'पुष्कळ वेळां यांचे वाद केवळ 'जितं मया' यासाठीच होत. त्यांत तत्त्वशोधन असे क्वचितच होई' अशा रीतीनें कॉलेजमध्ये दोन पक्ष झाले. आगरकर पक्ष आणि टिळकपक्ष. गोखल्यांच्या मनाचा ओढा आगरकरांकडे असे.
परंतु शेवटची फाटाफूट जी झाली ती केवळ मतभिन्नत्वामुळे झाली असें आम्हांस वाटत नाहीं. मतभिन्नत्व होतें तें कॉलेजमध्ये असल्या वेळेपासूनच होते, परंतु शिक्षण हे त्यांनी समान ध्येय ठरविलें होतें; आणि त्याच्यासाठी ते तळमळत होते; आजवर खटपट करीत होते. १८८८ च्या दसऱ्याला गोपाळराव आगरकरांनी सुधारक हें स्वतंत्र साप्ताहिक काढले. ज्याप्रमाणें आपले मराठे शिलेदार दसऱ्याच्या दिवशीं आपल्या शृंगारलेल्या घोड्यावर स्वार होऊन हातांत तरवारी घेऊन शत्रुखंडनार्थ मोठ्या ऐटीनें आणि उमेदीनें बाहेर पडत, त्याप्रमाणेंच हा नरवीर आपल्या सुंदर तेजस्वी आणि दृढ अशा विचारवारूवर आरूढ होऊन, आपली तेजस्वी लेखणी हीच झळकणारी असिलता हातांत सरसावून, समाजांत माजलेल्या रूढींचें, दुराचारांचे निर्मूलन करण्यास या दसऱ्याच्या शुभ प्रसंगी सज्ज झाला. मरेपर्यंत ते लढले, धीरानें लढले, सुधारकांत इंग्रजी भाग कांहीं वर्षे गोपाळराव गोखले लिहीत असत, यामुळे आगरकरांस मोठी मदत होई. सुधारकांतील मतांवर केसरीत प्रखर टीका होई आणि या टीकेवर सुधारक प्रतिटीका करी. हीं भांडणे कॉलेजमध्येही घुसत व भांडणे मिटतां मिटतां मारामार पडे. इतके झाले तरी टिळकांनी कॉलेज सोडण्याचें मनांत आणलें नाहीं. कॉलेजचें काम चाललेच होतें. या भांडणांमुळे कॉलेजच्या कामांत म्हणण्यासारखा व्यत्यय येत नसावा. नामजोशी द्रव्यनिधि गोळा करीतच होते. ते नेहमीं टिळकांच्या पक्षाचे असत. परंतु या वादांनीं नामजोशी यांनी आपले स्वीकृत कार्य कधीं सोडिलें नाहीं. पुष्कळ लोक टिळक कॉलेजमधून निघाले याचें कारण या वादविवादावर सोपवितात; परंतु हें मुख्य कारण नव्हे. मुख्य कारण म्हणजे पगारवाढ, इतर बाजूंनी पैसा मिळवावा की नाहीं वगैरेच मुद्दयांवर मतभेद झाले हें होय. आणि जेसुइट मतावर निघालेल्या या संस्थेने आपले ध्येय ढकलून दिलें हें पाहून टिळकांनी संबंध सोडला. टिळक तेवढे
पान:ना. गोखले चरित्र.pdf/५७
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२५
सुधाकराचा जन्म.