हांजी करण्याचाही आरोप करतील. परंतु मोर्ले साहेबांनी वॉलपोल याच्या चरित्रांत म्हटल्याप्रमाणें 'It is not always safe to suppose the lowest motives to be the truest, even in politics.' गोखल्यांचा नेहमी देशहिताशिवाय अन्य कोणताही उद्देश नव्हता. गोखले हे सरकारचीही जबाबदारी ओळखावयाचे. यामुळें सरकारी अधिकारीही त्यांच्यावर रोष करीत नसत. जरी त्यांच्याही पाठीमागें गुप्त पोलीस असले आणि नं. ६२ म्हणून त्यांची गाडी सुटल्यावर तारा होत, तरी एकंदरीत सरकारचा ग्रह त्यांच्याविषयीं, चांगला होता यामुळें पुष्कळ लोक त्यांस सरकारचे हस्तक म्हणण्यासही कचरत नसत. परंतु असे थोडे अविचारी सोडून दिले म्हणजे गोखले हे एक थोर निरपेक्ष राजकारणी होते, राष्ट्राचे वकील होते हें कबूल केलें पाहिजे.
स्वार्थत्याग व देशभक्ति यांत खाली वर कोणीही नाहीं. टिळक- गोखले हे या बाबतीत एकाच सिंहासनावर आहेत. टिळकांच्या विषयी दावरसारख्या विक्षिप्तांनी कांहींही उद्गार काढले तरी जनता त्यांस देशभक्तच समजेल. गोखल्यांची देशभक्ति अशीच सोज्वळ होती. ती दुसरा काय म्हणतो याची अपेक्षा करीत नसे; राहवत नसल्यामुळेच हे देशभक्त झाले. फुशारकी मिरविण्यासाठी या वीरांनी देशभक्तीचा पेशा स्वीकारला नव्हता, तर ते हडाचे- रक्ताचे देशभक्त होते. गोखल्यांस आतां आपण देशसेवा सोडा असें मध्यप्रांतांतील एका उतावळ्या व वेड्या गृहस्थानें सांगितलें असतां गोखले चवताळून म्हणाले, 'मी कोणाच्या हुकुमानें देशसेवेचे काम हातीं घेतलें नाहीं. आणि कोणाच्या हुकुमानें तें खालीही ठेवणार नाहीं. हें कांहीं भाडोत्री काम नव्हे.' त्यांचा स्यार्थत्यागही असाच दांडगा होता. देश हाच त्यांचा देव होता; देश हाच त्यांचा धर्म होता. लालाजी म्हणतात :- 'In our humble opeinion no one is entitled to call himself a patriot who holds anything (excepting his religion of course) dearer than his country.' गोखले हे सोज्वळ देशभक्त होते. हिंदुस्तानच्या अर्वाचीन इतिहासांत दादाभाई, गोखले, टिळक व गांधी ही स्वार्थत्यागाची ठळक उदाहरणें आहेत. परंतु टिळक हे सरकारचे वैरी म्हणून त्यांच्यावर अनेक आपत्ति आल्या. त्यांनी जी प्रचंड जागृति करण्याचे कार्य केले तें एकाद्या 'सतीच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२६९
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
६९
देश हाच माझा देव ! देश हाच माझा धर्म !