friend. This suspicion may be found to exist in conjunction with regard, with esteem, nay, with affection.' तेव्हां राजकारणांत पडल्यामुळे जरी गोखले व टिळक यांमध्ये विरोध आला तरी परस्परांच्या मनांत परस्परांविषयी खरा आदर असे. आगरकर म्हणत 'माझ्याविषयी सर्वांत जास्त प्रेमळपणें रडतील तर ते टिळकच.' टिळकांविषयी आगरकरांस जसें वांटे तसेंच टिळकांस आगरकरांविषयी वाटे. टिळक हे स्वभावानुसार प्रखर मारा करीत. परंतु आपण या टीकेच्या माऱ्यांतून सुटावं अशीही इच्छा त्यांनी कधी केली नाहीं. टिळक मंडालेस गेल्यावर गोखल्यांवर जी अश्लील टीका मेळ्यांमधून व वर्तमानपत्रांतून झाली ती टिळक असते तर खात्रीने होती ना. थोर पुरुषांचा होणारा नाहक छळ कोणास संतापविणार नाही: कोणास विव्हळ करणार नाही? महाजनी म्हणतात, 'गोपाळराव गोखले यांचे चरित्र तापल्या सळईनें आमच्या हृदयावर उठविलेले आहे.' आणि तें खरें आहे; आम्हीही हें म्हणण्यांत भागीदार आहों. परंतु टिळकांच्या मनांत विरुद्ध पक्षाविषयां hatred द्वेष असे हें म्हणणें मात्र आम्हांस कसेसेच वाटते. मोर्ले साहेब म्हणतात :- 'It is difficult to trace the cause of a dispute between statesmen.' आपण वाटेल ते कुतर्क करतो. विरुद्ध पक्षीयांचा द्वेष वाटण्याचे टिळकांस कांहींच कारण नव्हते. प्रतिस्पर्ध्यास ते विरोध करीत पण विरोध म्हणजे द्वेष नव्हे. आगरकर, रानडे, गोखले यांचा टिळक द्वेष करीत असं म्हणणें म्हणजे म्हणणाऱ्याने स्वतःच्याच मनाचा अत्यंत संकुचितपणा प्रकट करण्याप्रमाणे होय. ते कधीच द्वेष करीत नसत. उलट त्यांना फार आदर वाटे. गोखले तर टिळकांहून लहान, परंतु आगरकर बरोबरीचे. आगरकरांवर टिळकांनी किती कठोर टीका केल्या आहेत. परंतु एकमेकांचीं हृदयें तेच जाणत. आपण मात्र आपल्या कुत्सित व लघु मनानें त्यांच्यावर कुत्सितत्वाचा आरोप करती हें अत्यंत अश्लाध्य होय. तेव्हां दोघांचे मार्ग भिन्न व मतें भिन्न असली, एकमेकांनी एकमेकांस विरोध केला असला तरी आपण तें विसरणें जरूर आहे. ते विरोध आतां कशाला? प्रत्येकाचे कार्य देशाच्या उद्धारासाठी जनतेच्या अभ्युदयासाठींच होतें. 'आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरम् ॥' त्याप्रमाणें हें त्यांचे कार्य शेवटी देशहिताच्या सागरालाच जाऊन मिळणार. रानड्यांनी एक ठिकाणी सुंदर तऱ्हेनें लिहिले आहे :- 'आकाशांतील पाऊस ज्या प्रकारच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२८०
Appearance