टिळकांचे आयुष्य-कार्य होय. आणि याच्यावरच सर्व इमारत उठवावयाची असते. गोखल्यांचे काम 'आधी कळस मग पाया रे' अशा तऱ्हेचें होतें! टिळकांनी पाया तयार केला. पाया जितका भक्कम असेल तितकी भव्य व टोलेजंग इमारत त्यावर उभारतां येईल. पाया लहान बेताबाताचा असेल तर लहानशी बंगली बांधली म्हणजे झाले. लोकांच्या आकांक्षा व इच्छा पराकोटीस नेऊन पोचविल्या पाहिजेत. आपल्या देशास स्वतःचा कारभार चालविण्याचे सर्व हक्क पाहिजेत, असें म्हणण्यापर्यंत जनमनाला टिळकांनी ताणले. आणि येवढा ताण बसतो तेव्हांच कांहीं तरी होते. शंभर मार्कांची तयारी करावी, तेव्हां कोठें चाळीस पन्नास मिळतात. लोकांस जर आपणच सांगू लागलों, की सध्या हे दोन हक्क घेऊन तृप्त व्हा. तर मग काय? छे:! छे!! अतृप्त राहणें हेंच पारतंत्र्यांतील राष्ट्रास शिकवावें लागतें. विशेषतः आपल्या राष्ट्रास तर हें शिकविणें फारच अगत्याचे आहे. परदेशांत जाऊन काम करणाऱ्यास स्वतःचा देश पाठीशी पाहिजे असतो. तो उभा करण्याचे काम टिळकांनी अंगावर घेतले होते.
काम करण्यासाठी योजावयाच्या या दोघांच्या भाषेतही फरक असे. टिळक अशक्य-त्यांस कदाचित तें शक्य दिसत असेल तर कोणास ठाऊक?- असे लिहति व बोलत. गोखले अशक्य किंवा वावगा एक शब्दही बोलावयाचे नाहीत. हिंदुस्तान रिव्ह्यू म्हणतो :- 'It is not the wordy ideals and impossible programmes of men of weak judgment and unrestrained emotion, but the carefully thought out ideas and proposals of powerful intellects and selfless patriots like Mr. Gokhale, whose emotion restrained by his intellect at the same time that his intellect is tempered by his emotions that have to be deeply pondered over and acted upon by the younger generation among Indian public men.' गोखल्यांच्या मध्ये विचार व आवेश यांचा रमणीय संगम झाला होता. एकमेकांमुळे एकमेकांस शोभा आली होती. सरकारच्या पुढेही निरनिराळे कार्यक्रम, सूचना गोखले मांडावयाचे. टिळक सडेतोड असत; गोखले सांवरून बोलत. याचे कारण स्वभाव-भेद होय. टिळकांचा स्वभाव तल्लख; संताप व आवेश त्यांच्या अंगांत ताबडतोब संचारत. त्यांच्या
पान:ना. गोखले चरित्र.pdf/२५५
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
५५
परतंत्र राष्ट्रास अतृप्ततेचाच उपदेश योग्य होय.