जगतो, व ज्यामुळे त्याला आयुष्य सार्थकी लागले असें वाटतं, तो मनुष्य धार्मिकच समजला पाहिजे. अशा दृष्टीनें गोपाळराव हे धार्मिक कोटींतले, अत्यंत आणीबाणीच्या वेळीही नीतीनेंच वागणारे, शत्रूशीं वागतांना देखील सत्याचाच मार्ग अवलंबिणारे असे नीतिरत थोर पुरुष होते यांत शंका नाही. म्हणूनच पुष्कळ लोक त्यांस 'A saintly politician' असें म्हणत. परंतु अज्ञेयवादी गोखले हळूहळू परमेश्वरावर विश्वास ठेवणारे आंतून होत होते. १९०६ किंवा १९०७ मध्ये एकदां इंडियन सोशल रिफॉर्मरचे संपादक कलकत्यास गोखल्यांच्या बिऱ्हाडीं त्यांस भेटावयास गेले होते. त्यांच्या टेबलावर एक पेपर-वेट होतें. त्याच्यावर 'God is love', 'ईश्वर प्रेमस्वरूप आहे' असें लिहिलेलें होतें. गोखले अज्ञेयवादी आहेत हे संपादकांस माहीत असल्यामुळे ते गोपाळरावांस म्हणाले, 'हें काय ?' 'शेवटी मी या विचाराचा झालों आहे' असें गोपाळराव म्हणाले. (That is what he had come to believe). मुंबईस आल्यावर या संपादकांनी गु. डॉ. भाण्डारकर यांच्याजवळ ही गोष्ट काढिली. तेव्हां भाण्डारकर म्हणाले, 'रानडे मजजवळ म्हणाले होते की, गोखल्यांच्या ईश्वरविषयक विचारांत फरक पडला आहे आणि ते तसें जाहीरही करणार आहेत. परंतु त्यांनी आपल्या या बदललेल्या विचारांचा कोठें जाहीर रीतीनें उल्लेख केला नाही. १९०२ पासून जेव्हां ते कलकत्त्याच्या कौन्सिलच्या बैठकींस जाऊं लागले तेव्हां तिकडील ब्राह्म समाजाच्या मतांचा त्यांच्यावर फार परिणाम झाला. याच सुमारास ते विवेकानंदांचे वगैरे ग्रंथ वाचीत होते. २६ जुलै १९०२ मध्ये इंडियन सोशल रिफॉर्मरमध्ये विवेकानंदांवर एक लेख आला होता. तो गोखल्यांस फार आवडला. ते लिहितात :- 'I wanted to write and tell you sometime ago, that I read your article on Vivekanand with great pleasure. During my stay in Calcutta I came to understand his aims and aspirations much better than before and you exactly expressed my feelings in your article.' गोखल्यांचा व ब्राह्मसमाजांतील घरंदाज घराण्यांतील पुरुषांचा सतत दहा वर्ष परिचय झाला आणि त्यांच्या धार्मिक विचारांत क्रांति झाली असें म्हणावयास हरकत नाहीं.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८५
नीतिरत गोखल्यांचें धार्मिक मतांतर.