडाली, मेथा हे कौन्सिलमध्ये नवीन धोक्याचं वारें आणीत आहेत अशी त्यांनी तक्रार केली, परंतु असल्या 'गोमायुरुतां'ना 'केसरी' भीक घालीत नसतो. मेथा त्यांस उत्तर देण्याच्या भानगडीतच पडले नाहीत. कौन्सिले हीं कांहीं सरकारच्या होयबांसाठीं नाहींत हें ह्या सर बहादुरांस समजलें पाहिजे होते. कलकत्त्याच्या स्टेट्स्मनने मेथांच्या वर्तनाचा गौरव केला. कलकत्त्यास डब्ल्यू. सी. बानर्जी यांच्या अध्यक्षतेखाली मेथांचं त्यांच्या धैर्याबद्दल अभिनंदन करण्यांत आलें. मद्रासकडच्या एका वर्तमानपत्रकर्त्यानं मेथांच्या भाषणाबद्दल म्हटले आहे की 'He returned argument for argument, invective for invective, banter for banter and ridicule for ridicule.' सर्व हिंदुस्थानांत मेथांचे अभिनंदन झाले. बेळगांवासही तें झाले. गोखल्यांचे लहानच पण सुंदर भाषण झाले. गोखल्यांस मेथांबद्दल फार आदर वाटे. ते अद्याप नवशिके होते. निरनिराळ्या राजकारणी पुरु
पान:ना. गोखले चरित्र.pdf/७६
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
४४
गोखल्यांचा कष्टाळूपणा.