Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८७
कुटिल राजकारणांत फाजील सरळपणा काय कामाचा ?

wrong and ridiculous leading him into embarrasment. This faculty greatly developed in him as he progressed. Indeed, I should say it became confirmed. At our inner circle, when we happened to meet together for the discussion of a burning question, we had to pull him up, and be it said to bis credit he would soon correct himself though not without a preliminary struggle' या दुर्गुणाप्रमाणेच हट्टीपणा, एकाद्या गोष्टीविषयी अढी त्यांच्या मनांत असे. हट्टीपणाबरोबरच त्यांच्या अंगी उतावळेपणाही होता. एकादी गोष्ट मनांत आली, की ती ताबडतोब अमलांत आली पाहिजे असे त्यांस वाटे. एकाद्या गोष्टीची शंका आली, की लगेच ते दुसऱ्याला कळवावयाचे. पुण्याच्या काँग्रेसच्या वेळी त्यांनी वाच्छांस अशीच तार केली. टिळकांबरोबरच्या शेवटच्या वादविवादांत, टिळकांविषयी शंका घेऊन लगेच त्यांनी भूपेंद्रनाथ बसूंस तार केली. या उतावीळपणानेंच गोखल्यांस इंग्लंडमध्ये झालेल्या प्रकाराबद्दल क्षमा मागावी लागली.
 गोखल्यांचा सरळपणा तर इतका होता, की तो गुणाची मर्यादा ओलांडून अवगुण झाला असे म्हटले पाहिजे :- 'Goodness has a limit, which if passed somehow seems to make men cowardly.' अत्यंत सरळपणामुळेच बोथांस 'वचन द्याच' असे गोखल्यांस जोराने ठासून सांगतां आलें नाहीं. कोणत्याही गुणाला मर्यादा असते. त्या मर्यादेपलीकडे तो अवगुण होतो. या सरळपणास भोळसरपणा हे नांव प्राप्त होते. जगांतील निरनिराळ्या व्यक्तींबरोबर कसे वागावें हें गोखल्यांसारख्या साध्यासीध्या माणसास कसे समजणार? आणि राजकारणी पुरुषास तर याच गुणाची प्रामुख्यानें जरुरी असते. नाना प्रकृतींच्या पुरुषांजवळ त्यास विचार-विनिमय करावा लागतो. अनेकांची अंतरे उलगडावी लागतात. हा गुण गोखल्यांत नव्हता. मोर्ले माहेब स्टेट सेक्रेटरी झाल्याबरोबर गोखले मनांत मांडे खाऊं लागले. परंतु मानवी स्वभावाचें सूक्ष्म ज्ञान असलेल्या टिळकांनी ताबडतोब मोर्ल्यांचे सत्यस्वरूप त्यांच्या तोंडावरील तत्त्वज्ञानाचा बुरखा दूर करून जनतेस दाखविलें. राजकारणांत बिस्मार्कसारखे, मॅचिव्हिलीसारखे, लॉईड जॉर्जसारखे कारस्थानी पुरुष असतात. अशा लोकांबरोबर त्यांच्या तोलाचा असा कारस्थानी नाना फडणीसच लागतो. आणि टिळकच या गुणांत अग्रेसर होते. गोपा