कत्वाचा बोजा एकदोघांवर पडतो आणि बाकीचे सर्व डाराडूर झोंपा घेतात. आपण हा निरुत्साह, हें आलस्य यांचा गठ्ठा जर अजूनही समुद्रांत बुडवून टाकणार नाहीं तर आपले राष्ट्र मात्र समुदास्तृप्यंतु होईल हे आतां आपण ध्यानांत धरले पाहिजे. 'Life is not to sleep but to wake' हें सूत्र डोळ्यांसमोर सदैव असून तदनुसार कृति घडली तरच आतां तरणोपाय आहे. अतःपर असें होता कामा नये. एका हंगेरियन कवीनें म्हटलें आहे, "Faith is the vision of truth; it is what men live by; it holds promise of bright days when the brain is singing the Sun will never never shine and the clouds are hanging low." कार्लाईल असेच म्हणतो :- 'Nation has that within her which the whole world will not conquer.' राष्ट्रे कधीही खच्ची करता येत नाहीत. त्यांचा आत्मा सदैव जिवंत असतो. हें जें तुमच्यामध्ये आहे त्याचें आविष्करण करा; जें गुप्त आहे, जे सुप्त आहे, तें प्रगट करा, ते जागे करा. म्हणजे तुम्हांस कोण दडपूं शकेल? हें जागे करण्यासाठीच टिळक झटले. आमच्यांत तेज चमकूं लागत आहे असें गोखले सरकारास बजावू लागले. आपण सर्वांनी आतां तेज प्रकट केलें पाहिजे. तेजाचा झोतच्या झोत उत्पन्न केला पाहिजे. म्हणजे सरकारचे डोळे दिपतील आणि या दिपलेल्या सरकारच्या हातांतील सत्ता जबाबदार अशा लोकनायकांच्या हातांत येईल. आपल्यामध्ये हें तेज येण्यास गोखले, टिळक यांच्यासारख्या निःस्वार्थी, व देशासाठी देहार्पण करणाऱ्या महात्म्यांचे आपण सदैव ध्यान केलें पाहिजे. त्यांची स्फूर्ति शतांशानें आपणांत आली तरी सुद्धां पुरे होईल. परंतु आपण जास्त कार्यक्षम होण्यासाठी आपला पुढाऱ्यांवर विश्वास पाहिजे. मुसलमानांपेक्षां हिंदु- विशेषतः सुशिक्षित हिंदु- अत्यंत साशंकपणे वागतात. त्यांची मनें लंबकासारखी असतात. असेंच का करावयाचे, तसेच कां नाहीं, त्याचेंच का ऐकावयाचें, असले वायफळ प्रश्न कांही न करणारे लोक विचारीत असतात. हे विचारांतच मरणारे लोक काहीही करूं शकणार नाहीत. आमचा धर्मावर विश्वास नाहीं, पुढाऱ्यांवर नाहीं; शंकांवर मात्र विश्वास आहे. असल्या शंकेखोरांपेक्षां विचारास वाव न देणारे बेफाम लोकही अत्यंत श्रेयस्कर होत. एकानें म्हटलें आहे की 'Heroism flees and never
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७७
Appearance