जाणार. लॉइड जॉर्ज म्हणतात, "There are times in history when this world spins so lenurely along its destined course that it seems for centuries at a Stand-til. There are also times when it rashes along at a giddy space covering the track of centuries in a year. There are such times. Six weeks ago Rusia was an autocracy. She is now one of the most advanced democracies in the world." लोकमत याद करून त्याच्या जोरावर आपले हक्क प्रस्थापित करण्याचा समय आत आला आहे. गोखले व टिळक यांच्या संमिश्रणानें आपला मार्ग आतां आखावयाचा आहे. लोकमत तयार करावयाचे आणि राष्ट्रसंघापुढे मांडावयाचे. खुद्द गोखले यांना मृत्युसमयी जो सुधारणांचा मसुदा तयार केला होता तो त्यांत लढाईमुळे होणारी विचारक्रांति पाहून बदलावा लागला असता. ना. आगाखन हे गोखल्यांचे स्नेही; त्यांना १९१७ आगस्टमध्ये हा मसुदा प्रसिद्ध केला ही चूक झाली. कारण गोखल्यांनी त्या वेळच्या परिस्थितीचे तानमान पाहून जे लिहिले ते माँटेग्यु सुधारणांच्या वेळी प्रसिध्द करणं ही घोडचूक हाय. कारण जें द्यावयास नको त्यासाठी सरकारास गोखल्यांच्या मसुद्यात पुरावा सांपडणार आणि भाषावार प्रांतरचनेसारखी जी मागणी गोखल्यांनी लिहिली तिकडे मात्र सरकार कानाडोळा करणार. या मसुद्यात प्रांतिक स्वायत्तता मागितली आहे तो आपणास कितीशी मिळाली आहे या बाबतीत सरकार किंचित् पुढे गेले आहे खरें. परंतु आपल्या कल्पना लढाईने झालेल्या संक्रमणामुळे फार पुढे गेल्या असल्यामुळे गोखल्यांचे विचार त्यांच्या मागण्या आतां- मवाळांसुद्धां फिक्या वाटतील. तेव्हा सरकारच्या मात्र फायद्यासाठी हे पत्रक प्रसिद्ध झाले असे म्हणण्यास हरकत नाही. मॉडर्न रिव्ह्यूने या कृत्यावर टीका केली तो म्हणतो- 'With all his devotion and statesmanship, Gokhale never was fit to be the non-ctlicial dieta or of India. गोखले जर जगते तर १९१६ मध्ये कमिसन व मॉस्टेसन जो मनुदा तयार केला त्यासं त्यांनी संमति दिली असती. कारण खरोखरच विचारांत प्रचंड बदल होत चालला आहे. ज्या गोष्टीने जगातल्या बारीकसारीक राष्ट्रांतही चैतन्य उत्पन्न केले त्याने हिंदुस्तानाही होणारच. इंग्लंडची दृष्टिही निवळली पाहिजे.
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७४
Appearance