असत. त्यांच्या अंगांत गुणही तसेच होते. ते अत्यंत खटपटी. सर्व जगांत त्यांच्या ओळखी. समयसूचकता, प्रसंगावधान, कोणाशीं कसें बोलावें व पैसे कसे काढून घ्यावे ही कला पूर्ण साधलेली- यामुळे संस्थेचें वर्गणी गोळा करण्याचे काम नामजोशांकडे असे. मनुष्यस्वभाव त्यांस फार चांगला कळे. त्यांच्या कामाचा धडाकाही तसाच असे. ते आपल्या पवित्र कार्यासाठी, सरदार, दरकदार, संस्थानिक यांच्याकडे जाण्यासही कचरावयाचे नाहीत. त्यांची छाती दांडगी, आवेश जबरा सर्वांपासून पैसा त्यांनी गोळा केला, परंतु ते गेल्यावर हें काम गोखल्यांच्या अंगावर पडलें. १८९२ साली आपटे स्वर्गवासी झाले. आगरकर त्यांच्या जागेवर गेले. टिळक गेल्यावर गणित, इतिहास व अर्थशास्त्र आणि इंग्रजी हे विषय गोखले शिकवीत. परंतु हें कॉलेजमधील वाढलेले काम संभाळून सुट्टी आली कीं खांकेस झोळी लावून गोपाळराव वर्गणी गोळा करण्यासाठी फिरत. पडेल तें काम नेटानें करावयाचें, माघार घ्यावयाची नाहीं हा त्यांचा स्वभाव, फंड जमविण्याचें काम किती कठिण असतें हें तें करणारासच समजते. नाना मतांच्या व नाना दृष्टींच्या लोकांची गांठ पडते. समजून घालावी लागते. हुजत घालावी लागते. शिक्षणासाठीं- या पवित्र कार्यासाठी मदत मागावयास गेलें तरी त्यांतही वाईट पाहणारे लोक नसतात असें नाहीं. वाइटाकडेच दृष्टि ठेवणारे लोक असतात. वाईट सांपडलेंच नाहीं तर ते शंका प्रदर्शित करतात. कोणी स्तुति करितो तर कोणी निंदा करितो. 'हे आले आतां देशाचा उद्धार करणारे! काय ध्वजा लावल्या आहेत हो यांनीं? अक्कल तर पहा यांची, यांची काय कुवत आहे देशास वर आणण्याची?' या प्रकारची निंदाप्रचुर परुषोत्तरे सहन करावी लागतात. कधीं गुलाब सुखवितो, तर कधीं कांटे दुखवितात. असले अनुभव जगाची नीट ओळख करून देतात. मनुष्यांशी कसे वागावें हें समजून येते. थोरांच्या ओळखी होतात. निरनिराळे विचारप्रवाह दिसतात. सर्व इलाखाभर त्यांनीं वणवण केली, आणि मिळेल तें तुळशीपत्र सोसायटीच्या चरणीं वाहिले. १८९२ मध्ये कॉलेजची नवी इमारत झाली; १८९५ मध्ये वसतिगृहे बांधण्यांत आली. परंतु वर्गणीरूपानें पुरेसा पैसा गोपाळरावांनी मिळविल्यामुळे संस्था
पान:ना. गोखले चरित्र.pdf/६१
Appearance