पुकारून अभंग चिकाटीनें स्वातंत्र्य मिळविलें, ज्याचें वॉशिंग्टन सारख्यांनी संगोपन केलें, लिंकन सारख्यांनीं वर्धन केलें तीच अमेरिका नीग्रोंवर जुलूम करिते आणि परकी देशांस मज्जाव करिते. ज्या इंग्लंडने स्वातंत्र्यासाठी विष्णुस्वरूप राजाची आहुति दिली तेंच इंग्लंड दुसऱ्या राष्ट्रावर सत्ता गाजवून दडपशाही व दंडेली चालवितें याची उपपत्ति काय? उपपत्ति हीच कीं, मनुष्यमात्र स्वार्थी आहे. थोडेफार महात्मे सोडून दिले तर प्रत्येकजण दुसऱ्यास लुबाडूं पाहणार, हीच वृत्ति जगाच्या इतिहासांत आपणांस दिसते. लुबाडणारा सवाई चोराकडून जेव्हां स्वतः लुबाडला जाऊं लागतो तेव्हां मग त्यास ब्रह्मज्ञानाची उकळी फुटते. तो मोठमोठीं गहन तत्त्वें सांगू लागतो. लुटला जाणारा लुटारूंस विरोध करूं लागतो, परंतु नागवला जाणारा जेव्हां असहाय्य व निःशस्त्र असतो तेव्हा खरी कसोटी असते. या असमान सामन्यांत लुटले जाणाऱ्यांचे जे पुढारी असतात त्यांच्या परीक्षेची वेळ असते. त्यांना निराळेच मार्ग आंखावे लागतात. शस्त्रास्त्रे बाजूस ठेवून आपली सर्वागीण उन्नति करून लुटारूस सांगावयाचें 'मी तुझ्या बरोबरीचा आहे; माझे हक्क मला मिळाले पाहिजेत.' ज्यांची आज हिंदुस्थानावर सत्ता आहे त्यांची विद्या, त्यांचे उद्योग हे आपण आपलेसे केले पाहिजेत. ज्यांस सर्व साधनें अनुकूल त्यांच्याबरोबर आपणांस झगडावयाचें आहे. आपल्यांतील शक्य त्या उणिवा आपण नाहींशा करण्याच्या प्रयत्नास लागणे हें, प्रथम कर्तव्य आहे. आपणांस कष्टप्रद स्थिति आली आहे तिचे नुसते वाईट वाटून काय बरें फायदा? आपण फार श्रीमंत होतों; आज दुबळे झालों आहों. सुख भोगून मग दरिद्र येणें फार वाईट. आमचा देश वैभवाच्या शिखरावर होता तो आज खोल दरींत आहे. ज्या आमच्या देशांत सतत सुबत्ता असावयाची, त्या आमच्या सुंदर देशास आज अर्धपोटीं रहावें लागतें अशी हलाखीची स्थिति आली आहे खरी. परंतु अंतरीं तळमळून फायदा नाहीं. डोळ्यांत अश्रु आणून आणि ढोपरांत मान घालून आलेली स्थिति थोडीच पालटणार आहे? रडावयास वेळ नाहीं. डोळ्यांतील अश्रु डोळ्यांतच आटू द्या. परिस्थितीचा विचार करून तिला बदलण्यासाठी, जेथें श्मशान आहे तेथे नंदनवन निर्माण
पान:ना. गोखले चरित्र.pdf/३५
Appearance