Jump to content

पान:ना. गोखले चरित्र.pdf/२७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७३
टिळक - गोखले गेले, आतां जबाबदारी आपणांवर आहे.

नाहीं. काळोखांतून धडपडत जाऊन जो प्रकाश आपणांस मिळतो त्यावेळचें सौख्य, तो आनंद, कांहीं और आहे. परंतु काळोखांतून उजेडांत जाण्यासाठी उठलें पाहिजे. आपली दरी सोडून बाहेर निघाले पाहिजे. खोलीचे दरवाजे बंद करून बसलो तर अधार नाहींसा होणार नाही. टिळक व गोखले यांनी आपआपल्या परीने शक्य तितके देशकार्य केले. आतां जबाबदारी आपणांवर आली आहे.
 परिस्थितीप्रमाणे मार्ग आंखले पाहिजेत. आज एकंदर जगांत फारच प्रचंड, अतर्क्य, अशा घडामोडी झाल्या आहेत. लढाईमुळे तर एकंदर जगांत फारच क्रांति घडून येत आहे. जुने मार्ग लोपत चालले आहेत. लढाई, अत्याचार यांनी यापुढे कार्य न होता, एकोप्याने, राष्ट्रसंघापुढे आपआपली गाऱ्हाणी मांडून प्रश्न सोडवावे लागतील. टिळकांससुद्धां अत्याचार मान्य नसत हें 'सरला राणी चौधरी' यांनी आपल्या टिळकांच्या आठवणीत दिले आहे. परंतु सर्व-राष्ट्रीय बंड पुकारले तर ते त्यांस पसंत होतें येवढेच नव्हे तर ते त्याचे सेनापति झाले असते. 'An empire which has been conquered by the sword and by breaking every commandment cannot be retained by the sermon.' असे इल्बर्ट बिलाच्या वेळेस १८८५ मध्ये लंडन टाइम्सनें लिहिले होते तें सत्य आहे. इंग्रज सरकारची वृत्ति यामुळे आपल्याकडे कशा प्रकारची राहील हें उघड दिसतें. परंतु आपण भावि परिणामांवर दृष्टि ठेवून वागूं या. उशीर लागला तरी चालेल परंतु शाश्वत मार्गाने चला असे गांधी वगैरे महात्मे आतां सांगू लागले आहेत. अर्थात् परिस्थिति, काळ कदाचित हें सर्व अनुकरणीय व्यवहार्य ठरवील. परंतु तत्त्वाचा मोठेपणा त्यामुळे नाहींसा होत नाहीं तथापि जें तरवारीने मिळविलें तें तरवारीने राखावें लागतें, या तत्त्वाच्या योगानें जगांत कायमची शांतता नांदणे अशक्य होईल. दिवसेंदिवस लोकमतास मान मिळत चालला आहे. सरदार, दरकदार, भांडवलवाले मोठमोठे कारखानदार, जे पैसे पुरवून सरकारास इभ्रतीसाठी, भांडवलासाठी व्यापाराच्या संरक्षणासाठी लढाईस उद्युक्त करतात आणि नाहक इतर साधारण लोकांचे प्राण घेतात, अशा लोकांस राष्ट्रांत दिवसेंदिवस कमी वर्चस्व मिळत जाणार. तेव्हां लढायांनी हक्क मिळविण्याचे मार्ग दिवसेंदिवस कमी होत